मी एक मिडल क्लास ...............
सकाळी साडे सहाचा गजर वाजतो
तो मी चरफडत बंद करून टाकतो
चला ऑफिसला जायचे (च )म्हणून
रडत - खडत साडेसातला उठतो
मला झालेली असते आंघोळीची घाई
त्यात पेपरला न्यूज असते आज तुमच्या एरियाला
टिंब टिंब कारणामुळे पाणीपुरवठा नाही
कसेबसे ४ मग्गे घेऊन स्नान करावे
कुठ राहिला फेस ,अन साबण तर टॉवेलाने पुसावे .....
कॉर्न फ्लेक्स रोजची चैन , आपल्याला परवडत नाही ,
रोजचचेच कांदे -पोहे ,उपमे घशाच्या खाली उतरत नाही ,
म्हणून कोपर्यातल्या गाडीवर दोन मस्का पाव मारतो ...
कसेबसे आवरून गाडीला किक टा़कतो
समोरच दुधवाला अन धोबी बिल द्या म्हणू छेडतो..
कसेबसे ढाका मारून त्यांना कटवतो
च्यायला नसती कटकट करत पुन्हा करतो गाडी स्टार्ट
पुढच्या चौकात सिग्नल माझीच पहात असतो वाट
कसाबसा सिग्नल पार करत सुटतो
घडी - घडी, घडीत किती वाजलेत बघतो
आज मी घाई घाईत डोक्यात माठ ( हेल्मेट) घालायला विसरतो
बरोबर तीच संधी साधून मला ट्राफिक पोलीस गाठतो
घेरे याला साईडला म्हणून चलन बुक काढतो
जरा तुझ लाईसन पाहू ?कुठ राहतोस तू भाऊ ?
तू नियम मोडला आहे
चलन फाडणे हाच यावर तोडगा आहे
मला वाटत याला कोपच्यात घेऊन दोन लाथा का मारू नये?
तेवढ्यात माझ मन सांगत "अशा लोकांशी नडू नये "
५६ शिव्या देवून (मनात) मी चलन फाडतो ..
(साले रस्ते निट बनवा आधी ,मग हेल्मेटची गरज पडणार कशी ?)
नगरसेवक फक्त आम्हाला वाढदिवसाच्या होर्डींग्स मध्येच दिसत्तात
एरवी ते गटार शुभारंभ ,पाईप लाईन शुभारंभ अशा कामातच बिझी असत्तात
घड्याळात 9 .15 चा काटा पुढे सरकतो
कसाबसा मी ऑफिसला येऊन धडकतो
माझे विनम्र बॉस मला रस्त्यातच भेटतात
" गुड मोर्निंग सर " असे म्हणून आम्हालाच चिडवतात
कोपर्यातला शीपाई खिक्कन हसतो
थांब जरा ,भेट तू, तुझ्या कानाखालीच लावतो
संध्याकाळी माझा जीव शिणलेला असतो
कसबसा मी ट्राफिकशी दोनाचे चार करत घरी पोचतो
आई गरमगरम चहा घेऊन येते
फार काम होत ? किती दमलास म्हणून मायेने विचारते
चला आता थोडी मॅच तरी पाहू ,तर लाईट माउली जाते
४ तासाचे सक्तीचे भार नियमन नुसते
सामान्यांचे तोटेच तोटे....
कालच आमदाराच्या मुलिच लग्न झाल
तिथे अख्या गावाला पुरेल एवढी रोषणाई
तिथे का नव्हते भार नियमन
अन पाण्याची टंचाई
इथे आम्हाला प्यायला पाणी नाही
अन तिथे पाण्याचे कारंजे उडत होते
आम्हाला १० च्या नंतर लौड स्पीकरला बंदी
तिथे रात्रभर डि जे बोंबलत होते .........
साला रोज रोज तेच लाईफ
सामान्यांचे किती बेक्कार लाईफ
वीकेंडला मला गर्लफ्रेंडला बाहेर घेऊन जायचे असते
खिशात हात घालतो तर फक्त ५०० ची नोट ,
महिना अखेरी असते
तीच आपल तूनतून ,आपण मल्टीप्लेक्सला फलाना पिक्चर पाहु
अन मॅक डोनाल्ड मध्ये जाऊन चीझ पिझ्झा खाऊ
मी :- अग तो पिक्चर फार बेक्कार आहे शी ..........
ती :- नाही ,त्यात माझा आवडता रुख रुख आहे आणि तो मी बघणारच आहे
५०० रुपयात काय डोम्बल होणार ?
पिक्चर बघणार कि पिझ्झा खाणार ?
शेवटी मी बळेबळे मांडवली करतो
पिक्चर बघू कधीही, आधी तुला पिझ्झा चारतो
नको नको जाऊ दे आज
आपण मस्त पैकी गप्पा मारुया
आणि पाणी पुरी चाट,
भेळ भत्ता खाऊया
ती हि एक मध्यम वर्गीय
ती पन स्वप्न पाहते कधीतरी मोठे
मी आहे तिचे आभाळ
स्वप्न झालीत मोठे अन आभाळ पडले छोटे
मला ह्या मिडल क्लास इमेजमधून बाहेर पडायचे आहे
कितीही ओव्हर टाईम मारला तरी सॅलरी पुरत नाही
महिना अखेरीला १००० हि हातात उरत नाही
मी काय स्वप्न पाहू अन तिला दाखवू
मला पण कधीतरी "सीग्रम "
चे दोन पेग मारायचे आहे
मला पण अनुभवायचेत श्रीमंती थाट
साल्ला आपली लाईफ काय ?
तोच धोबी अन तोच घाट
चला आता झोपतो ,अपुर्या सुंदर स्वप्नाची पहात वाट .... :)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7025
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहजसुंदर
छान लिहलंय!
वावा मस्त .... खूप
लय भारी!
सही पियु! अतिशय उत्तम!
लय भारी!
मस्त लिखाण ग. एकदम
ओळखलं तुम्हाला, नव कवि का
एक छोटासा प्रयत्न करुन
छान .. मिडलक्लास जीवन आवडते
च्यायला !! काय एकेक दवणीय*
झकास
!!
टारब्बा..
In reply to !! by टारझन
टारु गप्प बस्ला चक्क आज डोळॅ
In reply to !! by टारझन
मस्त
मस्त...!!! छान...
छान लिखाण
मस्त जमलंय!!! आणि विषयसुद्धा
मस्त.
आपण मस्त पैकी गप्पा
कितीही ओव्हर टाईम मारला तरी
छान छान!!
छान .
जमलीय की मस्त.....! बीइन्ग
खुपच छान झालीय कविता
बदललेलं चित्र
खरं आहे ! कविता वाचून डोळे
In reply to बदललेलं चित्र by राजेश घासकडवी
मध्यमवर्गीयाची व्याख्या
In reply to बदललेलं चित्र by राजेश घासकडवी
अगदी हटके कविता हो !
अनिवासी व्यथा कांदे -पोहे
निनाद,
In reply to अनिवासी व्यथा कांदे -पोहे by निनाद मुक्काम …
क्लासिक मुक्तक !
In reply to अनिवासी व्यथा कांदे -पोहे by निनाद मुक्काम …
ज ब रा !!! एकदम कडक !!!
पाणी पुरी
छान लिहिलंय.
सर्व वाचकान्चे आभार