Skip to main content

(दिवस असे हे ढकलायचे __)

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 23/06/2008 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
(दिवस असे हे ढकलायचे रडत रखडत जगायचे !!) चालः दिवस तुझे हे फुलायचे ! झोपाळ्यावांचून झुलायचे !! --------------------------------------------------------------------------- दिवस असे हे ढकलायचे! रडत रखडत जगायचे !! ऑफिसला रोज जाणे ! करता रोजची कामे ! बॉसला पुरुन उरायचे !! जळणे शेजार्‍या वर! सोसेना कलिगचे काम घरातले प्रोब्लेम सोडायचे !! होता पहाट वेळी! उरकावी कामांची यादी !! मनात उत्साह भरायचे !! स्वप्नांच्या या खिडकीपाशी ! घे तू श्वास जराशी ! उद्याच्या आशेवर भुलायचे ! दिवस मजेत जगायचे !! दिवस मजेत जगायचे !!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2732
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

उद्याच्या आशेवर भुलायचे ! दिवस मजेत जगायचे !! दिवस मजेत जगायचे !! वा! क्या बात है... तात्या.

छान विडंबन, वाचायला मजा आली.

छान् विड॑बन केले आहे.

छान् विड॑बन !!!