नमस्कार. हा भाग तिसरा. तिसऱ्यावरून आठवलं इब्राहिमी धर्मही महत्त्वाचे तीन आणि सर्वात महत्त्वाचे त्यांचे प्रेषित ती
यहुदी/ज्यू (प्रेषित मोझेस), ख्रिश्चन ( प्रकटनकर्ता जीझस ) आणि इस्लाम ( अंतिम प्रेषित मुहम्मद पैगंबर).
येशू क्रुसावर मारल्यावरही पुनर्जीवित ते तीन दिवसांनंतरच.
सर्व प्रथम श्री प्रसन्न केसकर ह्यांचे आभार. ह्या आणि पुढच्या काही भागात जे मला मांडायचं होतं, त्यातला बराचसा भाग त्यांच्याकडे आधीच उपलब्ध होता, प्रचलित ज्यू- ख्रिश्चन मान्यतांशी अगदी जुळणारा असा तो आहे. मी तो पुन्हा एकदा इथे मांडतोय. त्यांच्याकडून घेतलेलं लिखाण हे इटॅलिक्स मध्य असेल. मला त्यात काही भर घालावीशी वाटली तर ती मी घालेन. मागील काही प्रश्न पुन्हा लिहितोय.
४. ह्यांचा (इब्राहिमी) धर्मग्रंथ कुठला?
ह्यात अजून थोडं लिहायला हवं होतं. बायबलचे भाग दोनः- ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट( जुना व नवा करार (देवाने मानव प्रतिनिधींसोबत केलेला)). ज्यू ओल्ड बायबलला प्रमाण मानत असले तरी त्यातील लिखाणाचे ३ विभाग त्यांनी केलेतः-
तौरात (दैवी सूचना व आदेश), नेविम (प्रेषित व भविष्यवेत्ते/मार्गदर्शक/sooth sayers) केतुविम (संकीर्ण लिखाण, घटना कथा ह्यांचा संग्रह)मात्र ख्रिश्चन हे वेगळे विभाग न मानता एकाच "जुन्या करार" ह्या विभागात त्याचा उल्लेख करतात.
५. यांच्या देव-देवता, जीवन-मरण आणि नैतिकता ह्याबद्दल संकल्पना कुठल्या?
हा प्रश्न असा मांडुयातः- आपल्या/सृष्टीच्या निर्मितीबद्दल ह्यांच्या काय कल्पना आहेत?
तर कल्पना अशी आहे की पूर्वी/सुरुवातीस सृष्टीनिर्माण होण्यापूर्वी दिवसही नव्हता. रात्रही नव्हती. प्रकाशही नव्हता. अंधारही नव्हता. आकाशही नव्हतं! जल, भूमी हे ही बनायचे होते. अगदी काहीच म्हणजे काहीच नव्हते. It was absolute NULL. फक्त अनादी अनंत ईश्वर तेव्हढा होता.
तर सृष्टीनिर्मितीबद्दल ही एक(तुरात मधील, जेनेसिस ह्या भागातील) कथा :-
प्रारंभी देवाने पृथ्वी निर्माण केली तेव्हा वायुरुप पृथ्वी अंधाराने वेढलेली होती आणि देवाचा आत्मा जलाशयांवर पाखर घालत होता. देवाने शब्द उच्चारले, `प्रकाश होवो' आणि प्रकाश अस्तित्वात आला. देवाने पाहिले की प्रकाश चांगला आहे आणि त्याने अंधारापासुन प्रकाश वेगळा केला. देवाने प्रकाशाला दिनसमय आणि अंधाराला रात्रसमय म्हणले. हे सर्व पहिल्या दिवशी घडले.
नंतर देवाने शब्द उच्चारले, 'जलाशयाच्या मध्यभागी अंतराळ होवो आणि अंतराळामुळे वरचे वायुरुप जलाशय आणि खालचे जलाशय अशी विभागणी होवो.' त्यानुसार घडवुन आणल्यावर देवाने अंतराळास आकाश असे नाव दिले आणि हे सर्व दुसर्या दिवशी घडले.
पुन्हा देवाने शब्द उच्चारले, `अंतराळाखालील जले एकत्र येऊन त्यांचे महासागर निर्माण होवोत आणि कोरडी जमीन दृष्टीस पडो' तसेच घडल्यावर देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि जलाशयांस सागर अशी नावे दिली. मग देवाने शब्द उच्चारले, 'गवत, बीज देणार्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमी उपजावो' आणि तसेच घडुन आले. हे सर्व तिसर्या दिवशी घडले.
त्यानंतर देवाने शब्द उच्चारले, 'दिवस आणि रात्र भिन्न करण्यास आकाशात ज्योती होवोत व त्या चिन्हे, ऋतु, दिवस आणि वर्षे दाखवणार्या होवोत' आणी तसे घडुन आहे. देवाने सुर्य व चंद्र या मोठ्या ज्योती आणि तारेही प्रकाश व अंधार वेगळे करण्यासाठी निर्माण केले. हे चौथ्या दिवशी घडले.
पुढे देवाने शब्द उच्चारले `जलांमधे जीवजंतुंचे थवेच्या थवे उत्त्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीच्या वर आकाशात विहार करोत.' त्यानुसार सागरातील प्राणी, जलचर, पक्षी निर्माण झाले. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, `फलदृप व्हा. वृद्धी पावा.' हे पाचव्या दिवशी घडले.
मग देवाने शब्द उच्चारले, `गुरेढोरे, सरपटणारे प्राणी, जमिनीवरील प्राणी, वन्यपशू जे अस्तित्वात येवोत' आणि तसेव घडले. मग देवाने जमीनीवरील माती घेऊन त्याचेच प्रतिरुप असा मानव निर्माण केला आणि जलचर, पक्षी, पशू व सरपटणार्या प्राण्यांचे अधिपत्य त्याला दिले. मानवाच्या नाकपुड्यातुन त्याच्यात आत्मा "किंवा प्राण" फुंकला आणि आशीर्वाद दिला, `फलदृप व्हा, बहुगुणीत व्हा आणि पृथ्वी व्यापुन टाका. जलचर, पक्षी, पशू यांच्यावर अधिकार गाजवा. प्रत्येक वनस्पती, प्रत्येक फळझाड तुमचे अन्न होईल. प्रत्येक पशु, प्रत्येक पक्षी तसेच सरपटत जाणारे प्राणी यांना अन्न म्हणुन मी हिरवी वनस्पती देत आहे.' हे सर्व सहाव्या दिवशी घडले. निर्मितीचे कार्य पुर्ण करुन सातव्या दिवशी देवाने विश्रांती घेतली. (हाच दिवस म्हणजे सब्बाथ/ शब्बाथ. या दिवशी काम करणे "ज्यू " धर्माला अमान्य आहे.)
नंतर देवाने पुर्वेकडे एदनमधे बाग केली व त्यात मानवाला ठेवले. जीवनवृक्ष व बर्यावाईटाचे ज्ञान देणारे वृक्ष बागेच्या मध्यभागी लावले. बागेला पाणि देण्यासाठी नदी केली व मनुष्याला बागेची मशागत व राखण करण्यास ठेवले. त्यावेळी त्याने मनुष्याला आज्ञा केली की बर्यावाईटाचे ज्ञान देणार्या वृक्षाचे फळ तु खाऊ नकोस. मनुष्याची मदतनीस म्हणुन त्याने स्त्री निर्माण करण्याचे ठरवले. त्याने मानव झोपेत असताना त्याच्या छातीची फासळी काढुन स्त्री बनवली. तेव्हा मानव म्हणाला, "ही माझ्या हाडांचे हाड, मांसाचे मांस आहे. ती नरापासुन बनवलेली आहे म्हणुन तिला नारी म्हणतील. याकारणे पुरुष आपल्या आईवडीलांना सोडुन पत्नीशी जडुन राहील आणि ती दोघे एकदेह होतील." बायबलच्या मते पृथ्वीतलावरील मानवांची पैदास याच पुरुष (आदम/ आदाम/ अॅडम) व स्त्री (हव्वा/ इव्ह/ इव्हा) यांच्यापासुन झाली.
बहुतांश अशीच काहीशी कल्पना इस्लाम मध्येही आहे. पण प्रमुख फरक हा की सृष्टी निर्माण सहा "दिवसात" झाली की नाही ह्याबद्दल फरक आहे. अरेबीमधील सहा "यौम" मध्ये सृष्टी बनली. "यौम" चा अर्थ केवळ दिवस असाही होतो, तसाच तो ठराविक पिरियड/कालावधी असाही होतो. म्हणजे सहा "भागात/कालावधीत" निर्माण झालेलं आहे असं ते म्हणू शकतात. हा एक कालावधी "एक दिवसच" आहे असं कुठेही नाही. तो इश्वरी कालावधी आहे, त्यावर मानवी बंधनं आणि अपेक्षा नाहीत.
सब्बाथ/शब्बाथ म्हणजे शुक्रवारची रात्र आणि शनिवारचा दिवस ज्यूंमध्ये पवित्र समजतात. ईश्वराने विश्रांती घेतली तशीच आपण ह्या दिवशी घ्यावी आणि ईश्वराचं चिंतन/प्रार्थना करावी असा दैवी आदेश आहे.
मात्र इस्लाम मध्ये सर्वाधिक पवित्र मानला गेलेला आठवड्यातील काळ म्हणजे शुक्रवारचा पूर्ण दिवस.
ह्या दिवशी परमेश्वर अधिक मेहेरबान असेल, जुम्माच्या दिवशी प्रार्थनेला/नमाजला विशेष महत्व असेल अशी ईश्वराची आज्ञा आहे. ह्या दिवशी तुम्ही नमाज पढताय की नाही हे बघण्यासाठी साक्षात देवदूत मशिदीच्या दारात उभे असतात. येणाऱ्यांची ते नोंद ठेवतात. अशी श्रद्धा आहे. आमच्या इथल्या एका बुजुर्ग इस्लामिक श्रद्धावंताला विचारल्यावर त्यानं हे ही सांगितलं- "देवानं मानव/आदम निर्माण केला तो दिवस जुम्माह. आदम जेव्हा जन्नत मध्ये गेला तो ही शुक्रवार, म्हणजे जुम्माच. ज्या दिवशी जगाचा अंत आणि अंतिम निर्णय होईल तो ही जुम्माच असेल. (अंतिम निर्णयः- कयामत, जेव्हा सर्व पाप्यांना पापांची शिक्षा व श्रद्धावंतांना सत्कर्माची फळे मिळतील)"
ख्रिश्चनांसाठी सर्वात पवित्र दिवस रविवार आहे(catholic church). पण तो कशासाठी हे अजून शोधतोय.
अवांतर
सृष्टीनिर्मितीची इब्राहिमी कल्पना वाचली आणि सहज नासदीय सूक्त आठवलं. (ऋग्वेद, मंडल १० वे. )
सगळं वाचलं नाही तरी चालेल पण त्यातल्या १ ते ४, ६, १३, १४ (इथे चटकन कळावं म्हणून हिंदीमध्ये देतोय. ) ह्या ओळींकडे जरा लक्ष देऊन बघा बरं.
सृष्टी से पहले सत नहीं था, असत भी नहीं १
अंतरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था। २
छिपा था क्या कहाँ, किसने ढका था ३
उस पल तो अगम, अटल, जल भी कहाँ था ४
सृष्टी का कौन है कर्ता कर्ता है वा अकर्ता ५
ऊंचे आकाश में रहता सदा अध्यक्ष बना रहता ६
वही सचमुच में जानता, या नहीं भी जानता ७
है किसी को नहीं पता नहीं पता नहीं है पता नहीं है पता ८
वह था हिरण्यगर्भ सृष्टी से पहले विद्यमान ९
वही तो सारे भूतजात का स्वामी महान १०
जो है अस्तित्वमान धरती आसमान धारण कर ११
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवी देकर १२
जिस के बल पर तेजोमय है अंबर १३
पृथ्वी हरी भरी स्थापित स्थिर १४
स्वर्ग और सूरज भी स्थिर १५
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवी देकर १६
गर्भ में अपने अग्नी धारण कर पैदा कर १७
व्यापा था जल इधर उधर नीचे ऊपर १८
जगा चुके वो ऐकमेव प्राण बनकर १९
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवी देकर २०
ॐ! सृष्टी निर्माता स्वर्ग रचियता पूर्वज रक्षा कर २१
सत्य धर्म पालक अतुल जल नियामक रक्षा कर २२
फैली हैं दिशाएँ बाहू जैसी उसकी सब में सब पर २३
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवी देकर २४
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवी देकर २५
वाचन संख्या
33409
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
i think this was used as
हाही भाग छान
निर्व्याजता...
In reply to हाही भाग छान by पुष्करिणी
हो, असं मला प वाटतं. पण
In reply to निर्व्याजता... by पंगा
शुक्रवारबद्दल कल्पना नव्हती
In reply to हो, असं मला प वाटतं. पण by पुष्करिणी
ज्यू शनिवारी काम करीत
In reply to शुक्रवारबद्दल कल्पना नव्हती by पंगा
शनवार तेली
In reply to ज्यू शनिवारी काम करीत by नितिन थत्ते
"आम्ही चित्पावन" या पुस्तकात
In reply to शनवार तेली by पंगा
हा काय प्रकार आहे?
In reply to "आम्ही चित्पावन" या पुस्तकात by नितिन थत्ते
सेम
In reply to हा काय प्रकार आहे? by पंगा
हे काय आता?
In reply to सेम by नितिन थत्ते
अहो हे नुसते कयास
In reply to हे काय आता? by मन१
कोण हे
In reply to अहो हे नुसते कयास by नितिन थत्ते
धन्यवाद
In reply to सेम by नितिन थत्ते
माझ्या परिचयातले सगळेच ज्यू
In reply to ज्यू शनिवारी काम करीत by नितिन थत्ते
पूर्वापार सावकारी हि ज्यू
In reply to निर्व्याजता... by पंगा
रिसरक्शन...
In reply to हाही भाग छान by पुष्करिणी
कदाचित तसं असेल.पेगन आणि
In reply to रिसरक्शन... by प्रसन्न केसकर
हे पेगन कोण होते? dictionary
In reply to कदाचित तसं असेल.पेगन आणि by पुष्करिणी
ख्रिश्चनांत निषिद्ध नाही
In reply to कदाचित तसं असेल.पेगन आणि by पुष्करिणी
अवांतर : दूध आणि मांस एकत्र
In reply to ख्रिश्चनांत निषिद्ध नाही by पंगा
बंधूंकडून व्याज वर्ज्य, परकीयांकडून ठीक
In reply to हाही भाग छान by पुष्करिणी
ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना व्याज घेणे वर्ज्य
In reply to हाही भाग छान by पुष्करिणी
छान माहिती. अर्थात यामुळे
In reply to ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना व्याज घेणे वर्ज्य by धनंजय
बोंबला...
आपले अनेक आभार! बरेच दिवस मी
In reply to बोंबला... by मन१
वाचतोय....
छान!
मस्तच आहे वाच्तोय..........
एकंदर सगळा मामला इंतरेस्टिंग
मला देखील बायबलमधील तो उतारा
नासदीय सूक्त की
ते नासदीय आहे. नारदीय नाही..
In reply to नासदीय सूक्त की by sagarparadkar
नव्हे नव्हे......
In reply to ते नासदीय आहे. नारदीय नाही.. by JAGOMOHANPYARE
मनोबा अप्रतिम रे. वाचत आहे...
व्वा!
धन्यवाद मन१
In reply to व्वा! by मन१
पेगन धर्मातले बरेचसे देव
In reply to व्वा! by मन१
मस्त.
हाही भाग झकासच
जयदिप
ज्यू धर्म हा आईवर अवलंबून
शंका
In reply to ज्यू धर्म हा आईवर अवलंबून by पुष्करिणी
४० एडी पासून धर्मग्रंथात हा
In reply to शंका by पंगा
होय
In reply to ४० एडी पासून धर्मग्रंथात हा by पुष्करिणी
सहमत
In reply to शंका by पंगा
मूर्तीपूजक आणि अनेक ईश्वर मानणारे दुय्यमच
कुठल्या ज्युंबद्दल?
In reply to मूर्तीपूजक आणि अनेक ईश्वर मानणारे दुय्यमच by हुप्प्या
इस्लामने कधिही अशी तडजोड केली नाही करणार ही नाही
In reply to मूर्तीपूजक आणि अनेक ईश्वर मानणारे दुय्यमच by हुप्प्या
+१
In reply to इस्लामने कधिही अशी तडजोड केली नाही करणार ही नाही by वाहीदा
बहुसंख्य लोक...
In reply to +१ by मन१
असाच विचार करतात. पण काही
In reply to बहुसंख्य लोक... by प्रसन्न केसकर
कोणताही धर्म...
In reply to असाच विचार करतात. पण काही by अप्पा जोगळेकर
विचारसरणी माथेपुरु आहे
In reply to कोणताही धर्म... by प्रसन्न केसकर
तत्वज्ञान आणि विचारसरणी...
In reply to विचारसरणी माथेपुरु आहे by अप्पा जोगळेकर
माझ्या सारख्या अगाढ अज्ञानी
नवीन
इन्सान मिट्टी से पैदा हुवा है, मिट्टी में ही मिलेगा
म्हणजे?
In reply to इन्सान मिट्टी से पैदा हुवा है, मिट्टी में ही मिलेगा by वाहीदा
=)) =)) हाण्ण... मेलो हसुन
In reply to म्हणजे? by विकास
त्यात हसण्यासारखे काय आहे ??
In reply to =)) =)) हाण्ण... मेलो हसुन by Nile
विकास सर हि दोन वेग वेगळी वाक्ये आहेत
In reply to म्हणजे? by विकास
धन्यवाद
In reply to विकास सर हि दोन वेग वेगळी वाक्ये आहेत by वाहीदा
पवित्र अल-कुरआन स्त्री अन पुरुष यांच्या बध्द्ल असे सांगते
In reply to धन्यवाद by विकास
वाचवा.....
वाच्ववा हो वाचवा.
In reply to वाचवा..... by मन१
मनोबा इथे बघ बरे, काही मदत मिळते का
In reply to वाच्ववा हो वाचवा. by मन१
१. It was absolute NULL. फक्त
वाचतोय... चालु द्या
जनाब आप बहुत अच्छा लिहित