मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बबठ्ठू

वैशाली हसमनीस · · पाककृती
साहित्य--एक वाटी चणा डाळ,एक वाटी गूळ,एक वाटी ,वेलची पूड,एक वाटी मैदा, तेल क्रुती--प्रथम चणा डाळ शिजवून कोरडी करुन घ्यावी,त्यात गूळ घालून परत ५मिनिटे शिजवावी,वरून वेलची पूड घालावी.मैद्यात थोडे तेल व पाणी घा लून भिजवावां. नंतर सारण जाडसर वाटावे.सारणाचे लहान लहान गोळे करावेत.मैद्याची पारी मोठ्या पुरीसारखी लाटावी.त्यात सारणाचा लहान गोळा भरून सारण सर्वत्र पसरेल इतपत हलक्या हाताने लाटावे.तव्यावर तूप घालून खरपूस भाजावे.दोन्ही बाजूने भरपूर तूप सोडून भाजावे. वि.सू.-हा पदार्थ भरपूर तूपयुक्त असल्यामुळे उश्मांक जागरुक असण्यारांनी थोडाच खावा.

वाचने 4485 वाचनखूण प्रतिक्रिया 5

शितल 22/06/2008 - 07:49
मस्त लागत असेल हे बवठ्ठु , साधारण पुरणपोळीसारखे चवीला लागत असेल ना.पण तुप जरा जास्त त्यामुळे आणखी मस्त.

भाग्यश्री 22/06/2008 - 10:31
सही वेगवेगळ्या रेसिपीज येत आहेत.. सगळ्या ट्टुट्टु आहेत का! ( पेसरट्टू,बबठ्ठु!) :) http://bhagyashreee.blogspot.com/

विसोबा खेचर 23/06/2008 - 06:37
वा! पुरणपोळीचाच प्रकार दिसतो आहे! बाय द वे, 'कॅलरी कॉन्शस'ला 'उष्मांक जागरूक' हा मराठी शब्द आवडला! :) आपला, तात्या कलंत्री.