काल कर्वे रस्त्यात भरपूर ट्राफिक जाम होते. मोठ्या डेकवर गाणे चालू होते.
उनके नशे मे, उनके नशे मे
उनके नशे मे $$$ जलते रहे,
लडखडाये, लडखडाये कभी कभी संभलते रहे
त्या डेकसमोर छान नृत्यप्रकार चालू होते.
विविध अवयव किती प्रकारे हलवता येऊ शकतात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत होते.आणि शिट्ट्या मारणे, ओरडणे हे लहान मुलांचे खेळसुध्दा मधून मधून होतेच जोडीला.
एकापाठोपाठ सलग ३ वाहनांवर ३ डेक होते. एकीकडे मुन्नी बदनाम होत होती, दुसरीकडे शिलाला तिची जवानीची काळजी पडली होती. आणि पहिल्या ठिकाणी तर उनके नशे मे
सगळेजण जळत होते.आणि त्यांच्या सभोवताली आपले बिचारे जनतेचे रक्षणकर्ते पोलीस लोकांना त्यांची वाहने हाकण्यासाठी मार्गदर्शन करत होते.
तिथून थोडे पुढे गेलो तर २५-३० मुलांचा घोळका गॉगल वगैरे लावून दबांग स्टाइलमध्ये फिरत होती.
नक्की काय प्रकार आहे हे तर सगळ्यांना लगेच कळेल. काल आंबेडकर जयंती.५ मिनिटे विचारात पडलो. पूर्ण आयुष्य आंबेडकरांनी खर्च केले, त्यात त्यांनी कधी अशी मौज मजा
केली असेल काय? नसेल तर कधी करावी वाटली असेल? नक्कीच! पण अश्या प्रकारे नक्कीच केली नसती. ज्या माणसाची जयंती होती त्याचे तत्व, त्याचे गुण यांच्याशी आपला
काडीमात्र संबंध नाही असेच सगळ्यांना बहुतेक दाखवायचे असेल.जयंती साजरी करण्यासाठी इतर उपाय नाहीतच बहुतेक या जगात.कदाचित आंबेडकर आता पृथ्वीतलावर परत आले असतील तर
ते देखील असेच नाचतील का? आपण ज्या समाजासाठी लढलो त्या समाजातल्या लोकांची प्रगती पाहून त्यांना आनंदाश्रू आले असते. उर भरून आला असता.
आंबेडकर जयंतीला आंबेडकरांचे स्मरण होण्यापेक्षा शीलाच्या जवानीवर नृत्य करणे आम्हाला आवडते.आमच्या सारखी ताकद आहे का तुमच्या कडे असाच प्रश्न बहुधा त्या प्रगत तरुणांना विचारायचा असावा.
असो.आंबेडकर हे एक महामानव होते हे सत्य आहे. त्यांच्या जयंती निमित्त त्यांची आठवण होतेच. पण ती विसरू नये म्हणून आता जे प्रकार चालतात त्यापेक्षा इतर मार्गांनी ती जयंती अविस्मरणीय व्हावी ,
यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.कदाचित त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. आणि परत जन्म घेण्याविषयी निर्णय करू शकतील.
वाचने
4453
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे रे किती करंटेपणा
स्वातंत्र्याचा उपभोग ??
अवघड आहे!!
जयन्ति निमित्त
तुमचा मुद्दा नक्की काय आहे??
In reply to जयन्ति निमित्त by ajay wankhede
:(
In reply to जयन्ति निमित्त by ajay wankhede
मी इथे नागपूरलाच काल घेतलेला
In reply to जयन्ति निमित्त by ajay wankhede
जयन्ति निमित्त
ए जा*यवादी .
तिलक तराजु और तलवार इनको मारो
१८ तास सलग अभ्यास
हाण !!
In reply to १८ तास सलग अभ्यास by ramjya
पोटशुळ का?
जयंती, चतुर्थी इ.चा धंदाच झालाय !
काही का असेना, कधीकाळी लोटा
विचित्र प्रतिक्रिया. त्यांनी
येरवड्यात तर सलग 3 दिवस
च्यायचा घो ह्या ट्रॉफिक जॅम
गणेश चतुर्थी पर यहां बार गर्ल्स ने जमकर किया था अश्लील डांस..!