व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी? भाग २...
ओक साहेब नाडी केंद्रवाले गप्प का? भाग २ पुढे चालू...
आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात असून माझे (ईश्वरनजींचे) स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे.
पुर्व संदर्भ - १. रिसबुडांचा प्रश्न - ‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी?
बी.प्रेमानंदांचे उत्तर – मला काही मोजके (a few) प्रश्न विचारून त्याची उत्तरे मिळाल्यावर तो (नाडीवाचक) आत गेला आणि त्याने आतून एक ताडपट्टी आणली. त्यातून त्याने जी वाचायला सुरवात केली त्यातून माझ्या जीवनाचा संपूर्ण भूतकाळ अगदी १००टक्के बरोबर होता. पण ते नाडीवाचन जे केले गेले ते चुकीच्या म्हणजेच माझ्याबरोबर आलेल्या एका लेडी डॉक्टरच्या पत्रिकेवरून केले गेले होते.(बी प्रेमानंद आपल्या लेखात म्हणाले होते की नाडीवाचकाला गोंधळात टाकण्यासाठी त्यांनी व बरोबर आलेल्या लेडी डॉक्टरनी आपल्या पत्रिकांची आदलाबदल करण्याची हातचलाखी केली होती.) नंतर असे समजले की आमची व आमच्या आई-वडिलांची नावे त्या पत्रिकांवर लिहिलेली होती. ती व अन्य माहिती नाडी वाचकांनी बेरकेपणाने गर्भित (सटल) प्रश्न विचारून विचारून आमच्याकडून मिळवली होती. खरेतर नाडीभविष्य पहायला आलेल्यात आपली काही माणसे (stooges) बेमालूमपणे मिसळून त्यांच्याकडून व नाडीवाचकाकडून माहिती अलगदपणे मिळवून ती ताडपत्रे बनवली गेली होती. (अधोरेखित ओकांचे) य़ात आश्चर्यचकीत होण्याची काहीच गरज नाही. कारण जातकाकडून चलाखीने माहिती काढून तीच त्याला पत्रिकात पाहून भविष्य म्हणून सांगण्याची युक्ती अन्य ज्योतिषी देखील इतकी सर्रास वापरतात. हीच साधी चलाखी नाडीवाले करतात.
माझे (ईश्वरनजींचे)स्पष्टीकरण –
१) अशा तऱ्हेचा लेखात की ज्यात नाडी पट्टयांचे खोटेपणा उघड केला गेल्याचा दावा केला जातो, अचुक व नेमकी माहिती अतिशय महत्वाची ठरते. मात्र संपूर्ण लेखात ते दोघे कोणत्या तारखेला, कोठल्या नाडी केंद्रात जाऊन आपली नाडी पट्टी पाहिली, त्यावेळी नाडीरीडर कोण होता. याचा सालेम या गावाच्या नावाव्यतिरिक्त पुसटसा उल्लेखही त्यात नाही.
२) दक्षिण भारतातील प्रचलित नाडी पट्टी शोधण्याचे काम व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्याच्या ठशांवरून केले जाते. त्यासाठी नाडीकेंद्रात जाताच ठसे घेतले जातात. पत्रिका किंवा कुंडली जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर ती नाडीपट्टीतून येणाऱ्या कुंडलीशी ताडून पहायला उपयोगी पडते. कुंडलीची-पत्रिकेची मागणी नाडीपट्टी शोधायला केंद्रातून केली जात नाही. बी प्रेमानंदांच्या संपूर्ण लेखात त्यांनी व बरोबरच्या व्यक्तीने अंगठ्याचा ठसा दिला असा ते उल्लेख करत नाहीत. हे नमूद करण्यासारखे आहे.
३) त्यांनी नाडी भविष्याला ठोकभावात थोतांड ठरवण्याबद्दलचे त्यांचे मत फक्त एका नाडी पट्टीच्या अनुभवावरून आधारित आहे. एका कुठल्यातरी निनावी केंद्रात कुंडलीवरून घेतलेल्या अशा परीक्षणातून नाडी पट्टीत व्यक्तीची नावे व अन्य मजकूर कोरून लिहिलेला असतो का नसतो हे ठरवण्यासाठीचा तो अंतिम पुरावा म्हणून मानता येणार नाही. उलट त्यांनी सामान्यतः नाड़ीकेंद्रातून दिली जाणारी वही व कॅसेट मिळवली किंवा नाही नसेल तर का मिळवली नाही या बाबत पुर्ण मौन पाळले आहे. त्यावहीत काय लिहिलेले होते याबद्दल त्यांन चकार शब्द लिहिलेला नाही. कारण आम्ही नाडीपट्टतील मजकूर एका ४० पानी वहीत प्रचलित तमिळ भाषेत ग्राहकाने न मागता लिहून देतो. तशी त्यांना मिळालेल्यावहीतील मजकुराची शहानिशा बी. प्रेमानंदांना फुकट करून घेता आली असती. पण नाडीग्रंथांना एका फुटकळ तो ही हातचलाखी करून मिळवलेल्या अनुभवावरून त्यांना संपुर्ण नाडी ग्रंथांना एका झटक्यात थोतांड म्हणायची घाई झाली होती. शास्त्रीय प्रयोगाचे पुनःपुन्हा परीक्षण हा निष्कर्ष त्यांनी का पाळला नाही याची कान उघाडणी कोण करणार?
२. रिसबुडांचा प्रश्न – जेंव्हा त्या नाडी वाचकाने त्या लेडी डॉक्टरच्या नावाचा व व्यसायाचा अचुक उल्लेख सांगितला त्यात ती बालरोगतज्ञ( Paediatrician) आहे की बाळंतपणाची (gynec) तज्ञ आहे ह्या फरकाला फारसे महत्व रहात नाही.
बी.प्रेमानंदांचे उत्तर – नाही कसा, त्यामुळे फार मोठा फरक पडतो. कारण नाडी वाचक तिच्या बद्दलचे भविष्यकथन माझ्या कुंडलीवरून करत होता. यारून असे सिद्ध होते की तो ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून ते करत नव्ह्ता. आम्ही आमच्या कुंडल्या आमची व आमच्या पालकांची नावे खोडून त्याला दिल्या होत्या. त्याच्या चुकीच्या कुंडल्यांवर आधारित भविष्यकथनामुळे आम्हाला हसू दाबुन ठेवणे अशक्य झाले.
माझे (ईश्वरनजींचे)स्पष्टीकरण –
१. श्री.प्रेमानंद आपण केलेल्या हातचलाखीचा उगीचच गवगवा करत आहेत. कारण त्यांनी कुंडल्यांची अदलाबदल केल्याने नाडी वाचकाच्या दृष्टीने फारसा फरक पडत नाही. बऱ्याचदा अनेकजण आपल्याजवळच्यांच्या नाडी पट्ट्या पहायला हाताच्या आंगठ्याचे ठसे त्यांच्या अपरोक्ष आणतात. जेंव्हा नाडीपट्टी सापडते तेंव्हा समोर बसलेल्याकडे पाहून भविष्य कथन करतात त्याचा अर्थ असा होत नाही की ज्याने ते ठसे प्रस्तूत केले त्याचे ते भविष्यकथन असते. पट्टी वाचली जात असताना ती व्यक्ती समोर हजर आहे किंवा नाही याचा यामुळे फरक पडत नाही.
२. या ठिकाणी ते म्हणतात की आम्ही आमच्या कुंडल्यांवरील नावे खोडून त्याला दिल्या होत्या. पण त्या आधीच्या उत्तरात ते म्हणतात (अधोरेखित केलेले वरील वाक्य वाचा ) की आमच्या कुंडल्यांवरील नावे वाचून त्यांनी नाडी पट्टीतील माहिती असल्याचे भासवले. यातले खरे काय ? मनाला येतील ती उत्तरे ठोकुन द्यायची असा खाक्या किती दिवस कामाला येणार?
३. रिसबुडांचा प्रश्न - मला तर उलट त्या नाडीवाचकाच्या हातचलाखीवर हसण्याऐवजी त्याने १०० सत्यमाहिती शोधण्याच्या त्याच्या कसबाचे कौतुक वाटले असते....
भाग २ समाप्त पुढे चालू...
प्रतिक्रिया
मी अहमदनगर मध्ये राहतो मला
नाडी केंद्रांचे पत्ते सांगावेत अशी फरमाईश
<<<त्यामुळे मी नाडी
ह्याला म्हणतात कोति मनोवृत्ती.........
अगदी अगदी...मला तर भारीच
धन्यवाद
पहिला पाढा पंचावन्न!!