पोर्ट्रेट फोटोग्राफिचा एक प्रयत्न.
नमस्कार मंडळी,
श्री शरद यांचा "मिपावरील छायाचित्रे ... एक निरिक्षण" हा लेख वाचला आणि मला माझ्याकडे असलेली काही पोर्ट्रेट अपलोड करायचा मोह झाला. ही काही फार सुंदर छायाचित्र आहेत असं नाही म्हणता येणार पण त्या क्षणी मला जे कॅमेर्यात पकडावस वाटलं ते इथे मांडतोय.
सासवड-जेजुरी च्या परिसरात फिरत असताना हा धनगर दिसला. यांची पागोटे घालण्याची पद्धत खूप मस्त असते. आणि मला सगळेच धनगर फोटोजेनिक वाटतात!
गोव्याला गेलेलो असताना समुद्रात खेळून आलेल्या आणि मग दमून स्वस्थ बसलेल्या एका लहान मुलाचा हा फोटो. आधी मला ती मुलगीच वाटली होती. त्याच्या घरच्यांनी माझा तो गैरसमज दूर केला. अतिशय गोड आणि निरागस चेहरा.
रंगीला..
बदामी ( कर्नाटक ) ला देवीच्या दर्शनाला गेलो असताना जत्रेच्या वेळी याचा फोटो मिळाला.
हम्पी ला या मुलीचा फोटो मिळाला. इतकी खळखळून हसत होती ती.
सासवड च्या एका मंदिरात ही स्त्री एका खांबाला टेकून बसली होती. तिच्या मुद्रेवर एक प्रकारचा करारी पणा दिसत होता.
बुलंद दरवाजा पाहायला गेलो असताना हा एक माणूस नुसता फुकट होता. एक संपली कि दुसरी बिडी पेटवायचा. मी फोटो काढत असताना त्यान एकदा थकलेल्या डोळ्यांनी माझ्या कडे पाहिलं आणि आपलं काम चालूच ठेवलं.
आमचा एक अतिशय झोपाळू मित्र. याला कुठेही, कधीही, कशीही झोप येऊ शकते. ट्रेन मध्ये झोपलेला असताना त्याच्या वरचा लाईट आवडला मला. खिडकीतून येणारा.
माझा एक फोटोग्राफर मित्र. हा मी मुद्दाम थोडा अंडरएक्सपोज ठेवला आहे. कारण मला फक्त त्याची त्या वेळची शारीरिक ठेवण आणि हातातला कॅमेरा एवढंच दाखवावास वाटलं.
राजगड ला एक दिवस जात असताना ही बाई दिसली. शेळ्या हाकताना. कपाळावरच कुंकू आणि नाकातली रिंग ( कोणाला त्याला नक्की काय म्हणतात सांगितला तर बर होईल) आवडली.
फोटो काढायला लहान मुल नेहमीच उत्सुक असतात. पण हा थोडासा लाजरा होता. शेवटी तो खांबाआड असतानाच त्याचा असा फोटो घेतला.
घोष पथकामधले एक आजोबा. त्यांचे थिजलेले डोळे, चेहऱ्यावरच्या वार्धक्याच्या खुणा आणि त्यांचा तो ड्रेस यात मला काहीतरी विसंगती सापडली.

वर्गीकरण
सर्वच
सर्व फोटो मस्त. - सूर्य
ऑफिसमधून दिसत नाहीयेत, घरुन
छान छान फोटो!
+१
गुरु एक नम्बर
क्यमेरा कोणता वापरता ते
सगळेच फोटो आवडले.
काहि खूपच आवडले विषेशतः
खूप छान फोटो काढलेत!
खुप मस्त फोटो रे, मला कधी
-
२रा आणी ७वा क्लाSSSSSSSस
सुंदर प्रकाशचित्रे!
धन्यवाद!
छान आहेत फोटू! आवडले, अजूनही
छान
फोटो दिसत नसल्याने फक्त
झकास!
उत्तम
छान फोटो आले आहेत. फोटोशॉप
दोनही स्त्रिया आणि अंडर
सुंदर...
अंडर एक्स्पोझ्ड फारच छान
चांगला
सुपर्ब...
सगळेच फोटो क्लास आलेत , मला
छान आहेत.
मस्त.
मस्त आहेत.
आवडले.
मस्तच....
मस्त आहेत. आवडले.
मस्त फोटो आले आहेत!!