नियतीने दिलेले संकेत दुर्लक्षिले की समजलेच नाहीत !! - एक कथा-
नियतीने दिलेले संकेत दुर्लक्षिले की समजलेच नाहीत !! - एक कथा-
असे काय घडले की ज्यामुळे आज अनुकूल हॉस्पिटलात जखमी होऊन पडला आहे? अपघाताच्या आधी त्याला कोणताही शुभ-अशुभ शकून समजला नाही? की त्याने शकूनांतून मिळणार्या संदेशांकडे दुर्लक्ष केले?
नाव - अनुकूल
शिक्षण - बी.ई. सॉफ्टवेअर (फर्स्ट क्लास)
पेशा - सॉफ्टवेअर इंजीनिअर (उच्चपदस्थ)
कौटुंबिक स्थिती - सुस्थित
आई - उच्चशिक्षित,वास्तुशास्त्री
वडिल - उच्चशिक्षित नोकरदार
आज बाईकवरुन जाताना वळणावर अपघात होऊन अनुकूलच्या उजव्या अंगाला मार बसला आहे. तो आज हॉस्पिटलात जखमी अवस्थेत आहे. याला कारण काय? दैवाच्या संकेतांकडे लक्ष न दिल्याची इतकी मोठी शिक्षा त्याला मिळावी का?
बुद्धीमान अनुकूल भराभर यशाच्या पायर्या चढत गेला. प्रयत्नांबरोबरच डोळसपणे दैवाची साथ घेतल्याने तो समवयस्कांमध्ये नक्कीच उजवा आहे. 'सवयी बदला - जीवन यशस्वी करण्याचा सोपा मार्ग' हा मेंदूच्या आरोग्याबद्दलचा लेख वाचून विज्ञानवादी अनुकूल फारच भारावला. आपण रोज सवयीने जे करतो ते जाणीवपूर्वक बदलून पाहणे आणि मेंदू सतेज करणे हा उपाय त्याला फारच आवडला. उजव्या हाताने दात घासत असू तर कधीतरी डाव्या हाताने घासावेत. रोज त्याच त्या मार्गाने ऑफिसला जात असू तर मार्ग बदलून पाहावा. पण यामध्ये रोज नियतीकडून मिळणार्या संकेतांकडे लक्ष द्यायचे राहून जाईल हे त्याच्या लक्षातच आले नाही. लहान सहान गोष्टींमध्ये शकून पाहून पाऊल टाकणार्या यशस्वी अनुकूलने इथेच चूक केली.
रोजचा ऑफिसला जायचा रस्ता बदलायचा अनुकूलने निश्चय केला. खरेतर असे बदल पटकन होत नाहीत. पण एके दिवशी ऑफिसच्या शेवटच्या चौकात नेहमी डावीकडे वळून पश्चिमेच्या पर्किंगमध्ये गाडी लावण्याऐवजी उजवीकडे वळून पूर्वेच्या पार्किंगमध्ये गाडी लावण्याचे त्याने ठरवले. पण....
नियतीने दिलेला संकेत १ - वळणावरती त्याला उजवीकडे जाणारी अँब्यूलन्स दिसली. हा अपशकून आहे असे समजून त्याने जुनाच डावा रस्ता प़कडला.
नियतीने दिलेला संकेत २ - काही दिवसांनी आज उजवीकडे वळायचे असे ठरवले असताना त्याला उजव्या वळणावर पत्ता विचारणारा माणूस दिसला. पत्ता सांगणारा हातवारे करून त्याला सांगत होता की उजवीकडे जाऊ नका. डावीकडेच जा. हा संकेत आहे समजून अनुकूलने त्याही दिवशी डावाच रस्ता पकडला.
याचा अर्थच असा की अनुकूलने उजवा रस्ता पकडू नये म्हणून नियती त्याला सुचवित होती. मग अपघाताच्या दिवशी अनुकूलने रस्ता बदलला तर नियतीने त्याला काहीच संकेत कसा दिला नाही ?
काय त्या दिवशी वेगळे असे काहीच घडले नाही?
नियतीने दिलेला संकेत ३- अपघाताच्या दिवशी अनुकूल उजवीकडे वळत असताना एक कावळा त्याच्या आधी उजव्या रस्त्यावरून पुढे उडत गेला. तो त्याला पुढल्या धोक्याची कल्पनाच देत होता. अनुकूलने ते पाहिले पण सवय बदलायचीच या भावनेच्या भरात त्याने कावळ्याच्या संकेताकडे दुर्लक्ष केले आणि अपघात घडला.
असे काय झाले की अनुकूलला त्याच दिवशी रस्ता बदलण्याचा मोह झाला? अनुकूलच्या दु:खी माता-पित्यांकडून कळालेल्या माहितीने गूढ उकलायला मदत झाली.
वास्तूशास्त्री आईचा अनुकूल नेहमी उजव्या पाऊलानेच उंबरठा ओलांडायचा. त्या दिवशी तो बाईकवर बसला पण त्याच्या कपाळावर थोडा घाम आला म्हणून त्याने उजव्या खिशातला रूमाल बाहेर काढला. तेव्हा त्याचा अभिमंत्रित स्फटिक खिशातून बाहेर पडला. हा त्याचा रक्षणकर्ता स्फटिक होता. यशस्वी अनुकूल नेहमीच प्रयत्नांबरोबर दैवाची सुद्धा साथ घ्यायचा. त्याने तत्परतेने खाली उतरून तो स्फटिक उचलला. पण! सवय बदलण्याच्या नादात त्याने तो स्फटिक शर्टाच्या वरच्या खिशात म्हणजेच डाव्या खिशात ठेवला.
आमचे विज्ञानवादी ज्योतिषी या सर्वांचे विश्लेषण करताहेत. त्यांच्या मते शरीराची उजवी बाजू धनभारीत तर डावी ऋणभारीत असते. स्फटिक स्वतः धनभारीत असतान तो ऋणभारीत अश्या डाव्या खिशात ठेवला गेला. इथेच मोठी चूक झाली. डावी बाजू मेंदूच्या उजव्या भागाशी संलग्न असते. त्यामुळे कावळ्याचा संकेत दिसूनही स्फटीकाने भारलेली डावी शरीरबाजू उजव्या मेंदूगोलार्धाला चालना देती झाली आणि भावनावेगात चुकीचा मार्ग निवडला गेला.
काय तुमच्या बाबतीत असे कधी घडले आहे का ? आम्हाला तुमची कथा लगेच कळवा.
काय तुम्ही अनुकूलला स्वास्थ्यशुभेच्छा देऊ इच्छिता? त्वरित प्रतिसाद लिहा अश्या मोड मध्ये जा. आणि लिहा 'स्वास्थ्यशुभेछा' अनुकूलचे संकेताक्षर आहे 'अनु'. आणि पाठवून द्या लगेच.
काय तुम्ही अनुकूलच्या दु:खी मातापित्याचे सांत्वन करू इच्छिता? त्वरित प्रतिसाद लिहा अश्या मोड मध्ये जा. आणि लिहा 'सांत्वन' मातापित्याचे संकेताक्षर आहे 'मापी'. आणि पाठवून द्या लगेच.
आपलाच
- (सांकेतिक) लिखाळ.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आजतक ची एखादी न्युज पाहतोय
गणेशा आज तक नाही...तर इंडिया
जबरदस्त लेखन... फार
लिखाळभाऊ आगे बढो... हम तुम्हारे साथ है
कस्सं कस्सं
काळजी घ्या म्हणावे
अगायायाया...
कदाचित त्या दिवशी अनुकूल
_/\_
आमचे मित्र श्रीयुत लिखाळ हे
चांगलीच उडवलीये..! मस्त!
हा हा हा! 'मापि' आवडले. आजकाल
"लिखाळभाऊजी" मुळे रेडिओवरील
समजूनहि दुर्लक्षिलेले नियतीचे संकेत ?
लिखाळ गुर्जींनी गार्ड बदला की
अनुकूल न त्याचे नाव फक्त
रोजच्या रोज ऑफिसला जायची
हटके
+१
हल्ली इथे कीबोर्डच्या
लिखाळशेट, तुम्ही डावे काय?
जबरी!
प्रतिसाद.
हाहाहाहा...
महान लेखन आहे. च्यायला उपरोध
मी कधी डाव्या तर कधी उजव्या
=)) =)) =)) _||_
लेखक साहेब
ज ब री लेख..... मजा आली.
हा हा हा .. मनशक्तीचा संदर्भ
बालकथाऐवजी, काही मा(ओ)ठ्यांसाठी असे म्हटले असते तरी पळाले असते.
हॅ हॅ हॅ हॅ!
ही ही ही !! हे मस्त ! माझ्या
माझी उजवी अक्कलदाढ काढून घेतली
छान!
आज राजपुत्र विल्यम आणि केट
चांगला शुभशकून झाला, गेला
__/\__
लिखाळ शेठ कुठल्या मुहुर्तावर
हम्म.. मलाही तोच अनुभव येतो
लै भारी!