Skip to main content

तुला समजलो, आणि समजली तुझी स्वच्छता

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 23/06/2008 18:33 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा कविवर्य अनंत ढवळे यांची नितांत सुंदर, अप्रतिम गझल तुला समजलो, कुठे समजली तुझी सहजता

श्वास श्वास मळमळून यावा तुला बिलगता
खूप दूरवर दिसते आहे तुझी मलिनता

वासाभवती फिरत राहिलो खूपवेळ मी
तुला समजलो,  आणि समजली तुझी स्वच्छता

किती दूरवर आल्यावरती बरे वाटते?
मैलभराचा प्रवास निघतो मोजू बघता..

तुझ्याप्रमाणे जगेन मी ही, तुझ्या सवे पण
खरेच का येईल मला हे स्वच्छ राहता..?

विचार करतो कुठे कुठे बदलेन शब्द मी
विडंबनासाठी एखादे काव्य निवडता.....!

केशवसुमार

लेखनविषय:

वाचने 4090
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

विचार करतो कुठे कुठे बदलेन शब्द मी विडंबनासाठी एखादे काव्य निवडता.....! पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

नाही नाही नाही ! त्रिवार नाही ! इतक्या दिवसांनी येथे यायचे, आणि अशासाठी ? नकॉ केशवसुमार, प्लीज.. ह्यासाठी इथे आम्हास बोलवू नका पुन्हा, प्लीज !! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आपण आलात आणि स्वच्छ प्रतिक्रिया दिलीत ह्या बद्दल धन्यवाद.. (स्वच्छ आभारी) केशवसुमार

दारु बायको बॉस सोडुन विडम्बन........... हा अट्टहास का? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

वाजवा दोन्ही बाजूने.. अस ही बोंबला आणि तस ही बोंबला..

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या ( ह्या वेळेस ही माणसे जास्त आहेत ;)) सर्व वाचकांचे मनापासून आभार.. (आभारी) केशवसुमार