मेंदी लावलेले हात "हातात घ्यायला" जास्त आवडतात. मेंदी नीट बघण्याचा बहाणा चांगला असतो.( अननुभवी लोकाना एक अनाहूत सल्ला- तसे हस्तसामुद्रिक शिकलात तरीही फायदा होऊ शकतो.)
मस्तच ... मी ही थोडी वर्ष मागे गेले. आमच्या शेजारच्या आवारात मेंदीची झुडपं होती. सुट्ट्यांमधे आम्ही थोड्याशाच ज्या मुली होतो त्या मेंदीची पानं अक्षरशः ओरबाडून आणायचो, बिल्डींगच्या मागे टाकी होती तिथे ती वाटायची आणि थोड्या वेळात उत्साह संपला की ती धुवून टाकायची!
पुढे मी थोडी मोठी झाल्यावर माझ्या चुलत बहिणीला मेंदी काढायची हौस असायची. तिची चित्रकलाही उत्तम आणि माझा हात तिच्यापेक्षा मोठा, मेंदी खूप रंगायची, मेंदी काढून घेण्यापुरतातरी खूप पेशन्स वगैरे असल्यामुळे गणपती, दिवाळीत ती दोन्ही हातभर मेंदी काढून द्यायची. शाळेत मी खूप भाव खाऊन घ्यायचे.
अगदी गेल्याच आठवड्यात मकीने हातावर मेंदी काढून दिली ... आणि पुन्हा तेच दिवस जगता आले. टिवल्याबावल्या, गप्पा आणि एकीकडे हातावर मेंदी! पुढे दोन-तीन दिवस थोडाजरी कंटाळा आला तरी हातावरच्या मेंदीचा वास घ्यायचा ... एकदम मस्त वाटत होतं.
मेंदी काढलेले हात मलाही आवडतात ... आणि माझ्यासारख्या लोकांनी काढलेलं डिझाईन कसंही वेडंबागडं जरी आलं ना तरी मेंदी रंगली की छानच दिसते.
असेच म्हणते. असेच आमच्याही इथे मेंदीची झुडुपे असत. त्यांना वाटणे हा एक दिव्य प्रकार असायचा. आधी प्लास्टिक हातावर घालून मग ती मेंदी वाटायची, नाहीतर मेंदी वाटण्याऐवजी हाताला आधीच रंग लागायचा.
नंतर कोन मिळायला लागले तेव्हा डिझाइने वाढली. तोवर (स्वच्छ) खराट्याच्या बारीक काडीने किवा आगपेटीच्या काडीने मेंदीची डिझाईने काढत असू. ते बारीक कोरीवकाम कोनांशिवाय शक्य नव्हते.
लेख खूपच आवडला.
मेंदीच्या पानावर .. गाणेही आठवले.
मेंदी काढून घ्यायला मलाही पुष्कळ आवडते. आता मितान आणि अदिती यांनी इतके लिहिलेय, की जणू ते माझेच म्हणणे असावे. मी देखील माझ्या बहिणीला या मेंदीसाठी मस्का मारायचे आणि ती जाम भाव खायची. तळव्यावरच्या ओल्या मेंदीचा सुगंध, नंतर ती सुकल्यावर गालावर हात फिरवताना होणारा खरबरीत स्पर्शासोबत मंद वास.. आणि नंतर कित्येक दिवस टिकणारी काळीशार लाल मेंदी ( माझ्या हातावर मेंदी अंमळ जास्तच रंगते ;) )सगळे अगदी मनापासून आवडते.
एकदा कॉलेजमध्ये काही कार्यक्रम होता. दोन मुली मेंदी काढून देत होत्या. त्या दिसल्याक्षणी काही विचार न करता त्यांच्यासमोर हात पसरला, आणि मग पोटात कावळे कोकलू लागल्यावर मैत्रिणींना, "ए मला भरव" "मला पाणी पाज" करून छळले. हात जरा वाळले न वाळले तोच समोर स्कॅनर दिसला. मग काय, फोटो काढण्यापेक्षा हातावरची नक्षी सरळ स्कॅन केली.
परवा बिकांच्या घरी मस्त मेंदी सोहळा रंगला. शनिवारी रात्री चालू झालेले प्रकरण रविवारी दुपारी 'फिश' ची मेंदी काढून संपले. हाताला पाणी लागू द्यायचे नाही म्हणून पोरींना पढवून ठेवलेले त्यांच्या आईबाबाला किती दिवस भोवले हे अर्थातच विचारले नाही. नंतरही परत आल्यावर एका मॉलमध्ये मेंदी काढणारा दिसला. माझा डावा हात मीच रंगवला होता. मग उजव्या हातावर त्या माणसाकडून मस्त मेंदी काढून घेतली. तो रंग अजूनही उतरला नाहीए. (त्याचाही फोटो लावायचाय पण कॅमेर्याने ऐन वेळेस राम म्हटले. :( )
मला पण मेंदी अतिशय आवडते. बाकि कधी नाही तरी श्रावण म्हणुन अन मुलीच्या नावाखाली मी ही थोडी फार रंगुन घेते. पन ही कोनाची मेंदी पटकन जाते आपली पानांची कशी हळु हळु फिकट होत जाते तस नाही .
लिखाण मस्तच. आवडल.
छान लिहिलंय...
मलापण मेंदी काढून घ्यायला आवडते...लहानपणी मी पण मोठ्या मुली मेंदीच्या पानापासून मेंदी तयार करताना लुडबुड करायचे...मस्त धुंद करणारा सुगंध येतो.
पण आजकाल कसली मेंदी असते कोण जाणे !! रंगून जरा दोन दिवस झाले कि रंग जायला लागतो आणि विचित्र दिसते..
नुसता लेख वाचूनच मनातल्या मनात मेंदीचा दरवळ आला.
आपल्या मेंदूतच तो कोरला गेला असावा!:)
श्रावण सुरु झाल्यावर एकदा मेंदीची आठवण आली होती.
मलाही मेंदी काढून घेण्याची भारी हौस होती. अजूनही आहे पण फारशी वेळ येत नाही.:(
माझ्या आतेबहिणीला आम्ही फार मान द्यायचो (तिने न मागता); कारण तिने मेंदीचा क्लास अपूर्ण केला होता.;)
चार दिवसाच्या क्लासचा पहिल्या दिवशी ती विसरली, दुसर्या दिवशी मात्र गेली, तिसर्या दिवशी अर्धाच वेळ जाता आले नंतर आजारी पडली म्हणून क्लास बुडला. तरीही ती मेंदी चांगली रेखाटायची.
पूर्वी रात्री मेंदी काढून झाल्यावर सगळ्याजणी मेल्यागत झोपत असत.;)
सकाळी पसरलेल्या गाद्यांवर सगळीकडे मेंदीच मेंदी. आई वेगळी बेडशीटस देत असे ती यामुळेच.
माझ्या सासूबाई सांगतात कि त्या लहान असताना पानं वाटून हातावर थापायची आणि मुठी वळून त्यावर फडकी बांधून ठेवायचे. सकाळी हात धूवून टाकायचे. एवढीच काय ती मेंदी!
मस्तच लेख आहे !!
मला मेंदी काढून घ्यायला खूप आवडायचे.
अलिकडे फार कष्टाने मेंदी काढू शकतीय. डिझाईन्स जमतात, परंतू वेळ फार लागतो! पण तो आनंद अफलातून आहे..
ही गेल्या नागपंचमीला काढलेली मेंदी.. 'फक्त' ३ तास लागले! :(
गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि महाराष्ट्रातले हात एकाच मेंदीने रंगत होते. प्रत्येकीच्या मनातली मेंदी दरवळत होती.
हे वाक्य जास्त आवडलं! :)
बाकी "मेन्दी" मस्तच्च!
मेंदीच्या आठवणीने मन बालपणात धावले.
बहिणींना मेंदी काढायची असली की चोरी करण्याच्या कामावर आमची नेमणूक व्हायची (आवळे, कैर्या, चिंचा-बोरे आणि मेंदी यांच्या चोरीसाठी धाकटी भावंडे फार उपयुक्त ठरतात) हे काम वाटते एवढे सोपे नसायचे. देशपांड्यांची म्हातारी फार खवट. डोळ्यात तेल घालून कुंपणावरच्या मेंदीवर लक्ष ठेऊन बसायची. शिव्या तर इतक्या घाणेरड्या द्यायची, की पुरुषही लाजावेत. आम्ही शिताफीने मेंदीचा पाला पळवायचो. घरी तो पाट्यावर वाटण्याचे उद्योग बहिणी करायच्या. त्यांच्या त्या मेंदीत आम्हाला फार रस नसे. कामाचा मोबदला म्हणून बहिणीच्या शाळेच्या लायब्ररीतील फास्टर फेणेचे पुस्तक वाचायला मिळे. त्यात आम्ही खूश.
कुणाची मेंदी कशी आणि का रंगते, यावर बहिणींची आणि मैत्रीण मंडळाची चर्चा रंगत असे. काहीजणींची मेंदी इतकी लालबुंद होई, की लवकरच ती काळपट पण होत जाई. मोठ्या बायका सांगत, की ज्यांच्या अंगात उष्णता जास्त असते त्यांची मेंदी लवकर रंगते. मेंदी लवकर आणि लालभडक रंगावी, म्हणून अनेक उपाय केले जात. त्यापैकी एकच उपाय लागू पडला. मेंदी वाळायला लागल्यावर त्यावर साखरेचे पाणी शिंपडून ती पुन्हा ओलसर करायची. म्हणजे नक्षी हातावरुन पडू द्यायची नाही.
पुरुषवर्गाचा आणि मेंदीचा फार संबंध नसे. मुस्लिम पुरुषांना मात्र मेंदी लावून केस आणि दाढी रंगवण्याची फार आवड. ही प्रथा अरबांकडून चालत आलेली. हातांवर लावण्याखेरीज पांढरे केस तांबूस करण्यासाठीही महिलावर्ग मेंदी वापरत असे. अजुनही डाय आणि गार्निएरपेक्षा अनेकजणी काली मेंदी लावणे पसंत करतात.
'मेंदीच्या पानावर मन अजुन झुलतंय गं' हे स्त्रीमन तर
'तळव्यावर मेंदीचा अजुन रंग ओला, प्रीत तुझी माझ्या मनी घेते हिंदोळा' हे पुरुषाचे मन.
मितान यांचे लेखन दाद देण्यासारखे...
एक कडू गोड आठवण-- आमच्या सोसायटीत मेंदीची भरपूर झाडे होती. पण त्याचा पाला तोडून आणला की पुढचे काही तास हात कडू होत. चुकून हात तोंडात गेला की तोंड कडू होत असे.
अरे वा. मस्त लेख.
मेंदी चा दरवळ आला.
लांबसडक शिडशीडीत नाजूक बोटे, त्यावर टोपी लावावी तशी पहिल्या पेरापर्यन्त दाट मेंदी . अन त्या नंतर तळहातावर कोपरापर्यन्त बारीक वेलबुट्टीची नक्षी......
हा लेख वर उकरून काढून असं काहीतरी मला लिहिता येत होतं याची आठवण करून देणारांचा णिषेढ !!!!
कडकडीत थंडीमुळे शिडशिडीत बोटांच्या काड्या वळलेल्या असताना मेंदीचे कौतुक करणार्या विजुभाऊंचाही णिषेढ !!!! (पळा..)
प्रतिक्रिया
आवडला
+ १
+२
+३
मेंदी लावलेले हात "हातात
थोडी वर्ष मागे गेले मी पण!
+१
सही..
मला पण मेंदी अतिशय आवडते.
आठवण.
छान लिहिलंय... मलापण मेंदी
नुसता लेख वाचूनच मनातल्या
+१
नुसता लेख वाचूनच मनातल्या मनात मेंदीचा दरवळ आला.खास मितान-टच!मेंदी
सुरेख आठवण जागवलीत. तुमची
मस्तच लेख आहे !! मला मेंदी
मस्त आहे..मलापण द्या काढुन
सुंदर दिसतोय हात! तू डावखुरी
हो, मी लेफ्टी!
सुंदर :)
मके, भाग्यश्री, धन्यवाद
गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि
मस्त!!!
सुरेख !
सुंदर लेख....
मितान यांचे लेखन दाद देण्यासारखे...
मस्त
अरे वा. मस्त लेख.
हा लेख वर उकरून काढून असं