गणपा/नाटक्या (१) - "फ्लॉवर इन चीज सॉस" आणि "वेंग वेंग"
मंडळी,
टारूशेटच्या भाषेत शिवशक्ती-भिमशक्ती एक झाल्या नंतरचा आमचा हा पहिला प्रयत्न. पहिलाच प्रयत्न असल्याने काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा.
असो तर मिपा वरील सुप्रसिध्द बल्लवाचार्य गणपाशेटने यावेळेस एक अफलातून व्हेज पदार्थ दिलेला आहे. त्याचे नाव आहे:
"फ्लॉवर इन चीज सॉस"
साहित्यः
फ्लॉवर १/२ किलो.
चीज.
२ मोठे चमचे मैदा.
१ लहान चमचा मस्टर्ड सॉस.
१ कप दुध.
लाल तिखटं, काळीमीरी पुड.
सजावटीसाठी : काळे ऑलिव्ह मोठे आणि छोटे, गाजराच्या चकत्या, क्रिम चीज.
कृती:
फ्लॉवरचे छोटे (बाईट साइझ) तुकडे करुन घ्यावे.
१/४ कप दुधात पाणी टाकुन त्यात हे तुकडे शिजवुन घ्यावे. नंतर वरुन मीठ भुरभुरुन बाजुला ठेवुन द्या.
चीज सॉस.
पॅनमध्ये २ चमचे ऑलिव्हच्या तेलात मैदा खरपुस परतुन घ्यावा.
आच बंद करुन वरुन थोडं थोडं दुध टाकुन मिश्रण एकजीव करावं. गुठळ्या होउ देउ नयेत.
नंतर त्यात चीज टाकुन परत ढवळावं.
चीज वितळलं की मग त्यात चवी नुसार मीठ, लाल तिखटं, काळीमीरी पुड,मस्टर्ड सॉस टाकुन मंद आचेवर २-३ मीनिटं ढवळावं.
फ्लॉवरचे तुकडे या सॉस मध्ये घोळवुन वरुन थोडं लाल तिखट भुरभुरुन, ओव्हन मध्ये ग्रील मोडवर (फक्त वरुन झळ लागेल असं) ५-१० मीनिटं ठेवा.
या सोबत पिणेकरांची (पुणेकरांची नाही याची नोंद घ्यावी, उगाच पंचाईत व्हायची आणि धाग्याचा खरडफळा व्हायचा) सोय म्हणून माझे या वेळेचे कॉकटेल आहे "वेंग वेंग" (Weng Weng).
साहित्य:
- १/२ औंस स्कॉच व्हिस्की
- १/२ औंस व्होडका
- १/२ औंस ब्रँडी
- १/२ औंस बर्बॉन (Bourbon)
- १/२ औंस टकिला
- २ औंस अननसाचा रस
- २ औंस संत्र्याचा रस
- चमचाभर लिंबाचा रस
- १ चमचा ग्रॅनडाइन
- बर्फ
- सजावटी साठी लिंबाचे काप, चेरी, स्ट्रॉ इ. इ. इ.
कृती:
शेकर मध्ये बर्फाचे खडे घ्या. त्यात अननसाचा आणि संत्र्याचा रस घाला त्यावर सगळी मद्ये ओता आणि चांगले एक मिनीटभर शेक करा. तयार झालेले मिश्रण एका मोठ्या ग्लासमध्ये ओतून घ्या. त्यात ग्रॅनडाइन अलगद सोडा. असा अलगद रस सोडायचा असेल तर एक चमचा घेऊन त्याच्या एका टोकावरून रस ओघळून ग्लासात आतल्या बाजूला अगदी चिकटून सोडा.
आता या कॉकटेलला सजवण्यासाठी लिंबाचा/संत्र्याचा काप ग्लासच्या कडेला अडकवा. त्यावर टूथपिकने चेरी लावा (मी छोटी छत्री वापरली आहे). जर एखाददुसरे फॅन्सी स्ट्रॉ असतील तर त्या ग्लासमध्ये ठेवा.
तर लोकहो लज्जतदार "फ्लॉवर इन चीज सॉस" आणि त्या सोबत "वेंग वेंग" कॉकटेल तयार आहे. हो जाओ शूरू!!!
डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
धन्यवाद...
वाचने
7376
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
खल्लास!
In reply to खल्लास! by नंदन
विजय असो, विजय असो, विजय असो!
In reply to विजय असो, विजय असो, विजय असो! by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्रिवार
In reply to त्रिवार by ऋषिकेश
हाsssssय
जबरा !!!! तोंपासु. जियो !!
ड्युअल पाकृची उत्तम सुरुवात!
मस्त. खुप चीझी असल्याने
मस्त!!
अहाहा.. मस्त दोन्ही प्रकार
अग्ग्गग्गाग्गागा
मिपाकरांना भिषण परिणामांना
झक्कास
मस्त
पेय छान दिसतय आणि गणपाची पाकृ
मास्तर गणपा, माझ्या आग्रहाला
फ्लॉवर जबरा दिसतोय. करेन
झकास
ठोठोठोठोठोठोठोठोठोठोठो
मस्त
हायला! डबल धमाका!!! खल्लास
मस्त. लगे रहो!
डबल मजा..
सही
सह्ही!!
फ्लॉवर इन चीज आणि वेंग वेंग दोन्ही पण मस्तच!
आज माझ्या नावाला साजेश्या
बारच फुटला... - पिंगू