Skip to main content

तरी का ?

लेखक उगा काहितरीच यांनी बुधवार, 20/04/2011 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी ! वरीष्ठ मिपाकरांची आज्ञा /ईच्छा मानुन बर्‍याच दिवसानंतर येतोय . आशा करतो कि विसरले नसनार ( तशी मराठी मानसाची स्मरणशक्ती दांडगी हो!:) ) मागच्या काही दिवसापासुन आमच्याकडे माझी आजी आलेली आहे. आणि तिला टि.व्ही. वरच्या सगळ्या मालिका जाम प्रिय (star plus च्या हो !) तिच्यामुळे मलाही IPL च्या ब्रेकमध्ये का होईना पण पाहाव्या लागतात :( मला कळत नाही की लोकांना या प्रकारच्या मालिका पाहवतात तरी कशा ? त्यामध्ये ना कथा चांगली ना पटकथा , वेशभुषा एकदम भडक , सतत सोज्वळ स्त्रीवर होनारा अन्याय , ढीन sss ढीनsss ढूस्स ss म्युसीक , चित्रविचीत्र क्यामेरा कोन (camera angle) , सतत कसले तरी कट , logic चा तर कुठे दुरान्वयेही संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. (अधीक माहितीसाठी रवीवारचा लोकमत वाचावा .) तरी पण लोकांना विशेषतः महिला वर्गाला या प्रकारच्या मालीका का आवडतात ? बरं केवळ निरक्षर किंवा अल्पशिक्षीतच नव्हे तर चक्क सुशीक्षीत महिलापण अशा मालीका पाहतात . तुम्हि जर अशा प्रकारच्या मालीका पहात असताल तर त्यातिल वाङमयीन सौंदर्याची थोडीफार तरी उकल करुन सांगा किंवा घरच्यांना अशा मालिका पाहन्यापासुन पराव्रुत्त कशे करावे ते तरी सांगा .

वाचने 3202
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

हा प्रश्न मला मिपावरचे बरेच धागे वाचूनही पडतो पण काय करू ? सहन करतो.

In reply to by प्यारे१

वरीष्ठ मिपाकरांची आज्ञा /ईच्छा मानुन बर्‍याच दिवसानंतर येतोय .
सांगा .. नावं सांगा जरा ह्या वरिष्ठ मिपाकरांची .. !! म्हणजे तरतुद करता येईल ! - उभा कधीतरीच

तिच्यामुळे मलाही IPL च्या ब्रेकमध्ये का होईना पण पाहाव्या लागतात
बर्‍याच लोकांना लोक आय पी एल पाहतात तरी कसे असाही प्रश्न पडतो.

In reply to by चिरोटा

>>बर्‍याच लोकांना लोक आय पी एल पाहतात तरी कसे असाही प्रश्न पडतो. +१, सहमत आहे. इनफॅक्ट मी ह्याच्याही पुढे जाऊन असे म्हणेन की 'लोक क्रिकेट पाहतात तरी कसे' हा प्रश्न मला पडतो :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

इनफॅक्ट मी ह्याच्याही पुढे जाऊन असे म्हणेन की 'लोक क्रिकेट पाहतात तरी कसे' हा प्रश्न मला पडतो सहमत

In reply to by मराठी_माणूस

डोण रावांच्या दोन पावले पुढे जाऊन मी तर म्हणतो .. " लोक खेळ ( फुटबॉल असो वा अजुन काही ) पहातात तरी कसे" असा प्रश्न पडतो . एक वेळ मुंबै , पुणे , पंजाब , दिल्ली इत्यादी आयपीएल संघ किमान भारतीय आहेत , त्यात प्लेयर भारतिय आहेत .. पण काही लोकं युरोपियन संघांना चियर अप करताना चक्क भांडताना दिसतात :)

मला वाटले तर्री का? म्हणजे काही तरी मिसळी संदर्भातला प्रश्न असेल. पण हे तर भलतेच.

आपण आपल्या आजीला पोथी, पुस्तक, कादंबरी, एत्यादी वाचून दाखवा. अनेक गोष्टी करता येतील. तीलाही मालीका आवडत नसाव्यात, ती काय करणार बिचारी. प्रयोग करुन बघा !! जोशी

In reply to by जोशी

आज्जीला मिपावर खातं उघडून द्या. :) आणि तुम्ही पण त्या इडियट बॉक्स चा नाद सोडुन इथेच या वास्तव्याला. पर असले धागे काढु नका बॉ. बाकी टार्‍याशी शमत आहे. ;)