मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

या अंधश्रद्धेचे काय करू?

विकास · · काथ्याकूट
आज भारत-ऑस्ट्रेलीयाचा "एफ-५" कळ दाबत सतत ताजा होणारा धावफलक एकीकडे बघत असताना दुसरीकडे ज्यांना तो खेळ प्रत्यक्ष बघता येत होता त्यांचा विचार करत इनो घेणे चालू होते. भारतीय संघाचा खेळ बघताना सरासरी आता आटोक्यात आहे, तरी देखील काय होते या भितीने एकीकडे बोटे जुळवून बसलेलो (फिंगर्स क्रॉस्ड) तर दुसरीकडे मनातल्या मनात, "च्यायला यांना बरं बघायला मिळतं" असे म्हणत तीच बोटे मोडत होतो.... :( तर मग ठरवलचं! की यापुढे "एफ-५" नाही तर ३० मार्चला हातात रिमोटच असेल! असा, भारत-पाक मॅच मी प्रत्यक्ष बघायचा निर्धार करणार, तितक्यात एक किडा डोक्यात आला, जेंव्हा जेंव्हा मी (विशेष करून) भारत-पाक मॅच एकाजागी बसून (म्हणजे मधे मधे उठलो असेनही), बघितली, तेंव्हा तेंव्हा भारत हरला आहे. आता सारे भारतीय माझे बांधव असल्याने, आपले भारतीय खेळाडू पण बांधवच आहेत. त्यामुळे त्यांचे जिंकणे हे मीच जिंकण्यासारखे आहे... मग मी आता काय करू? मला माहीत आहे, उपलब्ध विदाचा विचार केल्यास, स्टॅटीस्टीकली जरी माझ्या अनुभवात तथ्य असले तरी वैज्ञानिक दृष्टीकोनातून याला काहीच अर्थ नाही, ही केवळ अंधश्रद्धा आहे! आणि मी तर स्वतःला अंधश्रद्धाळू समजतही नाही आणि तसे वागतही नाही. त्यामुळे वाटते, कशाला फुकटचे भ्यायचे? पण मग जर परत माझ्या स्टॅटीस्टिक्स मधे नको ती भर पडली तर? भारत हरला तर? छ्या! काही समजत नाहीसे झाले आहे... बघितले आणि आपण जिंकलो तर एकदाचे अंधश्रद्धा निर्मूलन होईल. पण जर जिंकलो नाही तर? या अंधश्रद्धेचे काय करू? डोक्यात न ठेवता सरळ भारत-पाक सामना बघू का नुसतीच "कळ एफ-५"? तुम्हाला देखील भारतीय क्रिकेट संघच जिंकावा असे वाटत असेल अशी आशा करतो. पण मग, इथले क्रिकेटप्रेमी आणि अंधश्रद्धा निर्मूलन करू इच्छीणार्‍या सन्माननीय सदस्य काही तोडगा सांगतील का? ;)

वाचने 31016 वाचनखूण प्रतिक्रिया 158

अभिज्ञ Fri, 04/01/2011 - 16:31
१९८३ अन २०११ ची कॅलेंडर्स पहा. दोन्ही कॅलेंडर्स सारखी आहेत. http://www.hf.rim.or.jp/~kaji/cal/cal.cgi?1983 अन http://www.hf.rim.or.jp/~kaji/cal/cal.cgi?2011 तस्मात, अंतिम फेरित भारताचा विजय निश्चित आहे. :) (अंधश्रध्दाळू) अभिज्ञ.

In reply to by पुष्करिणी

विकास Sat, 04/02/2011 - 23:39
कोणी काही म्हणोत, आजच्या मॅचचा टर्निंग पॉइंट माझा हा विनामूल्य तरीही अमूल्य प्रतिसाद होता असे वाटते. ;) आता फक्त चारच वर्षे थांबायला लावा २८ नको! :-)

चिंतामणी Tue, 04/05/2011 - 08:26
या अंधश्रद्धेचे काय करू? असे वाचले आणि आजपर्यन्त हा धागा उघडलाच नव्हता. मला वाटले की इथेसुध्दा "अ.नि.स" वाले आले की काय? ते आले की मग विरोधक येणार. त्याच त्याच चर्चा. पण आज धैर्य एकवटुन धागा उधडला आणि ह.ह.पु.वा. =))