Skip to main content

एकाची सजा सगळ्यांना

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 16/04/2011 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
मान्य आहे, की कोणी एक पाणीपुरीवाला एक घाणेरडे कृत्य करतांना पकडला गेला. शक्य आहे, की असे समाजविघातक आणखीही काही असतील. समाजत घडलेले असे एक उदाहरण पाहिले आणि हातावर पोट असलेल्या ३०० कष्टकरी लोकांचे स्टॉल्स फोडले. वड्याचे तेल वांग्यावर? हे सगळेच स्टॉलवाले असे बेजाबदार होते? अशी शिक्षा ३०० निरपराध लोकांना देणारे हे कायद्याचे रक्षक होते की आणखी कोणी? एका घाणेरड्या कृत्याने येवढी चीड निर्माण केली. मग पोट फुगेस्तोवर खाऊन देखील भूक न भागलेले, आणि पुढच्या सात पिढ्यांची तरतूद स्वीस बँकेत करून ठेवणारे भ्रष्टाचारी, त्यांची किळसवाणी भूक बघून सगळे गप्प का बसतात? त्यांना जाब विचारायला तर कायदा देखील समर्थ नाही. इथे गरीब, मध्यमवर्गी कष्टकरी बरे आयतेच टार्गेट लोकांना सापडले होते. आणि त्यांनी पुन्हा उत्तर हिंदुस्थानातून मुंबईत येऊन चार पैसे कमावण्याचा महान अपराध केला होता! मिपाकरांचे यावर काय विचार आहेत? बातमीचा दुवा- http://news.in.msn.com/national/article.aspx?cp-documentid=5119728

वाचने 5458
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

फक्त ३०० च मारले ? बाकीच्या भय्यांना का सोडले ? असा माझा सवाल आहे . मुंबैत असताना इतकी घाण पाहिली आहे की अरेरे !! :) माझ्या मते पाणीपुरीवाल्या भय्यांसोबत बाकी प्रकारच्या भय्यांना ही चोप देऊन परत पाठवण्यात यावे . :) ह्या लोंढ्यांमुळे फुटणार ती मुंबै एक दिवस :) अरुण सरांनी ह्या चोप मिळालेल्या भैय्यांचे त्यांच्या देशात पुणर्वसन करावे असा एक सुप्त विचार अंतर्मनाला चाटुन गेला. :) - गजोधर पांडे एक बिहारी , सौ बिमारी

In reply to by टारझन

टार्‍या लेका तुला काय कळते का? समाजाच्या विरुद्ध अशी भुमिका घेतली की मग आपण विचरवंताच्या यादीत जाउन बसतो :) उदा :- लोकांनी चित्रकार हुसेनच्या नावानी शिमगा केली की आपण त्याच्या 'चित्रकलेतली डेप्थ, गजगामीनीचा कॅन्व्हास' अशा विषयांचे तोंड फाटेल असे कौतुक करायचे. सचिनचे कौतुक सुरु झाले की आपण त्यानी संघातली जागा कशी अडवली आहे ह्यावर चर्चा करायची. बाँबस्फोट झाले की हिंदू धर्मियांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे मुसलमान तरुण अतिरेकी बनण्याकडे कसे वळतात ह्यावर चर्चा करायची. इ. इ.

In reply to by टारझन

....>ह्या चोप मिळालेल्या भैय्यांचे त्यांच्या देशात पुणर्वसन करावे असा एक सुप्त विचार अंतर्मनाला चाटुन गेला.... सॉरी. हे तुमचे स्वप्नरंजनच रहाणार. इकडे फक्त कायदेशीर परवाना असलेल्या लोकांनाच रहाता येते. सगळे कायद्याप्रमाणेच होत असते. पण ह्या घडलेल्या गोष्टीत वेगळे आहे. कायदेशीर नागरिकांना आपले गाव सोडून ह्या गावात काम केल्याबद्दल चोप मिळतो आणि तिथेच कित्येक बेकायदा लोक वाटेल ते करत मोकाट सुटले असतात. सामान्य जनता काय द्याच ते बोला म्हणून आपापली कामे करून घेते. त्याच्यातल्या हिश्श्यांवर बाबुंपासून खाबुंपर्यंत सगळी आपापली तळी भरतात. त्या तळ्यातले पाणी स्वीस बँकांमधे पूर आणवते. इकडे सामान्य जनता आपला उद्वेग सामान्य जनतेवर काढते. (खरं तर जनतेचा तसा उपयोग करून घेतल्या जातो) कोणी काही बोलले तर "हे आले विचरजंत"म्हणून टर उडवली जाते! धन्य आहे!

In reply to by अरुण मनोहर

इकडे फक्त कायदेशीर परवाना असलेल्या लोकांनाच रहाता येते. सगळे कायद्याप्रमाणेच होत असते.
माझे वाक्य ह्या चोप मिळालेल्या भैय्यांचे त्यांच्या देशात "कायदेशीर" पुणर्वसन करावे असा एक सुप्त विचार अंतर्मनाला चाटुन गेला... असे वाचावे :)

In reply to by अरुण मनोहर

मनसे ने जे केले १००% टक्के योग्यच केले हे फेरीवाले इतके मजुर्डे झाले आहेत , कायदा , पोलिस आणि प्रशासन कशाळाच घाबरत नाहीत. एकाला चोप दिला की बाकी सगळे ताळ्यवर येतील. जे झाले ते योग्यच झाले कारण समाजात अनेक छोट्या आणि मोठ्या अपप्रवृत्ती आहेत , छोट्या टार्गेट केल्या म्हणून मोठ्याना टार्गेट का केल नाही अशी तक्रार करण्याला अर्थ नाही. खुपते तिथे गुप्ते कार्य-क्रमात हल्लीच नरेंद्र दाभोळकर यानी एक छान उदाहरण दिले आहे , एका घरात दहा खोल्यांमध्ये अंधार आहे त्यातल्या दोन खोल्या-मध्ये जर उजेड पाडणार्‍यानना बाकी आठ खोल्या का सोडल्या हे विचारण्या सारख आहे अरुण मनोहरना - एक प्रश्न , तुम्ही अशी पाणी-पुरी खाल्ली असती आणि नंतर तुम्हाला समजले असते तर तुम्ही गरीब , वृद्ध म्हणून सोडून दिले असते काय ? एक धागा निघाला असताना तोच विषय परत काढण्यच प्रयोजन कळल नाही चु. भु. द्या. घा.

In reply to by माझीही शॅम्पेन

फेरीवाले इतके मजुर्डे झाले आहेत , कायदा , पोलिस आणि प्रशासन कशाळाच घाबरत नाहीत
ह्याचा अर्थ ठाण्यात कायदा सुव्यवस्था अजिबातच नाही आहे? खरोखरच असे असेल तर बिहार आणि महाराष्ट्र ह्यात फरक नाही असे म्हणावे लागेल.

समाजाच्या विरुद्ध अशी भुमिका घेतली की मग आपण विचरवंताच्या यादीत जाउन बसतो चुकून विचारजंतांच्या असे वाचले -- स्पा भोजपुरी

एका घाणेरड्या कृत्याने येवढी चीड निर्माण केली. मग पोट फुगेस्तोवर खाऊन देखील भूक न भागलेले, आणि पुढच्या सात पिढ्यांची तरतूद स्वीस बँकेत करून ठेवणारे भ्रष्टाचारी, त्यांची किळसवाणी भूक बघून सगळे गप्प का बसतात? बळी हा कोंबड्या बकर्‍यां सारख्या दुबळ्या प्राण्यांचाच दीला जातो , वाघ सिंहांचा नव्हे , त्या ठीकाणी स्वत: चाच बळी जाण्याची शक्यता जास्त.

यावर विविध प्रतिक्रिया येऊ शकतात. -दुसर्‍या कोणी असे प्रकार करेपर्यंत थांबायचे होते का? सगळे नसतील बेजबाबदार पण रिस्क का घ्या? नकोच ती घाण. - कायद्याचे रक्षक कधी आणि काय करतात ते चांगले ठाऊक असल्याने कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. ह्या कार्यकर्त्यांची ओळख सध्यातरी परप्रांतीय विरोधी अशीच आहे. पक्षाचा पाया पक्का झाल्यावर बदल होण्याची शक्यता आहे. - नेतेमंडळी 'लिटरली लिट्टर' करत नाहीत. त्यामुळे लोक त्याना विचारायला जात नाहीत.एखादा गेलाच तर सात पिढ्यातल्या छटाकभर संपत्तीच्या वापराद्वारे खपवण्याची भीती असते हे ही आणखी एक कारण. - एखाद्या क्ष समाजातल्या व्यक्तिने य बद्दल काही केले तर य क्ष समाज कसा नीच आहे असे म्हणतो हा सरासरी अनुभव आहे. त्यामुळे ही असे घडले असेल. सध्यासाठी इतकेच.

भेळ्वाले पण संडास करुन आल्यावर हात न धुता भेळ करतात अशी तक्रार वाचनात आली....

अगदी असाच विचार माझ्याही मनात आला होता. "त्या" पाणीपुरीवाल्याने जे केलं ते अतिशय घाणेरडं कृत्य होतं आणि त्याबद्दल त्या एकावर कारवाई झाली असती तर योग्यच होतं. परंतु बाकिच्या गाडीवाल्यांची काय चूक? ते सगळेच काय हेच करत असतात का?? की मनसे ने बरोब्बर असे कृत्य करणार्‍या लोकांना हेरून मारहाण-तोडफोड केली??? मनसेने जे केलं ते तर निव्वळ संधीचा फायदा घेऊन पब्लिसिटी स्टंट केल्यासारखं वाटतं.

ठाण्यापासून कल्याणपर्यंत सगळे भय्ये पाणीपुरीवाले आता पळून गेलेत. काही गाडया व स्टॉल्सही तसेच टाकून गेलेत. बेरोजगार मराठी तरूणांना ही फारच मोठी संधी आहे. पाणीपुरीचा धंदा सुरू करण्याची. वडापावचा कॉपीराईट आहे. मग पानी पुरी मनसेचा कॉपीराईट व्हायला काय हरकत आहे. आता शिवपाणीपूरी सुरू करायाला हवी. येवढी मोठी शिवउद्योगाची संधी मराठी तरूणांनी गमावली तर राडे करण्याशिवाय आपल्याला काहीच काम उरणार नाही. पाणीपुरीच्या धंद्यात खूप मोठी संधी आणि कमाई आहे. लघवी करणारा भय्या फितूर भय्या असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. --!! पाणीदार पुरीवाला !!

एकट्या नथुरामची सजा पण सर्व ब्राह्मणांना अनंतकाळ आणि अमर्यादित भोगावी लागत आहे.

क्रिकेट नावाची अफूची गोळी घेऊन आम्ही ढेंगा वर करून पडलेलो आहोत. त्यामुळे बाकी काही करायला सध्या वेळ नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>क्रिकेट नावाची अफूची गोळी घेऊन आम्ही ढेंगा वर करून पडलेलो आहोत. त्यामुळे बाकी काही करायला सध्या वेळ नाही. क्या बात है, क्या बात है !!! एवढी भरभरुन सहमती देण्याजोगा प्रतिसाद आम्हाला गेले कित्येक महिने औषधालाही दिसला नाही :) जोरदार सहमत रे पुप्या ... - ( टुन्न ) छोटा डॉन

भय्ये लोकांच्या गावी रोजगार मिळत नसताना रस्त्यावर पथारी पसरून का होइना पोटाला दोन घास मुंबईत मिळायला लागले होते. अतोनात घाण बाकीचे सहन करत असूनही पैसा बरा मिळत होता. गावाकडे सावकाराचे कर्ज (असल्यास) फेडता येत होते ते सोडून ही दुर्बुद्धी अशी सुचली? आधीच राजकारण्यांचा राग आहे आणि आपल्यामुळे इतर शेकडो भय्यांना त्रास होवू शकतो हे माहीत असायला हरकत नव्हती. मंत्र्यांचे भ्रष्टाचार ही वेगळी गोष्ट आहे. सगळे विषय एकमेकांना जोडून काही साध्य होणार नाही. भय्याचा हा आचारही भ्रष्ट क्याट्यागरीतच मोडतो. असली पाणीपुरी आपल्या प्लेटमध्ये आल्याचा विचार केल्यास आख्ख्या आयुष्यात हा पदार्थ बघूही नये असे वाटते. यातून धडा घेऊन लोकांनी घरी बनवलेले पदार्थ खाण्यावर भर दिला तर बरे होइल. बाहेरच्या पाणीपुरीची चव घरच्या पाणीपुरीला का नाही ते आता सगळ्यांना समजले असेलच!;)

In reply to by रेवती

>>आपल्यामुळे इतर शेकडो भय्यांना त्रास होवू शकतो हे माहीत असायला हरकत नव्हती>> मिलीट्री ट्रेनिंगमधे एकाने काही चूक किंवा गैरशिस्त वर्तन केले की पूर्ण टीमला शिक्षा होते ते आठवले. असाच कायदा सगळीकडे का लावित नाहीत? एखाद्याने खून केला की त्याच्या पूर्ण खानदानाला, किंवा पूर्ण आळीतल्या लोकांना शिक्षा होऊ देत की! >>मंत्र्यांचे भ्रष्टाचार ही वेगळी गोष्ट आहे>> अगदी बरोब्बर बोललात. ते फार उच्च वर्तन आहे. फक्त बॉलीवूड सिनेमा सोडून कुठल्याही समाजाच्या किंवा कोर्टाच्या कक्षेत नाही.

In reply to by अरुण मनोहर

खून वगैरे गोष्टी करताना आधीच त्यांचे वैर असण्याची शक्यता जास्त आहे. येथे भय्याचे सामान्य जनतेने असे काय बिघडवले? राजकारण्यांच्या वर्तनाचा उल्लेख करून आपण म्हणताहात तेही गैरवर्तन आहेच पण एका गैरवर्तनाचा संबंध दुसर्‍या गैरवर्तनाशी लावल्याने कोणतेही कृत्य कमीअधिक वाईट ठरेल का? राजकारण्यांपर्यंत आपण सामान्य असे किती पोहोचू शकतो? भय्यापर्यंत मात्र पोहोचणारे जास्त आहेत. लोकांचे सहजपणे भय्यापर्यंत पोहोचणे हे जसे त्याच्या व्यवसायास तारक आहे तसेच दुष्कृत्य केल्यावर मारणारेही सहज पोहोचू शकतात. प्रांतवाद हा मुद्दा येथे पुसट का होइना (खरे तर ठळकच;) ) आहे. जसे दुसर्‍याच्या घरी गेल्यावर आपण वागणूक चांगली ठेवायचा प्रयत्न करतो तसेच यांनीही दुसर्‍या प्रांतात गेल्यावर बिहेवियर चांगले ठेवायला हवे. भय्यासंस्कृतीने तर जास्तच्.........त्याला राजकीय रंग लगेच देता येतो. पार जीव जाण्यापर्यंत वेळ येते अश्या बाबतीत किती रिस्क घ्यायची हा प्रश्न आहे.

In reply to by गोगोल

पुण्यातले मराठी भेळवाले तरी पाणीपुरीसाठी बिस्लरी पाणी वापरतात आणि अशी जाहीरात करतात. उदा. कल्याण भेळ. तसेच गणेश भेळ वाल्याने इतक्यात आयएसओ सर्टीफिकेट मिळवल्याची बातमी पेप्रात वाचली. अवांतरः क्रिकेटची नशा उतरु दिल्या जाणार नाहीये. आमचा शाळामित्र दिनेश गुडमेवार याचे त्याबद्दल अभिनंदन.

मनसेने जे काही केले (करते) ती एक उत्स्पुर्त प्रतिक्रीया होती (असते). प्रत्येक वेळी राज ठाकरे काही आदेश देत नाही की 'ए जा रे ठोका त्या भैट्यांना', 'ए जा रे घे रे त्याला कोपच्यात', 'ए जा रे, ठोक त्या अबूला', 'वाजव रे खळ्ळ खटॅक', म्हणून. असले विचार मनसेवाले उत्स्पुर्तपणे अंमलात आणत असल्याने कमीत कमी मराठी माणसांना आता आता भैटे घाबरत तरी आहेत. अवांतर: मुंबई, ठाणे, कल्याण इतर महाराष्ट्र यात गुन्हे घडतात यात किती टक्के परप्रांतीय आहेत याची आकडेवारी आहे का कोणाकडे? यात कितीतरी जास्त यादव, मिस्त्रा सापडतील. भयानक रित्या गुन्हे, खुन, दरोडे, आर्थीक गुन्हे करणार्‍यात या परप्रांतीयांचा वरचा नंबर आहे. रात्र परप्रांतीयांची आहे, मराठींनो जागे व्हा! (या सगळ्यात 'निवडणूका जवळ आल्यात' असा गळा काढू नका.) जय महाराष्ट्र!!!! जय मनसे!!! भैट्यांना हाणा खण्णसे!!!!

मी कारवाईचे समर्थन करेन. पण कारवाई महापालिकेतर्फे व्हायला हवी. आणि जे जे उघड्यावर अन्नपदार्थ विकतात अशा सगळ्यांविरुद्ध. मग ते मराठी असोत परप्रांतीय असोत वा इतर कुणी.