नमस्कार मंडळी,
नुकतीच पार पडलेली ज्योतिबाची यात्रा आणि महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात स्त्रियांना मिळालेला प्रवेश..... या निमित्ताने काही फोटूरूपी आठवणी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.
३१ डिसेंबर ......
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण मुंबई नगरी पार्ट्या झोडण्यात आणि नविन वर्षाचे संकल्प करण्यात (की मोडण्यात) दंग होती आणि त्याच वेळेला कोणतीही पूर्वनियोजित तयारी नसताना कोल्हापूरला जाण्यासाठी आम्ही मुंबापुरीचा निरोप घेतला. हेतू इतकाच कि, येणारया नविन वर्षाची सुरुवात एखाद्या पवित्र आणि धार्मिक ठिकाणी जाऊन करावी जेणेकरून येणारे नविन वर्ष(तसे आम्ही आमचे नविन वर्ष गुढी पाडव्यालाच करतो) चांगले जावो. कोल्हापूरची महालक्ष्मी, जोतीबा आणि पन्हाळा गड हि मुख्य ठिकाणे पाहायचीच हे डोक्यात ठेऊन सकाळी ७:३० वाजता कोल्हापुरात उतरलो. इतर कोणत्याही प्रसिद्ध ठिकाणी गेल्यावर नविन आलेला प्रवासी सर्वात आधी पटकावण्याचा रिक्षावाल्यांचा लाळघोटेपणा मला इथेही दिसला. त्यातल्याच एका पायलट कम रिक्षा चालकाला निवडुन मी मंदिरापर्यंत सोडण्याची विनंती केली. होय विनंती हा शब्द यासाठी कि, आम्ही दिलेली आज्ञा त्यांनी शिरसावंद्या न पाळता सरळ सरळ देहूरोडच्या सोमाटणे फाट्यावर मारली. त्याच्याच अव-कृपेने आम्हाला एका हाटील कम वाड्यात आमच्या स्नान व तत्सम प्रातःविधी साठी जागा मिळाली. मंदिराचा रस्ता तेथून जवळ असल्या कारणाने सगळा कार्यभाग उरकून आम्ही पायीच निघालो.
हा आहे भवानी मंडप महालक्ष्मीच्या मंदिरात जाण्यासाठीचा मुख्य दरवाजा..
आत जाणारी रांग शोधेपर्यंत १५ मिनिटे गेली... आणि नंतर आम्हाला कळले आमच्यासारखेच नविन वर्षाची सुरुवात करण्यासाठी फ़क़्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटकातून सुद्धा बरीच मंडळी आली होती.
रांगेत असताना गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला बाप्पाचं दर्शन झालं.
मंदिरात देवीचा फोटो काढण्याची सुविधा नसल्यामुळे दर्शन घेऊन बाहेर आलो.
कळस १
कळस २
मुख्य सभामंडपाच्या दोन्ही बाजूस कोल्हापूरची वैशिष्ठ्ये असलेली चित्रे लावली होती.
दिपमाळ
कोल्हापुरी साज....
हा फोटू टाकण्याचे एकाच कारण कि, हे पाहूनच आमच्या सौभाग्यवतींना त्या दुकानात जायचा मोह आवरला नाही आणि विनाकारण आमच्या खिशाला १००० चा भुर्दंड पडला.
मुख्य रस्त्याला आल्यावर कुठल्याशा शाळेची वृक्षदिंडी चालली होती त्याचबरोबर एका लयीत लेझीम खेळत जाणाऱ्या या मुली पहिल्या आणि थोड्यावेळाकरता आमच्या शाळेतल्या लेझीम पथकाची आठवण झाली.
विठू माझा लेकुरवाळा, संगे संतांचा सोहळा...
याचा उपयोग बरेच मिपाकर एखाद्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी करतात.
तिथल्याच एका छोट्याश्या हातीलाटली कोल्हापुरी मिसळ चापून आम्ही जोतीबाला निघालो.
दख्खनचा राजा, जोतीबा माझा.
तिथून पुढे जास्त वेळ न दवडता एका रिक्षाचालकास( जो स्वतः उत्तम गाइडही होता) आम्ही पूर्ण पन्हाळा फिरून नंतर रंकाळ्याला सोडण्यासाठी नक्की केले. मंडळी, तुम्हास सांगून सुद्धा खोतो वाटेल पण सुरवातीस अतिशय आगाऊ दिसणारा हा रिक्षाचालक नंतर मात्र भलताच प्रामाणिक निघाला.
तीन दरवाजा....
गाइडने सांगितलेल्या माहितीप्रमाणे पन्हाळा गडाच्या तीन दरवाजांपैकी हा एक दरवाजा ज्यातून फ़क़्त ५०/६० मावळ्यांनी शिरून हा गड काबीज केला.
मुख्य दरवाजावरील गणपतीचे चित्र....
गाइडने सांगितलेल्या माहितीप्रमाणे हा गड शिवाजी महाराजांच्याही खूप आधी म्हणजे इ.स ८०० मध्ये एका मुघल राजाने बांधलेला होता आणि सर्वात आश्च्यर्याची गोष्ट म्हणजे त्या तीन दरवाजांपैकी एका दरवाजावर गणपती कोरलेला होता
अंधारबाव....
दोन माजले सोडून खाली तळघरात असणारी ही विहीर त्याकाळी शत्रूंना माहित नसे.
त्याच्याहीमागे एक आख्यायिका आहे पण टंक लेखनाचा कंटाळा आल्यामुळे आता सांगत नाही.
टेहळणी बुरुज....
त्या काळी शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी...
आणि आता तेथील स्थानिक लैला-मजनूंच्या खरडवहीसाठी .
अंबरखाना...
युद्धाच्या वेळी आणि खासकरून पावसाळ्यात धांन्य साठवण्यासाठी...
(जुन्या बीस साल बाद आणि महेश खोटारडेच्या मासूमची शुटींग येथे झाली).
शूरवीर बाजीप्रभू देशपांडे...
*यला हा फोटो घतेवेळी एक येड** सरदारजी त्याच्या १० वर्श्याच्या कार्ट्याला बाजीप्रभूंच्या अगदी बाजूला उभे करुन फोटू काढत व्हत.
एक सणसणीत शिवी द्यावीशी वाटली त्याला...... त्याहीपुढे कहर म्हणून एक बावळट दिसणारी मुलगी बाजीप्रभूंच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढत होती..
छत्रपती शिवरायांचे एकमेव मंदिर जे वर्षातून फ़क़्त एकदाच त्यांच्या जयंती दिवशी उघडतात.
नायकिणीचा सज्जा...
वीर शिवा काशीद...
जयसिंग राजा बरोबरच्या तहासाठी यांना प्रती शिवाजी बनून पाठवण्यात आले होते.
पटापट तिथून निघून रंकाळ्याला आलो आणि त्या रिक्षाचालकाचे आभार मानून निघालो.
रंकाळा कोल्हापूरची चौपाटी...
रंकाळा पाहून संध्याकाळी ८:३० वाजता मुंबईच्या परतीच्या वाटेसाठी कोल्हापूर सोडले.
जाता जाता महत्त्वाची गोष्ट नमूद करू इच्छितो कि, ज्या रिक्षाचालकाने पन्हाळ्याचा संपूर्ण इतिहास सांगितला ती एक मुस्लीम व्यक्ती होती आणि तिने पुरांदारेंचे राजा शिवछत्रपती २ वेळा वाचले होते.
श्री. गणपा यांचे विशेष आभार ज्यांच्या मदत पानातील फोटो कसा चढवावा या लेखामुळे खूप मदत झाली.
निरोप घेतो मंडळी....
वाचने
8828
Flag
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त फोटू.. मिसळीचा फोटू न
मस्त फोटो! कोल्हापूरची सहल
वारी आवडली. फोटु ही छान..
फोटू टाकणारच होतु, पण कॅमेरा
In reply to वारी आवडली. फोटु ही छान.. by गणपा
छान व्रुत्तांत .. पण पन्हाळा
प्रत्येक गडावर गेले की
In reply to छान व्रुत्तांत .. पण पन्हाळा by गणेशा
क्षमा असावी दादुस, टंकण्याचा
In reply to प्रत्येक गडावर गेले की by गणेशा
भावा क्षमा कसली मागताय
In reply to क्षमा असावी दादुस, टंकण्याचा by किसन शिंदे
दादुस, वर सांगितल्या प्रमाणे
In reply to छान व्रुत्तांत .. पण पन्हाळा by गणेशा
विहीरीची आख्यायिका सांगा की.
In reply to दादुस, वर सांगितल्या प्रमाणे by किसन शिंदे
ज ह ब ह रा !!
मस्तच
झक्कास फोटू!
छान फोटो व माहिती, विशेषतः
हर्षद राव, शिवरायांची मंदिरे
In reply to छान फोटो व माहिती, विशेषतः by ५० फक्त
फोटो अन लेख दोन्ही
मस्त
बाबूमोशाय, तसे कोल्हापुरात
In reply to मस्त by अन्या दातार
उत्तम
In reply to बाबूमोशाय, तसे कोल्हापुरात by किसन शिंदे
सुंदर फोटो, कोल्हापूर वारी
भवानी मंडप?
नाना, कोणतीही पूर्व नियोजित
In reply to भवानी मंडप? by विसुनाना
मला वाटते मिपाकारंची मदत
जबरा !!!
काय बोलनार, निशब्द केले भावा
लय भारी हाय बग रं फटू किस्ना
बरीच माहिती विस्कळीत आहे
होय अपर्णा तै, वर
In reply to बरीच माहिती विस्कळीत आहे by स्पंदना