दृश्य,स्पर्श,गंध आणि चव(खाणे) यातला फरक. गंध हवाहवासा वाटणारी,स्पर्श सुखावह असलेली वस्तू खआण्यायोग्य असेलच/असली(च) पाहिजे असे नाही.त्यामुळे अशी खाण्यायोग्य नसलेली वस्तू(ही) खायला लागणे (तशी पाळी येणे) म्हणजे काहीतरी अयोग्य/निंद्य याचे द्योतक. मग ती वस्तू दिसायला,हुंगायला,हात लावायला कितीही चांगली असो,असे काहीसे असावे असे वाटते.
(अंदाजपंचे)बेसनलाडू
पहिल्या वाक्यांत शेण हे खाण्याच्या द्रुष्टिने बघितले जात असावे.
तसे बोलणा-याला शेणाच्या चवीची कल्पना असावी.
तर दुस-या वाक्यांत शेण हे सारवण्यासाठी वापरण्याचा संदर्भ आहे.
तुमच्या नावातच शेण आहे ,ते आम्हि कुठल्या अर्थाने पहायचे? किंवा ,तुम्हि ते कुठल्या अर्थाने घेतले आहे?
शेणावर सुध्दा विधायक चर्चा होते आहे(?) ,हे हि नवलच!
चालु द्यात.
अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो. ह्या वाक्यांतून शेण हा काहितरी वाईट, निंदनीय प्रकार आहे असा अर्थ निघतो.
इथे शेण ही संज्ञा विष्ठा ह्या अर्थाने वापरली जाते. झोपडपट्टीत रांगड्या भाषेत बोलणारे बर्याचदा 'शेण' ऐवजी 'गू' असा विष्टेलाच असलेला दुसरा किळसवाणा शब्द वापरतात...त्यावरुन ही कल्पना करता येते.
इथे शेण म्हणजे काहितरी एक मंगलदायी, घराचे सौंदर्य वाढवणारा प्रकार आहे असा अर्थ निघतो.
ह्या ठिकाणी मात्र शेण हा शब्द फक्त गोमय - गाईची विष्ठा ह्या अर्थानं वापरला जातो. गोमयाच्या औषधी /बहुगुणी वैशिष्ट्यं सध्यातरी आठवत नाहीत, पण त्या एका कारणास्तव आणि दुसरं म्हणजे गाय ही देवस्वरुप मानल्यामुळे आणि जसं गोमुत्र मुंजीच्या वेळी प्यायला देतात किंवा इतर काही घटनांनंतर घरात शिंपडतात कारण त्याचे औषधी गुण, तसंच शेणाबद्दलही.
यावरून सहज आठवले:
एक्ट्याने खाल्ले तर शेण :( व सर्वांनी एकत्र बसून खाल्ले तर श्रावणी :) असे पूर्वी म्हणायचे.
वस्तू तीच पण संदर्भ बदलतो व त्याचा अर्थही बदलतो.
शेणाच्या दोन अर्थाविषयी तुमचा प्रश्न वाचून मराठी भाषेच्या द्वी अर्थी शब्दसंपत्तीचा पुरेपुर कीस काढणारे महान लोकप्रीय कलाकार दादा कोंडके ह्यांची आठवण झाली. त्यांच्या चित्रपटात द्वी अर्थी शब्दांतून चावट गोंधळ उडवल्यावर सेन्सॉर कडून चित्रपटाची परवानगी मिळवण्याकरिता त्यांचे बोर्डाच्या सदस्यांशी खूपदा वाद विवाद होत. आपल्या हजरजबाबी स्वभावानुसार ते ताबडतोब चोख उलट जबाब देऊन सेन्सॉरला निरूत्तर करीत व परवानगी मिळवीत असत.
त्यांच्या आत्मकथन पुस्तकात शेणसार बोर्ड ह्या चपखल मथळ्याचे एक पूर्ण प्रकरण ह्या मजेदार वादविवादांविषयी आहे.
आता शेणसार बोर्ड हे चित्रपटातले शेण बाजूला सारून चांगला भाग प्रेक्षकांना दाखवते, की
नको ते कट्स करून चांगल्या कलाकृतीवर शेण सारते
ह्यामधले कोणते खरे आहे?
एक्ट्याने खाल्ले तर शेण व सर्वांनी एकत्र बसून खाल्ले तर श्रावणी असे पूर्वी म्हणायचे.
हे वाक्य वि.आ.बुवा यांच्या साहित्यात कुठेतरी वाचले असावे असे वाटते. त्या आधी आणखी उदाहरणे होती. एकाने दुसर्याचा जीव घेतला की खून, अनेकांनी एकमेकांचा घेतल की युद्ध. एकजण युद्धातून पळाला की पळपुटा, सगळे मिळून पळाले की यशस्वी माघार.
आणि... एक्ट्याने खाल्ले तर शेण व सर्वांनी एकत्र बसून खाल्ले तर श्रावणी ...
१.'शेण खाणे' हा वाक्प्रचार सामान्यतः व्यभिचार दर्शवण्यासाठी वापरला जातो. 'अपयश येणे' हाही अर्थ सभंवतो. अशा वेळी context वरून अर्थ लावावा. ;)
२.'तोंडात शेण घालणे' हा वाक्प्रचार 'अब्रू जाणे' या अर्थी वापरला जातो.
३.'शेण सारवणे' हे शब्दशः शेण सारवणेच असते. दुसरा काही अर्थ अभिप्रेत असेल असे वाटत नाही.
इथे विसंगती काहीच नाही. 'शेण' शेणच रहाते. वाक्याच्या context वरून आणि बरोबर येणार्या खाणे, सारवणे या शब्दांमुळे विविध अर्थ होतात. यालाच मराठीचे सौंदर्य म्हणा हवं तर..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
प्रतिक्रिया
उत्तम
माहित
हं
मेबी ते
फरक
विधायक चर्चा ?
अशी वाक्य
+१
शेण, गोमय वगैरे
दादा कोंडकेंची आठवण
चव
एक्ट्याने खाल्ले तर शेण....
शेण..
नो
बिचारी