कचोरी म्हणताच माझ्या तोंडाला पाणी सुटतं. (खरं तर मी इतकी खादाड आहे की अनेक पदार्थांच्या नावाने माझ्या तोंडाला पाणी सुटतं) लहानपणी मी आणि माझा भाऊ तर कचोरी आणून खायचं कारणच शोधत असू. २-३ दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रीणीने कचोरीची आठवण करून दिली. मग काय डोक्यात कचोरीच घोळ घालत होती. इकडे पॅरीसमध्ये आयती विकत आणायचीही सोय नाही. म्ह्णून काल रविवारी कचोरी बनवली होती. त्याचंच वर्णन खाली देतेय...
साहित्यः
१. कचोरी
आवरणासाठी:
२ वाट्या मैदा
३ चमचे तेल/तूप
मीठ
थंडगार पाणी
सारणासाठी:
१ वाटी साल काढलेली मूग डाळ
१ टीस्पून जिरं
१ टीस्पून शोप
१/४ टीस्पून हिंग
१ १/२ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-अधिक)
१ टीस्पून मिरची आणि आल्याचा ठेचा
१/२ टीस्पून गरम मसाला
२ टीस्पून आमचूर (नसल्यास चिंचेचा कोळ)
३ टेबल स्पून तेल
मीठ
तळणासाठी तेल
२. चिंचेची चटणी
१/४ वाटी चिचेचा कोळ
१/२ वाटी गूळ
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून जिरं
१ टीस्पून धणे
१ टीस्पून शोप (ऑप्शनल)
१ १/२ वाटी पाणी
मीठ
कृती:
१. कचोरी
मूगाची डाळ २ तास भिजत घालून जाडसर वाटून घ्या.
आवरणासाठी मैद्यात चवीप्रमाणे मीठ घाला. त्यात तेल/तूप घालून पहिले ते कोरडे मिश्रण व्यवस्थित मळून एकजीव करा. हा मैदा आता थंडागार पाण्याने घट्ट गोळा होईपर्यंत भिजवा आणि ओल्या कापडाने झाकून ठेवा.
सारण बनवण्यासाठी एका पसरट भांड्यात तेल गरम करून त्यात जिरं, शोप आणि हिंग घाला. गॅस मंद आचेवर ठेवा. त्यात मूगाच्या डाळीचं वाटण घालून तेलात एकजीव करून घ्या. आता त्यात वरून मिरची आणि आल्याचा ठेचा, लाल तिखट, गरम मसाला, आमचूर/चिंचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून थोडं शिजू द्या. सारण भांड्याला खालून चिटकू नये म्हणून अधून-मधून चमच्याने परता. ५-७ मिनीटं शिजल्यावर गॅस बंद करून सारण थंड होवू द्या.
भिजवलेल्या मैद्याचे टेबलटेनिसच्या बॉलएवढे गोळे करून त्याची पारी बनवा. त्यात सारण भरून सर्व बाजूंनी पारीची टोके एकत्र आणून (पुरणपोळीप्रमाणे) ती दाबून बंद करा. सारण भरलेला गोळा थोडा लाटून पूरीएवढा बनवा. अश्या सर्व कचोर्या भरून घ्या.
एका कढईत तेल गरम करून घ्या. तेख खूप जास्त गरम नको. या तेलात कचोर्या तांबूस-सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. गरमागरम कचोरी तय्यार!!
२. चिंचेची चटणी
चिंचेच्या कोळात पाणी घालून ते मिश्रण गरम करायला ठेवा. ते उकळायला लागले की त्यात जिरं, धणे, शोप, लाल तिखट, गूळ आणि चवीप्रमाणे मीठ घाला. हे मिश्रण आपल्याला हवे तसे घट्ट होईपर्यंत उकळून घ्या.
चटणी थंड झाली की तीला कचोरीत घालून, वरून कांदा, बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून फडशा पाडा :)
(आम्हाला चटणी झाल्यावर कांदा-शेव करता धीर नसल्याने फोटो न काढताच ताव मारला.)
वाचने
25540
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरा !!
एक नंबर .. ह्याला म्हणतात
In reply to जबरा !! by पक्का इडियट
मस्त!!
खतरनाक... मिपाचे सर्वात
अरे वा!
सही!
खुपच छान....
कसल्या झकास दिसताहेत कचोर्या!
इथे पुण्यात आम्ही लहर आली की
In reply to कसल्या झकास दिसताहेत कचोर्या! by योगप्रभू
स्वत:च स्वत:ला शिक्षा
In reply to इथे पुण्यात आम्ही लहर आली की by परिकथेतील राजकुमार
लंटन
In reply to स्वत:च स्वत:ला शिक्षा by असुर
मस्त. आत्ता जाउन हाणुन येतो.
फारफार पाणी सुटले तोंडाला.
मस्त...
स्मिता, जबरा फोटो आणि
फस्कास दिस्तेय कचोरी...
मस्त आहे कचोरी बाकि शेगाव
फोटू आणि पाकृ छानच! मी एकदा
झक्कास पाककृती
In reply to फोटू आणि पाकृ छानच! मी एकदा by रेवती
बेसन
In reply to झक्कास पाककृती by चित्रा
सारण
In reply to फोटू आणि पाकृ छानच! मी एकदा by रेवती
पाकृ, फटु सगळेच भन्नाट आहेत.
In reply to सारण by स्मिता.
धन्यवाद!
माझ्याप्रमाणेच बर्याच
In reply to धन्यवाद! by स्मिता.
या ना!
In reply to माझ्याप्रमाणेच बर्याच by यशोधरा
आलेच
In reply to या ना! by स्मिता.
झकास
ते दुकान बंद होउन तिथे
In reply to झकास by प्रचेतस
कचोरी...माझा सगळ्यात आवडता
मस्तच!!
वेरी टेस्टी फोटू पण झकास
ए स्मिता, हीच ती खस्ता कचोरी
खस्ता कचोरी
क्या बात है.....
अरे क्लास आहे!
ए, तुझ्या कचोर्या इतक्या
In reply to अरे क्लास आहे! by सानिकास्वप्निल
मी ही हेच म्हणते......तुझ्या
In reply to ए, तुझ्या कचोर्या इतक्या by प्राजु
हा हा हा हा
In reply to मी ही हेच म्हणते......तुझ्या by निवेदिता-ताई
ओ तै, तुम्ही दरवेळी फोटू
In reply to हा हा हा हा by सानिकास्वप्निल
वॉव!
In reply to अरे क्लास आहे! by सानिकास्वप्निल
धन्यवाद!
In reply to वॉव! by स्मिता.
हा फोटो..
In reply to अरे क्लास आहे! by सानिकास्वप्निल
मस्तच
चला बोंबललं ह्या आठवड्याचं कॅलरीजचं गणित!
गणित
In reply to चला बोंबललं ह्या आठवड्याचं कॅलरीजचं गणित! by चतुरंग
इतका वेळ मनाचा निग्रह करून
बरोब्बर!
In reply to इतका वेळ मनाचा निग्रह करून by शिल्पा ब
कचोरि
कचोरी मस्तच
छान
वा !
सापडली बै कचोरी !!! कित्ती
का ग असे रिकामे उद्योग केलेस
का ग असे रिकामे उद्योग केलेस
लाज वाटली लाज.. लोक प्यारिसात
असच म्हणते
हम्म्म........अजूनही करून