वा! काय मन उघडून दाखवलय. किती सहज, किती आकर्षक. जसे आडवाटेत एका जागी अचानक एक वेगळेच फूल नजरेस पडते व काही क्षण आपण त्या सुंदर फुलाचे रंग, पा़कळ्या, नाजूक आकार, स्पर्श, मंद सुगंध ह्यात मंत्रमुग्ध होउन जातो. तसे झाले.
ह्याला म्हणतात "मनातले "...खूपच आवडला.
मला एकेक वाक्य लिहून वा वा क्या बात है, हे सहीच असे लिहायला आवडत नाही पण काही वाक्य / भावना एकदमच थेट आत भिडल्या. :-)
परत नेहमी सारखेच आम्ही भुंगे आपल्या नव्या मनःपुष्पाच्या उमलायची वाट पहात आहे, पण सध्या ह्या रसास्वादात तृप्त आहोत, मधाळत आहोत.... मनसोक्त!
गुलमोहराच्या झाडावर फुले असतात तो पर्यंत नजर हटत नाही, अन शब्द संपत नाही त्याचे कौतुक करतांना.
पण तुझ्याकडे आहे, अमर्याद आकाश, सततची समुद्रगाज आणि एक विश्वास झूळझूळ्त्या स्फटीक पाण्याच्या स्पर्शासारखा.
वा बिरुटेसाहेब! अतिशय सुरेख लिहिलं आहे तुम्ही...
एखादी सुंदर कविताच वाचतो आहे असं वाटलं!
हृदयाला हात घालणारा, संग्रही ठेवावा असा लेख...
कधी काळी आमच्याही आयुष्यात आली होती अशीच एक सालस! आम्ही तिला पटवली होती, अगदी प्रयत्नपूर्वक! :)
तुमच्या लेखाने आमच्या दोघातल्या खूप आठवणी जाग्या झाल्या.. पुढे काही दानं चुकीची पडली आणि आमच्या वाटा वेगळ्या झाल्या! असो..
तात्या.
" फायनल ड्राफ्ट" या नाटकाची आठवण झाली.
तु म्हणतेस, सर, तुम्हाला कोणीही फसवू शकते
तुम्हाला एक व्यक्ती कधीही फसवू शकणार नाही . ती म्हणजे आपण स्वतः
मी लेख अक्षरशः डोळे मिटून बघितला. ( डोळ्यातलं पाणी कुणी चुकुन बघितलं तर?)
प्रकाश घाटपांडे
फारच सुंदर लेखन. फार आवडले!
वरील सर्वांच्या प्रतिसादांशी सहमत आहे. हा लेख मिसळपावला नक्कीच एका अत्यंत तरल अशा भावनात्मक पातळीवर नेऊन ठेवतो असे मला वाटते.
प्राध्यापक महाशय, आपल्याकडून अजूनही अशाच उत्तमोत्तम लेखांची अपेक्षा आहे,
राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.
>>विस्कळीत स्वरूपातले, प्रामाणिक भावनांमधून उतरलेले लेखन वाटले. औटघटका असे सैरभैर वाचायला मिळणे, हा एक प्रकारचा रुचिपालट म्हणावा काय? लिहीत रहा.
लेखन वाचल्यावर नेमका प्रतिसाद काय लिहावा असा प्रश्न पडला होता. बेसनलाडूच्या प्रतिसादाने तो "सहज" सुटला.
प्रामाणिकपणा अत्यंत प्रभावी आहे. लेखनाची चौकट मात्र थोडी बुचकळ्यात पाडणारी आहे. त्यामुळे "आपल्याला समजले की नाही" असा विचार करत अजून प्रतिसाद दिला नव्हता : तीन-चार वेळा वाचण्यासारखे हे स्फुट खासच आवडले.
खरे तर हा लेख , यापुर्वी दै. लोकमत मधे प्रसिद्ध झालेला होता. आता काही महिण्यांपुर्वी लिहिलेला असल्यामुळे , इथे लिहितांना आणि टंकण्याच्या त्रासामुळे त्यात अनेक बदल सुचत गेले. त्यामुळे त्यात विस्कळीतपणा आलाही असेल. पण, हा लेख आम्ही साहित्यप्रकारातील 'ललित' हा प्रकार हाताळून पाहण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात म्हणतात की, कमी शब्दातून अधिक आशय वाचकाला, अनेकानेक अनुभवासहीत आस्वादता आला पाहिजे, सार्वत्रिक अनुभव देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि तसा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. एक सुंदर, तरल भाव-भावनांची, दीर्घ कविता वाचत आहोत असा अनुभव वाचकाला यावा असा आमचा प्रयत्न होता. आपल्या सर्वांच्या प्रतिसादाने लेखकाचा उत्साह वाढला, वाढवला आहे, अजूनही या लेखन प्रकारात आम्हाला काही सुधारणा नक्कीच करता येतील, तेव्हा प्रतिसादाबद्दल..........
सहजराव, देव साहेब, तात्या,घाटपांडे साहेब्,राजीव, बेसनलाडू , प्रियाली, धनंजय,नंदन, कोलबेर आणि स्वातीजी आपले सर्वांचे आभार मानतो , त्यामुळेच लिहिण्याचे बळ येते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरांचे स्फुट आवडले!
प्रेमाची साधी पण तितकीच गुंतागुंतीची भावना प्रभावीपणे व्यक्त केलीत!
नेहमीच नवनवीन साहित्याचे प्रकार देणारे सर, कोणताही साहित्यप्रकार लिलया हाळू शकतात यात शंका नाही!
हृदय सहजतेने उलगडून दाखवणारे आपले शब्द आवडले.
नितांत सुंदर अलवार काहीतरी वाचण्याचा आनंद मिळाला.
आवडले.
वर काही सदस्यांनी म्हंटले आहे की हा आपला अनुभव असावा... असेलही!
पण जर तसे नसेल तर, आपले इतरांच्या मनाचे स्पंदन इतक्या समर्थपणे व्यक्त करता येणे हे अगदीच अप्रतिम मानावे लागेल!
आपला
गुंडोपंत
(सरांच्या साहितसाहित्याचा)
कोमल हळूवार भावनंचं सुंदर कोलाज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
मस्त लेख. सुंदर भावना कागदावर उतरल्यात.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
सर, इतकं जिवापाड प्रेम करु नका !
च्यायला हे आम्हाला कधी कोणाला बोलावसच वाटल नाही
कारण तशी वेळच नाही आली कोणी तस भेटण्याची
*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
LATEST : D,तु मेर को भलते टाईम मे क्यु मिली?
अप्रतिम... :)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
तुझ्याकडे यायचंय मला. पाऊस पडून गेलेल्या सायंकाळी, मंद उदास प्रकाशात... मी वाचणार आहे माझी कविता तुझ्या परवानगीशिवाय. असा विचार येतेवेळी फुलदाणीत आलेला निर्जीवपणा विसरता येत नाही. तुझ्यापासून मी काय लपवून ठेवू ? माझ्या ओठापर्यंत आलेला शब्द मला परत गिळता येत नाही. मी तुझ्यासमोर संपूर्ण काळोखी गुहेसारखा. तू फूलपाखराइतकी सहज वावरतेस त्यातल्या एक एक दालनात.! .....
अप्रतिम !! =D>
~ वाहीदा
किंबहुना तू मला फसवूच शकत नाही, हे माझे विधान म्हणजे , मी शांतपणे सारे काही स्वीकारतो आणि आहे त्याला सामोरे जातो. यातले सर्वच माझ्यापासून विलग होणार हे जाणतो मी, पण छातीत असह्य कळ आली की मला तुझी आठवण होते. देण्यासारखे माझ्याकडे काही नाही आणि तुमच्याकडे आहे तरी काय ! असे जेव्हा तु बोलतेस, तेव्हा मला खिन्न वाटते, स्वत;चे रुप एखाद्या जूनाट इमारतीसारखे....!
हा उतारा वाचुन क्षणभरासाठी हताश थकलेला प्रियकर डोळ्यांसमोर तरळुन गेला.
असफल प्रेमाची वेदना जाणवली.
मिसरा गालिब का कैफियत सबकी अपनी अपनी.
सुंदर लेख
आवडला.
अ प्र ती म !! याला मौक्तीक म्हणायचे काय? :-)
हे वाचून असे पुन्हा जाणवले - मिपाच्या समुद्रात अशी अनेक हिरे, माणके, मोती, मोहरा अजून आहेत; ज्यांचे खन करणे बाकी राहिलेले आहे. सुक्ष्मजीव यांचे हा धागा वर काढल्याबद्दल अनेक धन्यवाद.
शप्पथ , जब्बराव लिवलंय .. आज ये खिलजी ढेर हो गया
प्रेमाचं पूर आलाय , जिथून तिथून त्या स्त्रीलिंगी नद्या खळखळ वाहत, दुथडी भरून , या आठवणींच्या
सागराला मिळाल्या .. अन मग मलाही उधाण आलं ..
=======================================================
तुला स्मरून मी हाता लेखणी धरतो
दिवा मालवतो अन पेटवतो एक मेणबत्ती
त्या मंद प्रकाशात मला तू दिसतेस
लेखणी तीच काम करत असते
मेंदू जरी सुन्न असला त्या आठवणींत
तरी हात चालूच असतात
आतून सौम्य धक्के बसत असतात
मेणबत्ती आणि माझं मन दोघेही वितळत असतात
त्या आठवणी , मात्र अश्याच बरसात असतात
कैक पत्रांवर,
तो मन प्रकाश आठवणींची तीव्रता कमी करत असतो
मी मात्र असाच लेखणी घेऊन लिहीत असतो
कितीवेळ याचे भान नसते
हळूहळू ज्योत मंद होत जाते आणि मळवट
अन , त्याबरोबर तुझी आठवणसुध्दा
वा बिरुटे सर
दंडवत घ्या पामराचा
कुठेतरी खोल काळजात एक कळ उठली!
अशी कोणी मैत्रीण(दुर्दैवाने) नसली तरी भावना पार आतपर्यंत जखम करून गेली.
असंच लिहा आणि लिहीत राहा
ते राजकारण सारखं रुक्ष गद्य सोडून द्या तुमची प्रतिभा कोळपुन जाईल त्यात.
__/\__
वा बिरुटे सर
दंडवत घ्या पामराचा
कुठेतरी खोल काळजात एक कळ उठली!
अशी कोणी मैत्रीण(दुर्दैवाने) नसली तरी भावना पार आतपर्यंत जखम करून गेली.
असंच लिहा आणि लिहीत राहा
ते राजकारण सारखं रुक्ष गद्य सोडून द्या तुमची प्रतिभा कोळपुन जाईल त्यात.
__/\__
प्रतिक्रिया
सर
वा! अप्रतिम!
अतिशय सुरेख..
!!
अप्रतिम
सुंदर!
ह्ह्ह्म्म्म्म्म
सहमत आहे.
सहमत
असेच
सहमत!
प्रामाणिक
आभार !
स्फुट आवडले
कोमल
मस्त लेख.
आभार....!
सर, इतकं
अप्रतिम...
अहा.......
हा लेख आहे की काव्य ??
आवडलं!
छान लेख असल्याने वर काढतोय.
हताश थकलेला प्रियकर क्षणभर डोळ्ंयासमोर तरळला
किंबहुना तू मला फसवूच शकत नाही, हे माझे विधान म्हणजे , मी शांतपणे सारे काही स्वीकारतो आणि आहे त्याला सामोरे जातो. यातले सर्वच माझ्यापासून विलग होणार हे जाणतो मी, पण छातीत असह्य कळ आली की मला तुझी आठवण होते. देण्यासारखे माझ्याकडे काही नाही आणि तुमच्याकडे आहे तरी काय ! असे जेव्हा तु बोलतेस, तेव्हा मला खिन्न वाटते, स्वत;चे रुप एखाद्या जूनाट इमारतीसारखे....!हा उतारा वाचुन क्षणभरासाठी हताश थकलेला प्रियकर डोळ्यांसमोर तरळुन गेला. असफल प्रेमाची वेदना जाणवली. मिसरा गालिब का कैफियत सबकी अपनी अपनी. सुंदर लेख आवडला.आयुष्यात घडलेली खरी घटना
मी वाचणार आहे माझी कविता
....
सर हल्ली लिहित नाहित.
जखमा कशा सुगंधी, झाल्यात
अ प्र ती म !! याला मौक्तीक
सुंदर सर
कोण खपल्या काढतय रे...!
पण हे धागालेखक हल्ली कुठेतरी
+१
आईची आन , काय लिवलंय ओ सर
अति घाई , नको ते होई
वाह!
वा बिरुटे सर
वा बिरुटे सर
वाह..