परवा 'दाढ दुखत्येय' म्हणून ठणाणा करत डेन्टिस्टकडे गेलो, तर तिने ती दाढ काढायला लागेल हे शुभवर्तमान दिलंन! अक्कलदाढ असल्यामुळे दुसरया एका तज्ञ्याकडे पाठवलंन. मी निमूटपणे त्या तज्ञयासमोर जबडा वासून बसलो. एकंदरीत प्रकार बघून म्हंटलं आता बहूदा "तासभराची निश्चिंती झाली बगूनाना sss ". पण त्या प्राण्याने दाताड बधीर करायला ३० सेकंदात ३ इंजेक्क्षनं दिलीन, जेमतेम पाव मिनीट थांबला नी मी सरसावून बसतोय तोवर पुढच्या ३० सेकंदात पकडिने दाढ काढून मोकळा! हे म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेला बसावं, नी 'केशवाय नमः, नारायणाय नमः...' म्हणून आचमन संपतंय तोपर्यंत गुरूजीनी 'हं चला, नैवेद्य आणा, सगळ्याना आरतीला बोलवा' म्हणावं तसं झालं !
असो, पटकन् सुटका झाली म्हणून आनंद पण झाला आणि त्या सद्-गृहस्थाने माझा खिसा केवळ मिन्टाभराच्या करामतीने बराचसा हलका केल्याच्या जाणीवेने कळ पण आली.
- (बत्तीसावा गमावलेला) मिसळपाव
वाचने
16520
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो...
भडकमकर मास्तर
मजेत
आणि खर्च
In reply to मजेत by शितल
मिपावर दोन दंततज्ञ
मिपावर दोन
In reply to मिपावर दोन दंततज्ञ by चतुरंग
लई भारी चतुरंगराव!
In reply to मिपावर दोन दंततज्ञ by चतुरंग
आम्ही
हो ना!
In reply to आम्ही by भडकमकर मास्तर
क्ष किरण
दात कोरून पोट भरण्याचा अधिकृत
In reply to क्ष किरण by श्रीमंतपेशवे
उचकटता येते
चौकशी...
आम्ही
In reply to चौकशी... by विसोबा खेचर
दात काढणे
वाट पाहतो..
In reply to दात काढणे by डॉ.प्रसाद दाढे
अगदी !! मला
In reply to दात काढणे by डॉ.प्रसाद दाढे
बाय द वे,
पण माझ्या
In reply to बाय द वे, by डॉ.प्रसाद दाढे
पण माझ्या
In reply to बाय द वे, by डॉ.प्रसाद दाढे
दंतवैद्या
दंतवैद्या
In reply to दंतवैद्या by अवलिया
आपल्याबद्दल आदर वाढीस लागलेला
In reply to दंतवैद्या by भडकमकर मास्तर
दंतकथा..
या विषयावर पुढे डॉ. दाढे किंवा भडकमकर मास्तरांनी लेख लिहिले का?
त॑बाखूमुळे दात किडण्यास प्रतिब॑ध होतो हे सत्य आहे पर॑तु.. त॑बाखूमुळे तो॑डाचा कर्करोग होतो हे त्याहून दाहक सत्य आहे. ते॑व्हा मित्रा॑नो, सुपारी, गुटखा वा त॑बाखू अजिबात खाऊ अथवा चघळू नका. दात किडला तर जिवास धोका नाही शिवाय रूट कॅनाल करून वाचविता येतो, काढून दुसरा बसविता येतो पण जबड्यास, जिभेस वा गालास कर्करोगाने ग्रासले तर फार मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. चेहरा विद्रूप होतो, जबडा साधा वरणभात खाण्याच्या लायकीचाही उरत नाही.. परिणाम अतिशय भीषण आहेत. मी मु॑बईच्या टाटा मेमोरियलमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले असून मुखकर्करोग प्रतिब॑ध व उपचार हे माझ्या व्यवसायाचाच एक भाग आहेत. ह्याविषयावरही एक सचित्र लेख लिहितो लवकरच.. पण माझ्या मित्रा॑नो माझे हे सर्वा॑ना कळकळीचे आवाहन आहे की कृपा करून सुपारी, त॑बाखू कि॑वा गुटख्याच्या भयानक व्यसनात गुरफटू नका, हे सु॑दर मानवी शरीर नासवू नकाया विषयावर पुढे डॉ. दाढे किंवा भडकमकर मास्तरांनी लेख लिहिले का? असले तर दुवा द्यावा, नसले तर या डॉक्टरद्वयींनी या महत्वाच्या विषयावर नक्की सचित्र लेखन करावं हे सांगण्यासाठी हा लेख वर आणतो आहे. (बाय द वे: गेल्या बर्याच दिवसांत या दोघांपैकी कुणीही मिपावर आलेलं दिसलं नाही, चांगले लेखक आणि प्रतिसादक असलेली अशी मंडळी पुन्हा मिपावर दिसायला लागली तर बरं वाटेल.)मीहि वाट बघतोय
In reply to या विषयावर पुढे डॉ. दाढे किंवा भडकमकर मास्तरांनी लेख लिहिले का? by बहुगुणी
अक्कलदाढ काढण्यावरती
In reply to मीहि वाट बघतोय by मिसळपाव
हे घ्या सापडले ते दोन भागांचे दुवे
In reply to अक्कलदाढ काढण्यावरती by भडकमकर मास्तर
ही शोधाशोध करतांना लक्षात आलं की पूर्वी ज्या दुव्यांचे URLs http://www.misalpav.com/misalpav/node/***** असे होते, ते लेख आता नव्या घरांत गेल्यावर http://www.misalpav.com/node/***** अश्या URL वर सापडतात.एकहि प्रतिसाद न वाचता
छ्या! कैच्याकै प्रतिसाद.
एका मिनिटात दात काढण्याचा