Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मूकवाचक on Tue, 03/29/2011 - 12:09
१. (मी) इतका आळशी (आहे) की कधी महत्वाकांक्षा स्पर्शच करत नाही. जग आपली काळजी वाहायला समर्थ आहे, मी ती घेत नाही. दहा दिवस पुरतील इतके तांदूळ पोत्यात आहेत, चुलीजवळ ढीगभर गवर्या पडलेल्या आहेत, अध्यात्म आणि मुक्तीच्या व्यर्थ झोलगप्पा का मारायच्या? भर रात्री छपरावर कोसळणाऱ्या पावसाचा नाद ऐकत मी मस्त तंगड्या ताणून आरामात पहुडलो आहे. २. तारुण्याच्या उंबरठ्यावरच मी शिक्षणाला रामराम ठोकला, आणि संत होण्याचा ध्यास घेतला. कठोर वैराग्य पाळत माधुकरी मागत बैराग्यासारखा, कित्येक वसंत ऋतू उलटले तरी नुसताच इकडे तिकडे भटकलो. शेवटी घरी परतलो एका अनामिक ओबडधोबड पर्वताखाली स्थिरावण्यासाठी. आता शांतपणे एका पर्णकुटीत राहतो, पक्ष्यांच्या चिवचिवाटाचे संगीत ऐकत. काळे मेघ आहेत माझे सख्खे शेजारी. खाली एक स्फटिकासारखा झरा वाहतो, जो माझ्या मनाला आणि कायेला ताजेतवाने करतो. माथ्यावर ताडमाड वाढलेले पाईन आणि ओक आहेत, जे घनदाट छाया आणि आसरा देतात. दिवसेंदिवस होते वाटचाल मुक्तीकडे, परम मुक्तीकडे.... इथून मुक्काम हलवावा असे मुळीच वाटत नाही. मूळ काव्य: तायागू र्योकान (१७५८ - १८३१) भावानुवाद: मूकवाचक (१९७० -???? ) (पुन:प्रकाशित)

Submitted by नगरीनिरंजन on Tue, 03/29/2011 - 12:20

Permalink

विचारप्रवर्तक! पहिलं मुक्तक

विचारप्रवर्तक! पहिलं मुक्तक वाचून महत्वाकांक्षा नसल्याबद्दलची बोचणी कमी झाली. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 03/29/2011 - 12:29

Permalink

आवडले.

आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by मुस्तफा on Tue, 03/29/2011 - 15:49

Permalink

बढिया !

बढिया !
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 03/29/2011 - 20:17

Permalink

मस्त आहे!

खूप आवडलं. झेन कविता-कथा अगदी थोड्या शब्दात इतका आशय व्यक्त करतात ना! हा भावानुवाद छान झालाय.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 03/29/2011 - 22:17

Permalink

छानच

भाषांतर करायला कठिण काव्य आहे. आशय आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Tue, 03/29/2011 - 22:43

Permalink

सरस

अनुवाद! खूपच आशयघन काव्य आहे हे.
  • Log in or register to post comments

Submitted by बबलु on Wed, 03/30/2011 - 10:39

Permalink

छान आहे. भाषांतर ओघवतं केलं

छान आहे. भाषांतर ओघवतं केलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Wed, 03/30/2011 - 13:08

Permalink

आवड्या

आवड्या :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 04/01/2011 - 12:23

Permalink

यक लंबर लई आवाडल. आमच्यावानीच

यक लंबर लई आवाडल. आमच्यावानीच दिस्तोय.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 04/04/2011 - 11:02

Permalink

दिवसेंदिवस होते वाटचाल

दिवसेंदिवस होते वाटचाल मुक्तीकडे, परम मुक्तीकडे.... इथून मुक्काम हलवावा असे मुळीच वाटत नाही. क्या बात है. तेरी आखोसें से आजादी चाहता हुं ख्वाबोंमे तेरे जीना चाहता हुं
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 04/05/2011 - 10:21

Permalink

मस्त

कवितेचा आशय आवडला.......! अजुन येऊ दे....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Tue, 04/05/2011 - 18:13

Permalink

छान.. आवडले

छान.. आवडले
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3454 views
  • झेन काव्य - २
  • झेन काव्य

Book traversal links for झेन काव्य

  • झेन काव्य - २ ›

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com