Skip to main content

मेथांबा

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 08/04/2011 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २ कप कैरीची सालं काढून केलेले तुकडे १ कप चिरलेला गूळ १ टीस्पून मोहरी १ टीस्पून मेथीदाणे १ टीस्पून लाल तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे) चिमूटभर हिंग (फोटोत साहित्यासाठी चमच्यात हिंग दाखविले आहे) :) मीठ चवीप्रमाणे तेल . पा़कृ: जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी व मेथीदाणे टाकावे. तडतडले की त्यात हिंग घालावे. . त्यात कैरीचे तुकडे, लाल तिखट व मीठ घालावे. गरज वाटल्यास २ टेस्पून पाणी घालावे व शिजु द्यावे. . कैरी मऊ झाली की त्यात गूळ घालावा व मिश्रण थोडे घट्ट होऊ द्यावे. . गार झाले की मेथांबा हवाबंद डब्यात / बर्णीत भरावा. ७-८ दिवस टिकतो पण फ्रिजमधे ठेवावा लागतो. .

वाचने 11058
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

आवडले :) शेवटचा फोटो छान लगेच खायला घ्यावे असे वाटले.

In reply to by विकास

पदार्थ लाल रंगाकडे झुकणारा आहे हेही साहजिकच आहे. ;)

मस्त दिसतो आहे मेथांबा.

आयला !!! हे काही तरी नविन दिसतय बाँ... खी खी खी. चला मला यक नविन प्रकार समजला. :) पण मी हा प्रकार अजुन चाखलाच नाय ना !!! छ्या. असो. पहिला फोटु मस्त आलाय ( अगदी हिंगा सकट हो.);) (आंबा प्रेमी) :)

मस्तच........मला खूप खूप आवडतो... तयार मेथ्यांब्याचा फ़ोटो मस्त....लगेचच खावे असे वाटतेय

मला तोंडीलावणे म्हणून आवडतो. काहीजणांना अगदी भाजीऐवजीही आवडतो तितका नाही आवडत. अगदी जोरदार उन्हाळ्यात मेथांबा आणखी छान वाटतो.

मेथांब्याच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटले. कर्‍हाडे ब्राह्मण घरांतील गृहिणींची स्वयंपाकातील एक खासियत म्हणजे मेथांबा, असे पूर्वी ऐकिवात होते. सगळ्यात शेवटचा फोटो बघून समाधान झाले. मेथांबा समोर यावा तो असा. ताटात उगा बोटभर तोंडी लावण्यात काही मजा नाही.

निवेदिता-ताई धन्यवाद मेथांबा करून प्रतिक्रिया दिल्याबद्दल :) सगळयांचे आभार :)

मस्त दिसतोय मेथांबा!

हा फोटो "http://farm6.static.flickr.com/5310/5603333552_50cb071d5c.jpg" आवडला :)

मला पण खूप आवडतो मेथांबा. सगळ्यांनी टाकलेले फोटो बघून तोंडाला पाणी सुटले. मल पण इकडे कुठे कैरी मिळते का बघायला हवे.

मस्त ! मस्त ! मस्त !

मी हा वर्षभर (फ्रिजमध्ये अर्थात)टिकवलाय आणि मस्त टिकला आणि अतिशय चवदार झाला.