नमस्कार,
सध्या 'स्पीक एशिया डॉट कॉम' ची बरीच चलती आहे असे दिसते.
उपलब्ध माहितीनुसार ही एक सिंगापूरस्थित सर्व्हे कंपनी आहे, जी लोकांमार्फत ऑनलाईन सर्व्हे कंडक्ट करते. कंपनीत नावनोंदणी करण्यासाठी ग्राहकाला आधी एका वर्षासाठी ११,०००/- रू. भरावे लागतात. त्याबदल्यात त्याला आठवड्याला दोन सर्व्हे करायला देतात. एक सर्व्हे केल्यावर ५०० रू. मिळतात. याप्रमाणे दर महिन्याला चार हजार रुपये कमावता येतात. म्हणजे ११ हजार भरायचे आणि वर्षभरात ४८ हजार कमवायचे अशी एकंदर स्कीम आहे.
याशिवाय आपल्यासारखेच ११००० भरणारे दोन नग शोधून आणल्यास त्यांचेही कमिशन आपल्याला मिळणार. त्यांनी त्यांची चेन पुढे वाढवली की आपल्याला आणखी कमिशन आणि आपण घरबसल्या मालामाल वगैरे आहेच.
सध्या माझे दोन-तीन मित्र याचे मेंबर्स आहेत आणि अपेक्षेप्रमाणे मला गळ घालत आहेत. "आधी अकरा हजार भरा" म्हटल्यावर माझ्यासाठी हा विषय इथेच संपला आहे हे नक्की. पण एकंदर प्रकाराने उत्सुकता चाळवल्याने थोडी माहिती मिळवली. (जी मेंबर झालेल्या मित्राने आनंदाने पुरवली. ;)) 'स्पीक एशिआ' ला म्हणे हा सर्व पैसा ज्या प्रॉडक्टचा सर्व्हे केला जातो, त्या कंपन्या पुरवतात. साईटवर जाऊन एक सॅम्पल सर्व्हे पाहिला- जो अगदीच बाळबोध वाटला. (एक सर्व्हे फॉर्म भरायला साधारण दहा मिनिटे खूप होतात.) इतक्या पाचकळ प्रश्नांना कुणी पाचशे रू. देऊ करेल असे वाटत नाही. शिवाय ग्राहकानेच सर्व्हे भरायचा आणि पैसे मिळवयाचे असे असेल तर आधी अकरा हजार कशाबद्दल घेतात याचे समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नाही.
असे असले तरी याच माध्यमातून सहा-सात महिन्यात गडगंज पैसा कमावणारे एक उदाहरण डोळ्यासमोर आहे. सदर गृहस्थाने आपली बॅन्केची नोकरी सोडून पूर्णवेळ या कार्याला वाहून घेतले आहे. :) एकंदर या प्रकारच्या योजनांचे अर्थकारण कसे चालते, हा संशोधनाचा विषय आहे. अशा योजनांमधे साधारण चेनमधले वरचे लोक श्रीमंत होतात आणि खालचे लुबाडले जातात. पण आपण वर आहोत की खाली हे चेनमधल्या माणसाला शेवटपर्यंत समजत नाही. त्यामुळे अशा योजनांपासून दूर राहणेच इष्ट आहे, असे वाटते.
आतापर्यंत मल्टि लेव्हल मार्केटिंगच्या अनेक स्कीम्स (जपान लाईफ, एम्वे, ट्युलिप इ.इ.) लोकांना चुना लाऊन गेल्या आहेत. तरीही या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता 'ईझी मनी' चे आकर्षण कमी झालेले दिसत नाही.
मिपाकरांना याबद्दल काय वाटते? इथल्यापैकी कुणी याचे मेंबर आहे का? काय अनुभव आहेत?
चर्चा व्हावी !
वाचने
5704
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
इझी मनी?
पण काहि चान्गल्या पण असतात...
In reply to इझी मनी? by साबु
एम एल एम वरून आठवलं
In reply to पण काहि चान्गल्या पण असतात... by विजुभाऊ
बटाट्याच्या चाळीत उपास नावाचे
माऊली तुला काय कमी आहे का
विश्वानाथ चे म्हणने पटते एकदम
संधी की सापळा.....
दोन किस्से माझ्या बाबतीतले ...
वेगळे विचार..
अभ्यास करणे कधी ही चांगले
In reply to वेगळे विचार.. by साबु
मल्टि चेन मार्केटिग ईण्डस
च्यायला स्पिक एशियाच्या
.
कुठल्याही एमेलेम स्कीम मधे
>>> स्वतःला हे महाभाग
In reply to कुठल्याही एमेलेम स्कीम मधे by मराठमोळा
१) रु.११०००/- आधी भरा मग
मिपाकरांना याबद्दल काय वाटते?
अनुभव
In reply to मिपाकरांना याबद्दल काय वाटते? by रेवती
धन्यवाद..
RMP नामक टुकार प्लान ला मी पण