हॉल खच्चुन भरला होता.
विद्यार्थी -पालक सभा.
नविन सिलॅबस.
दहावीच्या पालकांना हायपर व्हायला आणखी एक कारण.
दोन कार्यक्रमामधे अर्ध्या तासाचा ब्रेक.
त्यात तो भेटायला येणार होता.
शाळेतल्या गुणवंत मुलामधला.
मुख्याध्यापकांची आग्रहाची विनंती.
टाळणे शक्य नव्हते.
-----------------------------------------------------------------------------------------
सभा सुरु झाली.
चौथ्या वाक्यात मांडीवरील लहानगीने भोकाड पसरले.
मी थांबलो.
सुज्ञ शिक्षीकेने आईला वर पक्षाच्या खोलीकडे नेले.
कुणी तरी दबल्या आवजात कॉमेंट केली.
मुले फिदीफिदी हसली.
-----------------------------------------------------------------------------------------
तो आला.
चेहेरा रागाने लालबुंद.
१५ मिनिटे बोलत होता.
नंतर शांत झाला.
त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे तेंव्हातरी उत्तर नव्हते.
-----------------------------------------------------------------------------------------
"किती तरी वेळ सांगितले. ऐकतच नाही. शाळेतल्या ओपन डे ला सुद्धा आली. सरांनी गरज नाही हे सांगुन सुद्धा. किती सहन करु सर? किती चेष्टा सहन करु सर? ३जी, अॅक्सीसडेंट. सहन न होणारे असेच कितीतरी टोमणे. सोडतच नाहीत.
कधी कधी वाटते घर आणि शाळ दोन्ही सोडावीत. आम्हाला कळते. ह्यांना कळत नाही. आजीचा सल्ला ऐकला नाही. एवढ्या उशीरा नको आपल्याला. म्हणे मला कंपनी. आणखी वर बेबी सिटींग चा आग्रह. आय हेट हर. आजच्या फिडींग वरुन उद्या शाळेत काय काय बोलातील नेम नाही. Stupid cow. Why did she carry the pregnancy.? अबॉर्शन केले असते तर काय बिघडले असते. अभ्यासात लक्षच लागत नाही सर. सांगा मी काय करु?
त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे आजही उत्तर नाही.
-----------------------------------------------------------------------------------------
वाचने
2800
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
इन जनरल ...
हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे आजही उत्तर नाही.
स्वत:च्या आईचा उल्लेख Stupid
असहमत
In reply to स्वत:च्या आईचा उल्लेख Stupid by गणपा
असहमत
In reply to असहमत by परिकथेतील राजकुमार
सहमत
In reply to स्वत:च्या आईचा उल्लेख Stupid by गणपा
One of life's best coping
मस्तच वाक्य आहे!
In reply to One of life's best coping by शाहरुख
__/\__ अपर्णा
In reply to One of life's best coping by शाहरुख
ह्यात मला तरी प्रश्न वाटत नाहीये!
पौगंडावस्था - ते वय वेडं