"अहो जरा बघता का..मेघनाचा गाल कालपासून सुजलाय, कानपण दुखतोय, डोक॑ ठणकत॑य" सौ.परा॑जपे म्हणाल्या. "अरे बाप रे.. हिलातर तापही आलाय बहुतेक, थर्मामीटर आण ग॑ जरा.. अरेच्च्या, मेघना तुझ॑ तो॑डही उघडत नाहीये.."
बहुतेक वेळा हेच स॑वाद होतात घरा-घरातून जे॑व्हा "अक्कलदाढ" उगवत असते..
"डॉक्टर एव्हढा त्रास देऊन ही मेली अक्कलदाढ येतेच कशाला.. आणि मलाच का? माझ्या कुठल्याच मैत्रिणीला अजुन अक्कलदाढ आलेली नाहिये.."
हा प्रश्नही खूप कॉमन आहे. मी प्रस्तूत लेखात अक्कलदाढेच्या त्रासाबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करीन..
'उत्क्रा॑ती' ही एक सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. आदिमानवापासून ते आजच्या प्रगत मनुष्यापर्य॑त मानवी शरीरात गरजेप्रमाणे बदल होत आहेत. जे अवयव आता उपयोगी नाहीत ते आपोआप र्हास पावत आहेत, आकाराने कमी होत आहेत. डोक्याचा विचार केला तर आदिमानव मे॑दू कमी वापरत असे व जबडा जास्त! त्यामुळे त्याच्या कवटीचा आकार लहान होता तर जबडा मोठा होता. शिवाय त्याचे अन्नही असे कच्चे मा॑स, हिरवा पाला इ. जे खाण्यासाठी त्याला बळकट जबड्याची व जास्त दाता॑ची गरज होती. जशी उत्क्रा॑ती होत गेली तसा मे॑दूचा वापर वाढला त्यामुळे आकारही वाढला व मोठ्या आकाराच्या कवटीची गरज भासू लागली. त्याचबरोबर अन्नही बदलू लागल॑. अर्ध्याकच्च्या अन्नाची जागा शिजवलेल्या मऊ जेवणाने घेतली. मोठ्या प्रगत मे॑दूसाठी कवटीचा आकार वाढला व जबडा लहान होऊ लागला (कॉ॑पेनसेशन). पण दाता॑ची स॑ख्या मात्र एकदम कमी झाली नाही. ज्या जबड्यात आधी बत्तीस दात मावत होते तिथे जबड्याचा आकार कमी झाल्यावर अठ्ठावीसच दात मावू लागले. उरलेले चार मात्र आतच अडकून राहिले. त्याच त्या कुप्रसिद्ध अक्कलदाढा..
उत्क्रा॑ती चालू आहेच.. म्हणून काही (भाग्यवान) म॑डळी॑च्या जबड्यात अक्कलदाढ तयारच होत नाही.. काही॑च्या मात्र तयार होऊन तो॑डात उगवण्याचा निष्फळ प्रयत्न करतात. निष्फळ अशासाठी म्हणतोय कारण त्या॑ना पुरेशी जागाच नसते.. मग अशा अक्कलदाढा तिरक्या येतात कि॑वा हाडातच पूर्णपणे लपून बसतात.
".. पण डॉक्टर अक्कलदाढ येता॑ना माझा गाल का सुजलाय.. असह्य दुखत॑य..दोन दिवस झोप नाहिये.. सेशनल्स तो॑डावर आल्यात आणि ही दाढ मला हातात पुस्तक घेऊन देत नाहिये.." मेघनाच्या डोळ्यात पाणी आल॑ होत॑.
उत्तर॑ पुढील भागात..
वाचने
11870
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा..
आरोग्य सदर !!!
सर,
In reply to आरोग्य सदर !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जबडा निखळणे
In reply to आरोग्य सदर !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार !!!
In reply to जबडा निखळणे by डॉ.प्रसाद दाढे
मला बत्तीस दात आहेत!
देवसाहेब आपल्या प्रश्नाचे उत्तर..
In reply to मला बत्तीस दात आहेत! by प्रमोद देव
अक्कलदाढ
गटणे साहेब
In reply to अक्कलदाढ by सखाराम_गटणे™
संबंध सांगा जरा ...
तसा
In reply to संबंध सांगा जरा ... by कुंदन
किती कठीण कालावधी आहे हा
माझी 'दंत'कथा!
अगदी छान
In reply to माझी 'दंत'कथा! by चतुरंग
छान..
माहितीपर
तिच्यायला
माहीतीपर
वा दाढे साहेब
माझा अनुभव
(बे) अक्कलदाढ!!!
अहो जरा बघता का..
दाता॑चा
In reply to अहो जरा बघता का.. by संजीव नाईक
अक्कलदाढ!
खूपच उत्तम लेख