✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हसन अली - ३

र
रणजित चितळे यांनी
Wed, 04/13/2011 - 13:23  ·  लेख
लेख
हसन अली - २ हसन अली आता बोलायला लागले आहेत. त्यानी चार राजकारण्यांची नावे घेतली आहेत. http://www.chauthiduniya.com/2011/03/truth-about-ali-hasan-black-money-politics.html ह्या येथे अजून ह्या विषयावर माहिती मिळेल. मिपावर लाच का द्यावी, लाच का देऊ नये ह्या वर खुप चर्चा झाली. एक असते सिमा, व ती ओलांडल्यावर होते परिसीमा. आपल्या देशाने लाच घ्यायची व द्यायची ह्याची परिसीमा गाठली आहे. त्या वर वेळीच अंकूश घातला नाहीतर हळू हळू तशी वृत्ती बनत जाईल व आपला देश लाच खाऊ देश म्हणून काही अफ्रिकन देशांसारखा ओळखला जाऊ लागेल. ज्याच्या कडे कौशल्य, कर्तब, शक्ती किंवा बुद्धी असते, आणि परिश्रम करण्याची तयारी असते, तो मनुष्य आपल्या कर्तबगारीवर पैसे मिळवतो. स्वतःचे इमान व स्वतःचा धर्म विकुन नव्हे. थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकुन आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही. जो लाच खातो व देतो तो आपल्या राष्ट्राचा शत्रू ठरतो, मग तो किती का इतरवेळेला राष्ट्रप्रेमाचा आव आणुदे. जो लाच घेतो व लाच देतो तो पापी व राष्ट्रद्रोही असतो असे जेव्हा आपण मानायला लागू तेव्हाच कोठे ह्याला आळा बसेल. चायना देशात अशा देशद्रोह्याला देहांताची शिक्षा ठोठावतात. आपल्या कडे अफजल गुरूला देखील फाशीची शिक्षा आपण देऊ शकत नाही. जन लोकपाल मध्ये लाच घेणा-याला देशद्रोही ठरवण्याचा व देशद्रोह्याला साजेशी शिक्षा देण्याची तरतूद असावी का. आपल्याला काय वाटते. मला वाटते असावी.

Book traversal links for हसन अली - ३

  • ‹ हसन अली - २
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2131 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

>>जन लोकपाल मध्ये लाच

नगरीनिरंजन
Wed, 04/13/2011 - 13:27 नवीन
>>जन लोकपाल मध्ये लाच घेणा-याला देशद्रोही ठरवण्याचा व देशद्रोह्याला साजेशी शिक्षा देण्याची तरतूद असावी का? अशा शिक्षेसाठी जनलोकपाल यायची वाट का पाहावी लागावी? सध्याची व्यवस्था सक्षम असूनही व्यवस्थित राबवली जात नाही हेच तर दुखणं आहे. जनलोकपाल आले तरी न्यायालये तीच राहणार आहेत आणि लोकही तेच.
  • Log in or register to post comments

योग्य आहे

रणजित चितळे
Wed, 04/13/2011 - 13:41 नवीन
आपला प्रतिसाद याग्य वाटतो, जन लोकपाल बिल आल्यावर त्याच्या नावाखाली आपल्या देश बांधणीच्या विविध कामाचा वेग अजूनच हळू होऊ नये म्हणजे मिळवले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा