कोट्यावधी रूपये कमावणा-या क्रिकेट बोर्डाला करात ४५ कोटी रूपयांची सवलत निर्णय काल केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याच्या बातम्या आल्या आहेत.
सामान्य माणसाला एक एक रूपया करासाठी नडणारे, सामान्य माणसाचे कंबरडे महागाई मोडले असताना त्याबद्दल विचार न करता क्रिकेट वर्डकप संयोजनासाठी ४५ कोटिची सवलत देण्य योग्य आहे का?
आपल्या देशाकडे काही क्रिडा धोरण आहे की नाही? १४ देशांच्या वर्डकप संयोजनासाठी ४५ कोटिची सवलत. पण ज्या जागतीक महासंघांशी २०० पेक्षा जास्त देश संलग्न आहेत (व्हॉलीबॉल, फुटबॉल) अश्या खेळांचे आयोजनासाठी सवलती मदत/ मीळवण्यासाठी अनेक खस्ता खाव्या लागतात. एव्हढे करून मदत मिळेल असे नाही.
असल्या खिरापती वाटण्या ऐवजी एक दिर्धकालीन क्रिडा धोरण आखण्याची गरज आहे. कोट्यावधी रूपये कमावणा-या क्रिकेटला सवलती देण्यास हरकत नाही. परन्तु ऑलिंपीक विजेते खेळाडु बनवण्यासाठी निश्चीत धोरण हवे आहे. या साठी जनमासातुन रेटा येणे आवश्यक आहे असे मला वाटते.
(या ४५ कोटीची करमाफी विषयी बातमी येथे वाचा)
वाचने
2138
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
पटलं व सहमत पण .................
चिंतामणी
आभार.
In reply to चिंतामणी by नितिन थत्ते
आभार.
In reply to चिंतामणी by नितिन थत्ते
श्री चिंतामणी यांच्या
ही कर सवलत नियमाला बसते असे
४५ कोटींची सवलत योग्य