उन्हाळा आलाय.. नागपुरात तर चांगलंच तापतंय. अशात नागपुरहून मुंबईला जायला रेल्वेस्टेशनवर पोहचलो. रात्रीची वेळ असली तरी गरमी वाटत होती. पाण्याची बाटली घेतली. पैसे विचारले तर म्हणे "पंधरा रुपये". मी किंमत पाहीली, बारा रुपये.. दुकानदाराला विचारलं, "तीन रुपये कशाचे?" तर म्हणे कुलिंग चार्जेस.. मी भांडून शेवटी न-थंड बॉटल बारा रुपयांतच घेतली...
मुंबईत दुपारी घसा सुकला म्हणून कोल्ड्रींक घ्यायला दुकानात गेलो. पुन्हा तेच.. २७ रुपयांची बॉटल ३० रुपयांत.. पुन्हा ३ रुपये कुलिंग चार्जेस.. नरडा सुकत होता म्हणून झकत घेतली. (पाण्यासारखं कोल्ड्रींक कुठं न-थंड पिणार?) पण दुकानदाराला म्हणालोच, " कोल्ड्रींकचे कसले कुलिंग चार्जेस? ते काय गरम करुन देणार का?" तोही साला वस्ताद निघाला. म्हणे, "देऊ की मागितल्यास.."
मला खरंच कळत नाही.. एवढी ढळढळीत लूट? आणि ती सर्रास चालू असते.. भिकार्याला भिक न देण्यामागे "फुकट खाण्याच्या प्रवृत्तीच्या विरोधात" असल्याच्या गप्पा मारतो आपण, आणि दुकानदाराचा माजुर्डेपणा, हरामीपणा मात्र निमुटपणाने सहन करतो.. "नसेल घ्यायचं तर निघा" म्हणण्याची हिम्मत असते त्याच्यात कारण की सगळेच चोरी हाच हक्क मानतात..
कुणी म्हणेल की "फ्रिजचा विजेचा खर्च नसतो का?" पण तो खरंच असा कितीसा असतो की प्रत्येक बॉटलवर २-३ रुपये जास्त घ्यावेत? आणि त्याला काही MRP इतके पैसे द्यावे लागत नाही माल घ्यायला. मार्जिन असतंच की.. टिव्हीवर मारे "जागो ग्राहक जागो" वाले MRP वर बार्गेनिंग करण्याचा हक्क सांगतात आणि आम्ही इथं जास्तीचे पैसे निमुटपणाने देतो. बरं, सांगता कोणाला? हा भ्रष्टाचार / लुबाडणूक नाही ? "कुणी आमंत्रण दिलं नव्हतं दुकानात यायला" असं म्हणून नाही भागणार, कारण की खिंडीत गाठून लाच खाणारा सरकारी नोकर आणि सगळे मिळून लुबाडणूक करणारे हे दुकानदार ह्यांची जातकुळी एकच, "येतोच की झकत, जाणार कुठे? सगळीकडे हेच आहे."
जाता जाता एक मोठी चोरी सांगतो. विमानाच्या तिकीटावरील तपशील :
Passenger Service Fee - Rs. 229 /-
Passenger Transport Service Tax - Rs. 100/-
Other Services Tax @ 10.3 %
एकाच तिकीटात तीन वेळा सर्विस फी /टॅक्स !? आंणि आपण मारे "जागरुक ग्राहक" असल्याच्या गफ्फा मारायच्या ??
वाचने
6598
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाऊ द्या ना चिगो,
खिशात सुट्टे पैसे ठेवत जा
हा हा हा
In reply to खिशात सुट्टे पैसे ठेवत जा by गणपा
अहो बाटल्या फोडा म्हणजे तशा
In reply to हा हा हा by आनंदयात्री
कोल्ड्रींक प्यायलाच हवे
रेवतीतैंशी सहमत. पण केवळ
In reply to कोल्ड्रींक प्यायलाच हवे by रेवती
उत्तम विचार...
In reply to कोल्ड्रींक प्यायलाच हवे by रेवती
सहमत ...
In reply to उत्तम विचार... by चिगो
बाकी ह्या यादीत अनेक वस्तु
In reply to सहमत ... by छोटा डॉन
पुण्यातले भामटे तर प्रत्येक
In reply to सहमत ... by छोटा डॉन
थोडा फरक
In reply to उत्तम विचार... by चिगो
तेच हो..
In reply to थोडा फरक by श्रावण मोडक
बॉटल इज हाफ फुल्ल!!!
धन्य...
In reply to बॉटल इज हाफ फुल्ल!!! by पिवळा डांबिस
बर्याच थ्ठिकाणी रांजणात
बाप रे
In reply to बर्याच थ्ठिकाणी रांजणात by अविनाशकुलकर्णी
अशा
In reply to बर्याच थ्ठिकाणी रांजणात by अविनाशकुलकर्णी
पुणे रेल्वे स्टेशन च्या आसपास
In reply to बर्याच थ्ठिकाणी रांजणात by अविनाशकुलकर्णी
शवागारातला बर्फ अनेक ठीकाणी
In reply to पुणे रेल्वे स्टेशन च्या आसपास by llपुण्याचे पेशवेll
मागे याच विषयावर माझा अनुभव
औघड आहे. जास्त पैशे जातात
चिगोराव... असं टकुर्याला
लुट आहे सरळ सरळ
शेगावला संस्थानाच्या कँटीन
चिगो लेका पाण्यातुन घ्यायला
अरे भौ...
In reply to चिगो लेका पाण्यातुन घ्यायला by परिकथेतील राजकुमार
अरे म्हणजे साध्या पाण्यातुन
In reply to अरे भौ... by चिगो
वैग्रे...
In reply to अरे म्हणजे साध्या पाण्यातुन by परिकथेतील राजकुमार
हल्ली मिपावर हे "वैग्रे"चं
In reply to वैग्रे... by चिगो
नक्कीच...
In reply to हल्ली मिपावर हे "वैग्रे"चं by परिकथेतील राजकुमार
मी कंटाळलो!