Skip to main content

वळवाचा पहिला पाउस

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 11/04/2011 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच अर्ध्या तासापूर्वी आमचे येथे चिंचवडला वळवाचा जोरदार पाउस झाला. हा या मौसमातला पहिलाच पाउस आणि तोही गारांसह. तेव्हा यानिमित्ये जमेल तशी काही छायाचित्रे घेण्याचा मोह आवरला नाही. आभाळ आले भरून कोसळणारा वळीव एका बाजूला वळीव कोसळत असतांना आकाश काही ठिकाणी मात्र निळेच होते. गच्चीवर पडलेल्या गारा. पाउस आणि गारा असा दुहेरी मारा चुकवतांना दुचाकीस्वारांची उडालेली तारांबळ पावसात न्हाल्यामुळे तरारलेली झाडे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8987
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

गारा पडल्या? कसलं सह्ही! :) गोळा करुन खाल्ल्या की नाही? :) आमच्या इथे पाऊसही नाहीये, आणि गाराही :( आणि पडल्या तरी ऑफिसमध्ये असताना मीटींगा, कामे वगैरे सोडून गारा गोळा करायला बाहेर पळता येईल का, ह्याची आता विवंचना पडली आहे.

In reply to by यशोधरा

न खाता कसा राहीन. काही गारा तर लिंबाएवढ्या मोठ्या होत्या. आधी खाउन घेतल्या मग फोटो काढायला घेतले पण तोपर्यंत गारांचा आकारही आणि वर्षावही कमी झालेला होता. पण गारांचा जोरदार मारा चुकवत गारा वेचणे अंमळ कठीणच झाले होते.

वा वल्ली .. एकदम वल्ले वल्ले फोटु काढले की हो ... अवांतर : वल्ली आणि सुक्का हे शेजारी शेजारी उभे राहिल्यास कसे दमट वातावरण तयार होईल ह्या विचाराणे गहिवरलो :) काल महाबळेश्वरात जोराचा पाऊस झाला .. आणि आम्ही कालंही तो आनंद लुटला ;) - टल्ली

च्यायला आमच्या इथे गारा नाही पडल्या >>> हॅ हॅ हॅ ...मागच्या जन्मीची .....असो .. ;) हिंजवडीत पडल्या की गारा

In reply to by सुहास..

हॅ हॅ हॅ ...मागच्या जन्मीची .....असो च्यायला असं असतय होय. म्हणजे पुढच्या जन्मी पण..... असो. बाकी गारा चिंचवड हिंजवडी वरुन पुढे औंधापर्यंत नाही आल्या हे वाईट झाले.

ओलं मन ओलं तन चिंब ओली गात्रं ... वळवाच्या या मोहक तांडवात सुरु झालंय भिजण्याचे सत्र ...

झकास फोटो.. बाकी भाग्यवान आहात.. गारा खायची संधी मिळाली आम्ही अजून गारा पडताना सुद्धा बघितलेले नाही.

In reply to by स्पा

आम्ही अजून गारा पडताना सुद्धा बघितलेले नाही.
एकदाच पाहिल्यात आणि त्या ही चक्क दुबईच्या वाळवंटात. :) (आवांतर : मागे एकदा युएइ मध्ये बर्फ पण पडला होता. नाय नाय सायकलवरुन नाय. आभाळातुन खर्रा खुर्रा 'स्नो' पडला होता.)

गारा पहायला आम्हाला पुण्यात/चिंचवडात यावं लागेल. इथे कोकणात गारा पडल्या तर पुण्याचं काय होईल हा विचार करतेय! ;)

In reply to by पैसा

टीव्हीवर कोकणात मुसळधार पाउस झाल्याचे पाहतोय. यंदा आंबे खूपच महागात खावे लागणारे असे दिसतेय.

चला वळवाच्या पावसात भिजुन वल्ली उन्हं शेकायला मोकळा झाला. मग वल्ली शेट काय म्हणताय अजुन, ते पापडांच काय म्हंणत होता ती काढली का वाळलेली ?

मस्त हो वल्ली आता हापिसात आहे तरी १ चक्कर मारुन आले बाहेर मस्त वाटतेय. लान्ग ड्राइव्ह ला जावे असे वातावरण आहे :)

तेज्यायला हिकड फक्त चार थेंब पौस पडला राव :( असो... गारा पडल्यावर व्हिस्कीचा पेग घेउन गच्चीत न धावल्याबद्दल निषेध !

मौसमातल्या पहिल्या पावसाचे आणि ते ही गारांसकट फोटू बघायला फार छान वाटले. वल्लि यांनी आधी गारा खाऊन नंतर जमेल तसे आकाराने कमी झालेल्या का होईना गारांचे फोटो काढले त्यावर त्यांचे (अम्मळ इनो पिऊन) धन्यवाद! एक वेळ गणपाभौ म्हणतात तश्या दुबईत गारा पडतील पण ऐन एप्रिलात सुरू झालेली मुंबईची काहिली काही कमी होणार नाही असं दिसतंय..... वल्लिभौ, फोटो बघून मजा आली. तुमच्या आनंदात मनापासून सहभागी! कधीतरी पावसात भिजत गारा खाण्याची इच्छा धरून असलेला :-)

सहीच! मी आजवर गारांचा पाऊस एकदाच पाहिलाय. तेव्हाही १०वी ची परिक्षा चालू होती त्यामुळे त्या गारा वेचून खाणे हे अजूनही फक्त ऐकूनच माहिती आहे. बाकी फोटु मस्त, कोसळणारा पाऊस बघायची मजाच वेगळी आहे.

यार वल्लि आम्हि विदर्भात धुवाधार पाउस बघतो.. आता तर तिन्हि ऋतुत पडतो ..(ग्लोबल वार्मिन्ग) फोटो फारच छ्यान....

यार वल्लि आम्हि विदर्भात धुवाधार पाउस बघतो.. आता तर तिन्हि ऋतुत पडतो ..(ग्लोबल वार्मिन्ग) फोटो फारच छ्यान....

मस्तच रे.... खरंच लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या... सुरुवातीला छोट्या गारा अंगावर झेलत फिरायला मजा येत होती.... पण नंतर जसा गारांचा आकार वाढला, तसा मग त्या चुकवण्यासाठी पळापळ सुरू झाली :)

वल्ला रे वल्ला वल्ला..वल्ला रे वल्ला वल्ला.. वळवाके पाउस का दीदार हुआ वल्ला रे वल्ला वल्ला.. आय मीन वल्ली.. लै भारी.. :)

In reply to by स्पा

@ये रे ये रे पावसा.................. >>> तुला देतो स्पा-सा...आपलं स्वारी पैसा... ;-) पण कधी येणार तो या वर्षी....???