✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुंबईच्या मनकर्णिके

श
शरद यांनी
Mon, 04/11/2011 - 09:07  ·  लेख
लेख
मुंबइच्या मनकर्णिके,नेसुनी फिकें वसन हें गहिना तूं जातिस कोठें अशी गडे भर दिशीं, उन्हाचा महिना तलखीची चिकचिक हवा, त्यात मी नवा, जीव घाबरतो भाबडासाबडा सांब, राहूनी लांब तुजकडे बघतों गर्दीचा दर्दी कुणी हिकमती गुणी जवळ घुटमळतो असकारा पाहुन असा, जीवाचा ससा भेदरुन पळतो तूं तल्लख पुरती खरी ! चाबकापरी फिरवसी नयना तूं जातिस कोठें अशी गडे भर दिशीं, उन्हाचा महिना उचलून उंच कुंतलां, मोरकुंचला बांधला वरती ही चोळी थोडी थिटी,तुझी बळकटी दाविते पुरती हा अंचल चंचल गडे वायुवर उडे, नेत्र भिरभिरती टाचेंत उचलले बूट घालती कूट, गोंधळे धरती ! ही फैनाबाजी अशी ग शिकलिस कशी उडवण्या दैना तूं जातेस कोठें अशी गडे भर दिशीं, उन्हाचा महिना चित्राच्या छ्त्रीमधुन चित्र तूं बनुन लगबगा जाशी मी साधाभोळा कवी, तर्‍हा तव नवी कळेना मजशी जरी सांज दूर राहिली तरी उमलली कशी गुल्बशी ! सोन्याची बावनकशी घडवली जशी कुणीं उर्वशी ! भरमाध्याह्नीं उतरली चोरपावलीं चांदणी रैना ! तूं जातिस कोठें अशी गडे भर दिशीं, उन्हाचा महिना वसंत बापट श्री. शंकर वैद्य यांच्या कवितेवर जी टिपणी केली ती जरा डोक्यावरून गेली असे दिसते. असो. दोष माझा ( व मी निवडलेल्या कवितेचा!). त्या डोकेदुखीवर उतारा म्हणून श्री. वसंत बापट यांची लावणी देत आहे. आता मी काही लिहावे असे दिसत नाही. शेवटी लिहावयाचे म्हणजे इतर शाहिरांनी या विषयावर लिहलेल्या समांतर कल्पना व लावणीमधील साम्य. ते राहू दे. या कवितेचा रसास्वाद प्रत्येकाने स्वत:च घडाभर भरून घ्यावा हेच जास्त उचित. हा घडा भरतांना बाहेर आलेले ओघळ रसिकांनी आम्हाला स्नान करण्याकरिता येथे दिले तर सोन्याला सुगंध ! शरद
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
सल्ला

प्रतिक्रिया द्या
1684 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

अतिषय सुंदर कविता .. त्यातही

गणेशा
Mon, 04/11/2011 - 20:45 नवीन
अतिषय सुंदर कविता .. त्यातही मुंबईबद्दल चे वर्णन म्हणजे एकदम मस्तच ... खालील कडवे जास्तच मनाला स्पर्षुन जाते आहे उचलून उंच कुंतलां, मोरकुंचला बांधला वरती ही चोळी थोडी थिटी,तुझी बळकटी दाविते पुरती हा अंचल चंचल गडे वायुवर उडे, नेत्र भिरभिरती टाचेंत उचलले बूट घालती कूट, गोंधळे धरती ! ही फैनाबाजी अशी ग शिकलिस कशी उडवण्या दैना तूं जातेस कोठें अशी गडे भर दिशीं, उन्हाचा महिना अप्रतिम धन्यवाद
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा