Skip to main content

बातमी अर्थसंकल्पाची

लेखक मराठी_माणूस यांनी गुरुवार, 24/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काल महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. आजच्या ईकॉनॉमिक टाईम्सच्या मुंबई आवृत्तीत , पहील्या पानावर ह्या बातमीचा कुठेही , अगदी दोन ओळींचा देखील उल्लेख नाही. केंद्रिय अर्थसंकल्पाच्या बातम्या भरभरुन छापणार्‍या ह्या वृत्तपत्राला , महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प ही पहील्यापानावर न छापण्याइतकी बिनमहत्वाची घटना वाटावी ? तेही महाराष्ट्राच्या राजधानीच्या अवृत्तीत ? हा नक्कीच खोडसाळपणा वाटतो , आर्थिक घडामोडिना वाहीलेल्या वृत्तपत्राने ह्या मोठ्या घडामोडिला महत्व न देण्याचे (पहील्या पानावर न छापता इतरत्र छापुन) दुसरे कारण काय

वाचने 1714
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

महाराष्ट्रावर ते जळतात असे म्हणायचे आहे का? बहुतांशी राज्यांचा अर्थसंकल्प म्हणजे विनोद असतो हे सर्वांना माहित आहे. तो कसाही/कोणीही सादर केला तरी विशेष फरक पडत नसतो.

१. आपण विंग्रजी पेपरं वाचता २. आपण इकॉनॉमिक्स टाईम्स वाचता . ३. आपण अर्थशास्त्रात रस घेता. ४. आपल्याला कोणत्या पेपरावर पहिल्या पानावर काय छापल्या जावे आणि काय नये .. ह्यात रस आहे . ५. आणि आपल्या मनाविरुद्ध झाल्यामुळे आपण फक्त त्यासाठीच एक धागा काढता ६. सगळे मराठी माणसं अर्थसंकल्प केवळ इकॉनॉमिक टाईम्स च्या पहिल्या पानावर आला तरंच वाचतात ,अन्यथा त्यांना देणेघेने नसते - मराठी मॅन

दारवा महाग केल्याच्या निषेधार्थ छापली नसेल बातमी, एवढं काय मनाला लावुन घेताय. आधीच आम्ही दारवा महाग झाल्याच्या दुखातुन बाहेर पडायचा प्रयत्न करतोय त्यात पुन्हा पुन्हा ते अर्थसंकल्प अर्थसंकल्प म्हणुन या दुखाची आठवण करुन देउ नका.