✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वावर

प — पेशवा, Tue, 04/12/2011 - 05:55
असे पुरुष, पहिल्यांदा मेहेंदीने सजलेले हात आणतात तेव्हा बराच काळ ठेवतात त्यांना सजवलेल्या मखरातून असूयेने बघणाऱ्या नजरांचा काउंटर जितका जास्त तितकी असते त्यांची अभिमानाची लिंग-कॉलर ताठ असे पुरुष, शिकवलेले असते त्यांना लहानपणापासून पाहिलेले असते त्यांनी, काका, मामा आणि बापाला सफाईदारपणे आणलेले हात वापरताना... साला ते चुकत नाहीत शेंडीला गाठ मारून घोकतात सगळ्या ऋचा घेतात कानमंत्र बापच्या मांडीवर असे पुरुष, निवडतात हात परंपरेने घडवलेले लॉस्ट अत्मभान मेथड; परफेक्टेड ओव्हर सेंचुरीज चकाचक घर, रुचकर स्वैपाक, मैथुनी शृंगार साला सगळे चोख रगड रगड रगडतात आणलेले हात आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर उभे करतात दारामागच्या कोपऱ्यात केरसुणीसारखे. असे पुरुष, कोरतात कोपर्‍या पर्यंतचे हात मेल्यानंतर सतीच्या दगडावर कधी एक, कधी दोन, कधी अधिक जेव्हढे जास्त हात तेव्हढे जास्त कर्तबगार काल विंचरताना आत्म्यातील अडगळ जाणवला अशा पुरुषाचा वावर... माझ्या व्यक्त होण्यात दिसतात अचानक कधी त्याच्या अभद्र सावल्या... मी कँसर रोखण्याचे उपाय वाचू लागतो...

प्रतिक्रिया द्या
2188 वाचन

💬 प्रतिसाद (8)

व्वा!

नगरीनिरंजन
Tue, 04/12/2011 - 08:06 नवीन
काल विंचरताना आत्म्यातील अडगळ जाणवला अशा पुरुषाचा वावर... माझ्या व्यक्त होण्यात दिसतात अचानक कधी त्याच्या अभद्र सावल्या... मी कँसर रोखण्याचे उपाय वाचू लागतो... मनाला भिडलं मुक्तक! हजारो वर्षांच्या आर्य परंपरेच्या बेडकीवर पोसलेला जो गंडसर्प अजूनही समाजशरीराला विळखा घालूनच आहे त्याच्या फुत्कारांविरुद्ध असे जितके उद्गार निघतील तेवढं चांगलं. शब्दरचना सुंदर आहे. अजून लिहा.
  • Log in or register to post comments

आवड्ले! नेमक्या शब्दात

डीलर
Tue, 04/12/2011 - 10:13 नवीन
आवड्ले! नेमक्या शब्दात परीणामकारक रचना.
  • Log in or register to post comments

अप्रतिम ...

गणेशा
Tue, 04/12/2011 - 14:44 नवीन
अप्रतिम ...
  • Log in or register to post comments

मुक्तछंदातली कविता आवडली..

विसुनाना
Tue, 04/12/2011 - 14:51 नवीन
उभे करतात दारामागच्या कोपऱ्यात केरसुणीसारखे
कोरतात कोपर्‍या पर्यंतचे हात मेल्यानंतर सतीच्या दगडावर
काल विंचरताना आत्म्यातील अडगळ
या कल्पना आवडल्या. कविता आवडली.
  • Log in or register to post comments

असे पुरुष, निवडतात हात

प्रकाश१११
Tue, 04/12/2011 - 17:36 नवीन
असे पुरुष, निवडतात हात परंपरेने घडवलेले लॉस्ट अत्मभान मेथड; परफेक्टेड ओव्हर सेंचुरीज चकाचक घर, रुचकर स्वैपाक, मैथुनी शृंगार साला सगळे चोख रगड रगड रगडतात आणलेले हात आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर उभे करतात दारामागच्या कोपऱ्यात केरसुणीसारखे. उत्तम.जमलेय !!
  • Log in or register to post comments

वावर

ajay wankhede
Tue, 04/12/2011 - 19:05 नवीन
मी कँसर रोखण्याचे उपाय वाचू लागतो...नुस्ता उपाय वाचुन चालणार नाहि राव्..जालिम औष धच लागेल.या कर्कास
  • Log in or register to post comments

क्या बात है!!! सॉल्लिड!

प्राजु
Wed, 04/13/2011 - 02:02 नवीन
क्या बात है!!! सॉल्लिड!
  • Log in or register to post comments

ट्रेन्ड पुरुषी अहंकाराची

भडकमकर मास्तर
Wed, 04/13/2011 - 19:04 नवीन
ट्रेन्ड पुरुषी अहंकाराची आत्मानुभूती आवडली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा