साहित्यः
१/२ किलो घरगुती पनीर (बाजारातून आयते आणलेले ही चालेल)
१ कप साखर
३ कप पाणी
१ टीस्पून रोझ इसेन्स
२-३ थेंब गुलाबी खायचा रंग
१ टीस्पून वेलचीपूड
२ टेस्पून पिठीसाखर
पाकृ:
पनीर चांगले मऊ मळून घ्यावे व त्याचे दोन सारखे भाग करावेत.
एका भागात खायचा गुलाबी रंग घालून मळावे व त्याचे लंबगोल बनवावे (ओव्हल शेप).
जाड बुडाच्या भाड्यांत साखर+पाणी +रोझ इसेन्स घालून उकळी आणावी.
उकळी आली की त्यात छोटासा गुलाबी पनीरचा तुकडा सोडून बघावा, फुटला नाही तर हे गुलाबी गोळे अलगद सोडावे व झाकून ८-१० मिनिटे शिजु द्यावे.
नंतर गोळे उलटवून पुन्हा ५-७ मिनिटे शिजु द्यावेत.
शिजल्यावर थोडे गार झाले की हे चमचम पाकातून बाहेर काढावे.
मायक्रोव्हेव सेफ भाड्यांत पनीरचा दुसरा भाग घ्यायचा , त्यात वेलचीपूड आणी पिठीसाखर घालून एकजीव करायचे.
मायक्रोव्हेवमधे ३० सेकंद शिजवून घ्यायचे.
गुलाबी चमचमचे मधून दोन भाग करुन त्यात पांढर्या पनीरचे मिश्रण भरावे व अलगद दाबून बंद करावे.
पिस्ते लावून सजवावे.

वाचने
8991
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला
यम यम !!!! आवांतर : आमच्या
वा वा .. पाककृती लाजबाव आहे
In reply to यम यम !!!! आवांतर : आमच्या by गणपा
पाकक्रुती आवडली...
उकळताना फुटु नये म्हणून
In reply to पाकक्रुती आवडली... by कौशी
आई गं.....!
छान फोटो आणि पाकृ!
आई ग्गं! भारी पाकृ फोटो,
अरे हे तर एकदम सोपं
एकदम सोपी पाककृती आहे. -
चमचम !! मस्त आणि सोपी पा.
इसेन्स आणि रंग न घालता केलं
रंग न घालता केलं तर चालेल
In reply to इसेन्स आणि रंग न घालता केलं by सूड
भीषण
कसला खतरा फटु आलाय शेवटचा!
+१
In reply to कसला खतरा फटु आलाय शेवटचा! by विंजिनेर
मेलो, खपलो, स्म्पादक
लय भारी आहे हो तुमची बंगाली
सही
अतिशय सुंदर...........
मातोश्रींना सर्क्युअलर
मातोश्रींना सर्क्युअलर
फोटो
खल्लास!
आता रसमलई येवुदेत..
छानच! पण बहुतेकदा माझ पनिर