मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंजन कांचन करवंदीच्या देशा

योगेश२४ · · कलादालन
मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा महाराष्ट्र गीतात ज्या अंजन कांचन आणि करवंदीचा उल्लेख केला आहे त्या फुलांचे छायाचित्र किती जणांनी पाहिलेत. ? :-) ज्या फुलांच्या सौंदर्याची भुरळ कवीलाही पडली आणि त्यांनी महाराष्ट्र गीतात स्थान दिले त्याच अंजन, कांचन आणि करवंदीच्या फुलांचे प्रचि आज आपण पाहूया. :-) अंजन कांचन करवंद
लेखनविषय:

वाचने 8655 वाचनखूण प्रतिक्रिया 24

प्रचेतस 05/04/2011 - 12:19
मस्त रे योगेश, अरे ही झाडे सह्याद्रीत कितीतरी वेळा पाहिली होती पण नावे माहिती नव्हती (करवंद सोडून).

गणेशा 05/04/2011 - 16:04
अप्रतिम फोटो खुप आवडले. पहिल्या ३ फुलांना कंचन म्हणतात ते मला माहितच नाहि .. माझ्याकडे ही त्या फुलांचे सुंदर फोटो आहेत.. आत्ता सांदण दरीला गेलो होतो .. तेंव्हा कॅमेरातुन मी आणि वल्ली ने काढलेले फुलांचे फोटो हे याच फुलांचे आहेत असे वाटते ...

पांथस्थ 05/04/2011 - 16:11
मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
हि आमची एकदम आवडती कविता आहे. अनेक दिवस (खरेतर अनेक वर्षे) मनात अंजन आणि कांचन ह्या वृक्षांबद्दल कुतूहल होते. आज तुमच्या छायाचित्रांमुळे योग जुळून आला. मना:पासुन धन्यवाद! जय सह्याद्री! जय महाराष्ट्र!!

llपुण्याचे पेशवेll 05/04/2011 - 17:39
१. कांचनाच्या फुलाचा गुलाबी रंग मला फार आवडतो. आमच्या सोसायटीतल्या कांचनाच्या झाडाची पाने झोपडपट्टीतले चोरटे आपट्याची पाने म्हणून चोरून नेतात. अक्षरशः झाड ओरबाडून नेतात. फार वाईट वाटते. २. अंजन फूल पहिल्यांदाच पाहीले. छान आहे रंगसंगती. ३. हल्ली करवंदाच्या जाळ्याही विरळ होऊ लागल्या आहेत. फोटो छान आले आहेत. आवडले.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पांथस्थ 05/04/2011 - 21:29
हल्ली करवंदाच्या जाळ्याही विरळ होऊ लागल्या आहेत.
ताम्हीणी मधे थोड्या पर तग धरुन आहेत!

योगेश२४ 05/04/2011 - 22:00
प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार :-)

प्राजु 06/04/2011 - 20:22
अंजनीचे फूल पहिल्यांदाच पाहिले.. अप्रतिम आहे..! शब्दच नाहीयेत. काय सुंदर रंग आहे..!! वाह!! बाकीही फोटो मस्तच. धन्यवाद योगेश२४.

प्राजक्ता पवार 07/04/2011 - 00:00
कांचनचे झाड व फुले बघितली आहेत पण नाव मात्र आज कळले. सुंदर दिसतात फुले. फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम ! :)

चिगो 08/04/2011 - 18:44
अंजनच्या फुलाचे फोटो पहील्यांद्याच पाहतोय. कांचन आणि करवंद पाहीली आहेत, असं वाटतंय.. धन्यु.. जबरा पिक्स आहेत..