Skip to main content

अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण

अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण

Published on 07/04/2011 - 19:13 प्रकाशित मुखपृष्ठ
अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण समाजसेवक अण्णा हजारे यांच्या "भ्रष्टाचार मुक्ती अभियानाला" पाठींबा दर्शविण्यासाठी आणि "जनलोकपाल विधेयकाच्या" सक्रिय समर्थनार्थ वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने दि. ९ एप्रिलला सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधींच्या वास्तवाने पावन झालेल्या पुण्यभुमीतील बापूकुटीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण करण्याचे ठरले आहे. त्यापुढील आंदोलनाची दिशा एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच जाहिर केली जाईल. ----------------------------------------------------------- दि. ९ एप्रिल २०११ केंद्र शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे अण्णा आज दि. ९ एप्रिलला सकाळी १० वाजता उपोषण सोडणार हे माहित असूनही बापूकुटीसमोर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मग उपोषण सत्याग्रहाचे रूपांतर "विजयी मेळाव्यात" झाले आणि यापुढेही अण्णांच्या आंदोलनाला सक्रिय पाठींबा देण्याचा संकल्प करण्यात आला. "भ्रष्टाचार चले जाव" चे नारे देवून दुपारी १.०० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. बापूकुटीसमोर कार्यकर्ते.

याद्या 2793
प्रतिक्रिया 17

In reply to by प्रास

मनःपूर्वक शुभेच्छा ! -दिलीप बिरुटे

In reply to by सुधीर काळे

आज सोनियामॅडमनीसुद्धा अण्णांना पाठिंबा दिला. म्हणजे? सोनीया गांधी आणि संघ हे एकत्रित कारस्थान करत आहेत? आता तरी पंतप्रधान हजारे इतरांच्या सांगण्यावरून करत आहेत असे म्हणणार नाहीत!

In reply to by सुधीर काळे

>>>>आज सोनियामॅडमनीसुद्धा अण्णांना पाठिंबा दिला. अण्णांची लढाई आणि काँग्रेसपक्षाची लढाई एकच आहे. तेव्हा अण्णांनी उपोषण सोडावं असं त्या म्हणाल्या. :) अरे हो, सुरेश दादा काय बोलले वाचलं काय ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे हो, सुरेश दादा काय बोलले वाचलं काय ? सुरेशदादा. म.टा. मधील मथळ्याप्रमाणे म्हणाले की, "अण्णाला 'गांधी' बनवू नका - जैन" ! पण सोनीयाजींची विनंती आणि "आपण चॉक्केट आणू बक्का तुला" स्टाईलमधील सोनीयाजींचे बालहट्ट शांत करण्याच्या स्टाईलमधील वक्तव्य वाचल्यावर, "(सोनीया) गांधी अण्णांना बनवू नका!" असे म्हणावेसे वाटत आहे. ;)

आज सोनियामॅडमनीसुद्धा अण्णांना पाठिंबा दिला. बाईंच्या धारिष्ट्याला सलाम! आता शरद पवार, सुरेश कलमाडी, राजा यांनीसुद्धा मागे राहू नये! त्यांनीही १०० टक्के पाठिंबा देऊन अण्णांना उपोषण मागे घ्यायची विनंती करावी. ते थोडा वेळ 'जंतर-मंतर'वर जाऊनही बसले असते. पण अण्णाच कुठल्याही 'फुडार्‍या'ला (मॅडमसकट सगळ्यांना) आपल्या मंचावर येऊ देत नाहींत म्हणे! त्यामुळे सगळ्याच 'धुतल्या तांदळासारखे चारित्र्य' असलेल्या 'फुडार्‍यां'ची मोठीच पंचाईत झालेली आहे!

In reply to by सुधीर काळे

नुसते पॉलीटीकल वाक्य आहे. रीड बिट्विन दी लाईन्सः "There can be no two views on the urgent necessity of combating graft and corruption in public life. I believe that the laws in these matters must be effective and must deliver the desired results. I am sure that Anna Hazare Ji's views will receive the government's full attention as we move forward to fight this menace." यात नक्की पाठींबा आहे असे कुठे म्हणले आहे? गव्हर्नमेंटने टेंशनमध्ये येऊन अटेंशन दिले आहेच! पण पुढे काय? उलट पंतप्रधान म्हणत आहेत की आणिबाणीसदृश परीस्थिती होईल म्हणून. ही भिती आहे का धमकी? आणि ते जर हे सोनीयांकडून अ‍ॅप्रूव्ह न करता बोलले असले तर पंतप्रधानांच्या धारीष्ट्याला खरचं सलाम! :-)

एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण हॅ हॅ हॅ!!!! रोजा पाळतायत म्हणा ना!!! तुम्ही पण भलतेच विनोदी बुवा!!!! :)

केंद्र शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे अण्णा आज दि. ९ एप्रिलला सकाळी १० वाजता उपोषण सोडणार हे माहित असूनही बापूकुटीसमोर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मग उपोषण सत्याग्रहाचे रूपांतर "विजयी मेळाव्यात" झाले आणि यापुढेही अण्णांच्या आंदोलनाला सक्रिय पाठींबा देण्याचा संकल्प करण्यात आला. "भ्रष्टाचार चले जाव" चे नारे देवून दुपारी १.०० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.