हलवा पापलेट सारखाच दिसतो पण त्याची खवले काळपट असतात. तर पापलेटला खवलेच नसतात.
हलवा हा चवदार असतो. पण उष्ण असल्याने तो ऑपरेशन झालेल्या व्यक्तिंना देत नाहीत.
हलव्याचे कालवण
लागणारे जिन्नस:
हलव्याच्या तुकड्या
हिंग, हळद
मसाला
वाटण : ओले खोबरे पाव वाटी, आले, लसुण, मिरची कोथिंबीर
तेल
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
मिठ
चिंचेचा कोळ
क्रमवार पाककृती:
हलवा कापुन हलव्याच्या डोक्याचा व शेपटाचा भाग रश्यासाठी वापरा व मधला भाग तळण्यासाठी वापरा.
कालवण :
हलव्याच्या तुकड्या स्वच्छ धुवुन घ्या. भांड्यात तेल तापवुन त्यावर लसुण पाकळ्यांची खमंग फोडणी द्या. लगेच त्यावर हिंग, हळद, मसाला टाकुन वाटण, चिंचेचा कोळ टाका. मग कालवणासाठी च्या तुकड्या त्यात टाका. मिठ टाका. उकळी आल्यावर कालवण ७-८ मिनीटांत तय्यार.
तळण्यासाठी :
हिंग, हळद, मसाला, मिठ, तेल
हवे असल्यास आल, लसुण वाटण किंवा लसणाच्या ५-६ ठेचलेल्या पाकळ्या.
पाककृती
साहित्यातले जिन्नस एकत्र तुकड्यांना लावा. तवा चांगला तापल्यावर तेल टाकुन हवे असल्यास लसुण टाकुन त्यावर तुकड्या मस्त मिडीयम गॅसवर खरपुस तळा.
अधिक टिपा :
तयार झालेले पदार्थाचे फोटो काढण्याआधी पदार्थ गायब झालेले. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करते.
पुन्हा केल्यावर फोटो नक्की टाकते.
वाचन संख्या
12703
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या क्षेत्रातल्या पाकृ
अगो कुठे फेडशील ही पापं? आज
गरिबांचे पापलेट..
स्वस्त?
निम्म्याने असतो किंमतीला हो
In reply to स्वस्त? by प्रियाली
आठवत नाही
In reply to निम्म्याने असतो किंमतीला हो by गवि
प्रियाली, देशात स्वस्त असतो
In reply to आठवत नाही by प्रियाली
---- !!!
कच्चे तुकडे असुनही
पाकृ, फोटू आवडले.
पापलेट स्वस्त असते तर हलवा
पापलेट स्वस्त असते तर हलवा
In reply to पापलेट स्वस्त असते तर हलवा by जागु
हलवा, वाशीत तरी, पापलेट पेक्षा बराच स्वस्त मिळतो.
तू केलेला
In reply to हलवा, वाशीत तरी, पापलेट पेक्षा बराच स्वस्त मिळतो. by खादाड अमिता
सुंदर
हे शिर्षकात मासे २५) काय आहे.
हि जागूताईने टाकलेली
In reply to हे शिर्षकात मासे २५) काय आहे. by नि३