( पेटवी लंका हनुमंत )
लेखनविषय:
काव्यरस
कालच्या सामन्याच्या मानकर्यांसाठी आणि अर्थात आमच्या लाडक्या सचिनदेवासाठी हे कवन...
गदीमांचे गीतरामायणातील मूळ काव्य इथे मिळेल. काल रात्रभर नाचुन विजयाच्या उन्मादातच लिवलं गडबडीत आहे, मीटर तपासू नये. काही कडव्यांचा क्रम बदलला आहे, पण मुळ चालीवरच म्हणता येइल. (उद्या वेळ मिळाला की.. " देवहो, बघा 'माही'लीला... या घरी विश्वचषक आला" लिहायचा विचार आहे.. :))
लीलया उडुनी वानखेडेत
पेटवी लंका हनुमंत
उडे दांडकी सेहेवागाची.
बॅट कोसळे मग 'देवा'ची
चिता भडकली जणूं चिंतेची
राक्षसी करिती आकांत
कुणी पळाले हरल्या पायी
रिमोट मग कुणी टाकून देई
कुणि भीतीनें अवाक होई
वरून तो सडका श्रीशांत.
गंभीरा पण नक्की ठावे
सवे कोहली हळूच धावे
कप्ताना कर्तव्य आठवे
अचानक आला कल्पांत
या सीमेहून, त्या सीमेवर
कंदुक पळतो, नुरे भुईवर
गंभीराचा स्ट्रोक भयंकर
चालला धावा जमवीत
उडे मलिंगा, फुटे थीसारा,
मुरली पोकळ, कुणा न थारा
रडे, ओरडे तों रणदिव
कुमारा पडला चिंतेत
सहज फोर ते असे मारती
विजेपरी तें सिक्स मागुतीं
आग वर्षवी नगरीवरती
गर्जना करती फलंदाज
आकांक्षा मग पुन्हा उसळल्या
युवराजांच्या बाहू स्फुरल्या
पवित्र मंगल घटिका भरल्या
मातृभू बुडे उत्सवात
धोनी, भज्जी, संघच सारा
“देव” मस्तकी मिरवी प्यारा
देवाच्या अन् भारतभूच्या
नशीबीचा संपे वनवास
......पेटवी लंका हनुमंत ..... पेटवी लंका हनुमंत
वाचने
5424
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
अप्रतिम ...केवळ अप्रतिम...
(No subject)
खल्लास!!
In reply to खल्लास!! by चंबा मुतनाळ
फिरवा की मग.. नाव लिहा म्हणजे
In reply to फिरवा की मग.. नाव लिहा म्हणजे by अर्धवट
डन.....
जबरान रे अर्धवटा.
आमच्या रामाबद्दल दोन-चार ओळी जास्त पाहिजे होत्या राव. :)
In reply to आमच्या रामाबद्दल दोन-चार ओळी जास्त पाहिजे होत्या राव. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय.. रामनामाचा महीमाच तसा
In reply to खरंय.. रामनामाचा महीमाच तसा by अर्धवट
हाहाहा
प्रतिभेला सलाम!
अर्ध्या _/\_ मस्त झालिये
कविता खरंच छान झालीये!
कविता मस्त जमलीये पण....
तुफ्फान!! जबरदस्त झालीये
एक नंबर रे अर्धवटा! पुढलं
खुप छान अमोल
मस्तच
मस्त
साहेबांच्या गौरवार्थ शेवटचं
अर्धवटाने
अप्रतिम, केवळ अप्रतिम!!!!
In reply to अप्रतिम, केवळ अप्रतिम!!!! by बॅटमॅन
+१
In reply to +१ by श्रीरंग_जोशी
ह्येच बोलतो....
In reply to +१ by श्रीरंग_जोशी
अहो माझे आभार कसले
In reply to अहो माझे आभार कसले by सुधीर
मान्य आहे पण
वाह... मस्त एकदम मस्त...
=))
सही. एकदम मस्त.
जय हो............. जबराट