कोलंबी /कोळंबी मसाला
साहित्यः
२ कप स्वछ केलेली कोलंबी /कोळंबी
२-३ कांदे बारीक चिरून
२-३ लसूण बारीक चिरून
२-३ कोकम (आमसूले)
दीड टीस्पून लाल तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१/२ टीस्पून हळद
१ १/४ चमचा गरम मसाला
मीठ चवीप्रमाणे
तेल
पाकृ:
तेल तापवून त्यात चिरलेले कांदे आणी लसूण घालून परतणे.
त्यात कोकम्,सर्व मसाले व मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतणे.
मग त्यात कोलंबी घालून सगळे एकत्र करणे.
झाकण ठेवून ८-१० मिनिटे कोलंबी शिजू द्यावी.
शिजलेल्या कोलंबी मसाल्यात आपोआपच कोलंबीचे पाणी सुटेल.
वरून बारीक चिरलेले कोथिंबीर घालून चपाती, रोटी सोबत खायला सुरुवात करावी :)
आवडत असेल तर टोमॅटो चिरून घालणे पण मग कोकम घालू नये.

याद्या
8846
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
मस्तच
धन्यवाद :) खोबरे,लसूण्,कोथिंबीर घालून
In reply to मस्तच by चिरोटा
मस्त
मस्तच.
यम्म
तों.पा.सु.
जबराट फोटु...
कुणीतरी तंदूर कोलंबीची पण
In reply to जबराट फोटु... by मराठमोळा
>>हिट लिस्ट वर आहे वाट पहात
In reply to कुणीतरी तंदूर कोलंबीची पण by गणपा
मस्त.
छान रेसिपी
आई ग्ग... आज भुकेजलेला बसलोय
जौ दे.. आम्ही आपले कोळंबी
मस्तच दिसतंय!
छान