पेअर चॉकलेट केक
बर्याच दिवसांनी एक नवी केकृ खास इस्टर निमित्त-
साहित्य- १५० ग्राम बटर, १५० ग्राम साखर,३०० ग्राम मैदा,५० ग्राम ओट फ्लेक्स, ४ अंडी, ३ चहाचे चमचे बेकिंग पावडर, १ चमचा रम,१ चमचा कोको पावडर, १०० ग्राम कुकिंग चॉकलेट,१/२ चमचा जायफळ पावडर+१/२ चमचा दालचिनी पावडर,४ चमचे दूध, ८५० ग्रामचा पेअरचा टिन.( ४ पूर्ण + अर्धे पेअर असे ९ अर्धे पेअर ), १ चिमूट मीठ
सजावटीसाठी- चॉकलेट आयसिंग, व्हाइट चॉकलेट
कृती-पेअर चाळणीवर टाकून पाक निथळून घेणे.
बटर भरपूर फेटणे. त्यात साखर+ दालचिनी पावडर+ जायफळ पावडर घालून फेटणे.
अंडी फोडून घालून फेटणे,रम घालणे व फेटणे.
ओट फ्लेक्स+ कोको घालून फेटणे.
मैदा+मीठ+ बेकिंग पावडर एकत्र करणे आणि ते वरील मिश्रणात घालून फेटणे.
चॉकलेटचे तुकडे करणे व ते वरील मिश्रणात एकत्र करणे.
थोडे दूध ह्या मिश्रणात घालणे.
एव्हाना पेअर मधील पाक निथळला असेल , केकच्या मोल्डला जरा जास्त बटरने ग्रिसिंग करणे. आता ह्यावर पेअर पालथी घालणे. एका पेअरचे टोक काढून त्याचा वर्तुळाकार बनवून तो मध्यात ठेवणे.
केकचे मिश्रण ह्यावर ओतणे.
१८० अंश से ला तासभर बेक करणे.केक झाला की नाहे ते पाहण्यासाठी सुरीने टोचून पाहणे. केक झाला तरी पाच मिनिटे अवन मध्येच राहू देणे, नंतर बाहेर काढणे व अजून ५/७ मिनिटे तसाच ठेवणे, नंतर जाळीवर काढणे.
व खालची बाजू वर येईल असा जाळीवर ठेवणे. पेअर्स वर येतील.
केक पूर्ण थंड झाल्यावर चॉकलेट आयसिंगने डेकोरेट करणे. चॉकलेट आयसिंग उपलब्ध नसेल तर कुकिंग चॉकलेट वितळवून ते केकवर पेअर नसलेल्या भागावर लावणे. वरुन व्हाइट चॉकलेट किसून घालणे.
व्हिप्ड क्रिमबरोबर खाणे (आणि नंतर पळायला जाणे.म्हणजे क्यालरींच्या अपराधी भावनेवर विजय मिळवता येतो.)



वाचने
5605
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
जबरदस्त
छान आहे :)
वा वा मस्त दीसतोय फोटो.
स्वातीताई तू ग्रेट
स्वाती --
प्रश्न
In reply to प्रश्न by ऋषिकेश
पेअर
In reply to पेअर by सहज
ओह!
वा स्वातीताई! लय भारी!
__/\__ धन्य आहेस स्वाती ताई
जबरदस्त केक, मिपावर येउन धन्य
मस्त
In reply to मस्त by नंदन
+१
मस्त दिसतो आहे केक केकृ ताई
हॅप्पी इस्टर इन
मस्त
अहा.. तातडीने खावासा वाटत
अगं आई गं!
मस्त!!