Skip to main content

साखरांबा

लेखक रेवती यांनी बुधवार, 23/03/2011 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: एक मोठी कडक कैरी, साखर, केशर, वेलचीपूड, दोन पातेली, त्यावर बसेल असे झाकण, मोठा चमचा, किसणी, चाळणी. कृती: पातेल्यात अर्धा तांब्या पाणी उकळण्यास ठेवावे. कैरीची साले काढून किसून घ्यावी अथवा साले न काढता मोठ्या फोडी करून किसणीवर पालथ्या ठेवून किसाव्यात.कीस वाटीने मोजून घ्यावा. कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचे प्रमाण बदलते. कैरी आंबट नसल्यास एकास एक प्रमाण अथवा सव्वापट, दुप्पट किंवा जास्त साखर घ्यावी. पाण्याला आधण आल्यानंतर पातेल्यावर चाळणी ठेवून कैरीचा कीस पसरावा. झाकण ठेवून वाफ द्यावी. एका कैरीच्या किसासाठी ८ मिनिटे वाफ द्यावी लागली. खूप वाफवल्यास चोथा होइल. वाफवलेला कीस ताटात पसरून गार होवू द्यावा. आता दुसर्‍या पातेल्यात मोजलेली साखर व साखरेच्या निम्मे पाणी पाकासाठी ठेवावे. तीन तारी पाक झाल्यानंतर गार झालेला कीस त्यात घालावा. मध्यम आचेवर चमच्याने ढवळत रहावे. केशरपूड व वेलची पूड घालावी. पातळ झालेला पाक पुन्हा तीनतारीच्या जवळ गेला की आच बंद करावी. गार झाल्यानंतर साखरांबा अजून घट्ट होणार आहे हे लक्षात असू द्यावे. पूर्ण गार झाल्यानंतर साखरांबा बरणीत भरून ठेवावा. sakharamba 003 टीपा: १.कैरी किसण्यासाठी जाड किसणी वापरावी. माझ्याकडे तशी नसल्याने कीस बराच बारीक झाला. २. कैरी अतिशय आंबट असल्यास कीस पिळून घेऊन मग चाळणीवर पसरावा. ३. साखरांबा गार झाल्यानंतर भरून ठेवायची बरणी आधीच अगदी स्वच्छ धुवून, उन्हात वाळवून ठेवावी म्हणजे वर्षभर साखरांबा टिकेल. ४. साखरांबा करण्यासाठी जड बुडाचे पातेले घ्यावे म्हणजे तळाला जळून त्याचा वास साखरांब्याला लागणार नाही.

वाचने 26452
प्रतिक्रिया 144

प्रतिक्रिया

In reply to by रेवती

आले ग...... मला वास आला साखरांब्याचा.........एकदम झक्कास.... आणी साखरांबा करत असताना वास कित्ती छान येतो ना घरभर....व्वा....:)

मातोश्रींकडे मागणी नोंदविण्यात आली आहे! खरंच खुप मस्त पाकृ आहे. - (साखरांबास्नेही) इंट्या.

एकदम झक्कास पाकृ आहे :)

इथपर्यंत प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आभार! आता ज्यांच्या लेखाला मी प्रतिसाद दिलेत त्यांचा सहभाग इथे अपेक्षित आहे हे नमूद करते.;) चला तर मंडळी, एखाद्या पाकृलाही आपण जंगी प्रतिसाद देवू शकतो हे सिद्ध करा!;) हीच संधी! हीच वेळ!! हाच धागा!!!

In reply to by रेवती

छ्या! इथे सामुहिक धन्यवाद देण्यापेक्षा प्रत्येकाला प्रतिसाद देऊन धन्यवाद द्यायचा. प्रतिसादाचा आकडा हा हा म्हणता वाढला असता ;)

In reply to by अनामिक

आहे आहे आहे. तुमच्या मागल्यावेळचा सल्ला अजून ध्यानात आहे.;) इडलीच्या पाकृला झालेल्या चुका १. विकांताला धागा टाकणे. २. भारतातल्या रात्री (लोक कंटाळलेले असताना) धागा चढवणे. ३. प्रत्येकाला शेपरेटली गाठून आभारप्रदर्शन न करणे.

In reply to by रेवती

१. पुणे मुंबई वर धागा न टाकणे २. स्त्री-पुरुष मुक्ती वर धागा नं टाकणे ३. मराठी - अमराठी लोकांवर धागा नं टाकणे ४. संस्कृती रक्षनावर धागा ण टाकणे इत्यादी करणे .. १०० हिरावून घेत आल्यात

रेवतीताई, साखरांबा/मुरांबा तर मस्तच दिसतोय. मी असे अवघड आंइ जास्त काळ टिकणारे पदार्थ बनवण्याची रिस्क कधीच घेत नाही. बहुदा फसतात :( तुमचा मुरांबा पिवळा दिसतोय, माझी आई पण साखर घालूनच करते पण त्याला जरा ब्राऊनीश शेड येते. मी माझा सहभाग नोंदवला बरं का... तेवढीच भर ;) --------------------------------------------------- मला अक्षरांचा रंग का बदलता येत नाही??

In reply to by स्मिता.

तुमचा मुरांबा पिवळा दिसतोय, माझी आई पण साखर घालूनच करते पण त्याला जरा ब्राऊनीश शेड येते. >>अधिक काळ गरम गेल्या मुळे/पाणी कमी पडल्यामुळे/रेग्युलर साखर न वापल्यामुळे अशी ब्राऊनिश शेड आल्या असावी. जाणकारांकरवी अधिक प्रकाश टाकल्या जावा. - (बल्ल्वाचार्य) इंट्या.

In reply to by इंटरनेटस्नेही

अरे वा इंट्या! तुम्हाला तर बरीच माहिती दिसते... छुपे बल्लवाचार्यच आहात तुम्ही. माहितीबद्दल धन्यवाद!

In reply to by स्मिता.

कैरीचा कीस कोणत्या रंगाचा आहे त्यावरही रंग अवलंबून असतो. काही कैर्‍यांचे गर किंचित पिवळसर असतात त्यामुळे रंग बदलतो. कोणत्या धातूच्या पातेल्यात साखरांबा केला जातो तेही पहायला हवे. पूर्वी कल्हईच्या पातेल्यातच मुरांबा करत असत. लोखंडी कढईत मुरांबा केल्याचा अनुभव मला नाही. कैरीचा कीस वाफवताना स्टीलच्या पातेल्यातले पाणी १० मिनिटात काळे झाले होते. आधी वाटले कि यातलेच पाकाला वापरू पण रंग जाण्याच्या भीतीने वापरले नाही.

In reply to by रेवती

ओके धन्यवाद, रेवती ताई. :) अजुन एक शंका, खायचा रंग वापरणे कितपत अ‍ॅडव्हायजेबल आहे? बाजारात मिळण्यार्‍या साखरंबा आणि मुरांब्या मध्ये तो टाकलेला असतो का? - (शंकेखोर) इंट्या.

In reply to by इंटरनेटस्नेही

मी तरी रंग वापरला नाही. तुम्हीही वापरू नये असे वाटते आहे. बाजारच्या पदार्थांना देखणेपणा आणावा लागतो म्हणून काहीजण वापरत असतीलही.

In reply to by रेवती

तुम्हीही वापरू नये असे वाटते आहे.
रेवतीशी सहमत. (रंगामुळे (रंगाशेट नव्हे, खायचा रंग म्हणतोय मी. ;) ) सपाटुन मार खाल्लेला)- गणा ९८* *नाबाद ;)

In reply to by रेवती

मला वाटतं कैरीच्या गराचा पिवळसर रंग आणि पातेले यामुळेच फरक पडत असावा. कारण आमच्या घरात नेहमीचीच साखर वापरली जाते.

नक्की शतक गाठणार

In reply to by निवेदिता-ताई

हे हे... बघुयात कोण किती वाद उकरून काढतय? त्यावर खरा रंग अवलंबून आहे.;) माझ्या धाग्याच्या पायगुणानं आपण म्याच जिंकलो.;)

In reply to by रेवती

पाककृती प्रमाणे सामन्याचा शेवट गोड झाला . आता मोहालीच्या सामन्यात मोठा राडा होणार ( तेथील मैदानावर ) तेव्हा एक राडेबाज पाककृती हवी .

In reply to by रेवती

माझ्या धाग्याच्या पायगुणानं आपण म्याच जिंकलो.Wink
पुढाल्या बुधवारी अजुन एक गोड रेशीपी पायजेलाय. :)

In reply to by गणपा

असंच म्हणतो! वरील बहुतेक प्रतिसादकांप्रमाणेच मधल्या सुटीत साखरांचा/मुरांबा इ. सोबत खाल्लेले खाल्लेले पोळीचे रोल्स आठवले.. आज आधीच मॅचमुळे घरची खूप आठवण येत होती त्यात हे.. कुफेहेपा? ;)

या पाककृतीमध्ये साखरेचे प्रमाण थोडे कमी करुन मीठ घातले आणि केशराऐवजी लाल तिखट घातले तर जे काही तयार होईल, त्याला छुंदा म्हटलेलें चालेल का? - नसलेले ज्ञान पाजळणारी माउ

धाग्याने अशीच शंभरी गाठल्याने मी आपला साधा सोज्वळ प्रतिसाद देत आहे.. साखरांब्यामुळे बर्‍याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. मी लहानपणी पक्का गोडघाशा होतो त्यामुळे साखरांबे (कैरीचा आणि करवंदाचा) म्हणजे जीव की प्राण... ते वर कोणीतरी लिहील्याप्रमाणे पोळीला तूप लावून साखरांबा खाणे सततच चालायचे.. सद्ध्या फारसे गोड खात नाही त्यामुळे ३.५. वर्षांपूर्वी पहिल्यांदा भारतातून आलो तेव्हा आणलेला साखरांबा अजूनही पडून आहे..

In reply to by लंबूटांग

या धाग्यावर कीतीही अवांतर प्रतिसाद दिला तर डिलीट होणार नाही अशी टीप मिळाल्याने प्रतिसाद देत आहे. ;-) बाकी साखरांबा मिळणार असेल तर अजुन दहा प्रतिसाद देउ, हाकानाका. ;-)

In reply to by विकास

हाहा, त्याला साखरकरवंदा म्हणायला पाहिजे खरं तर. बाकी कसा करतात वगैरे काय माहिती नाही ब्वॉ. कसा खातात ते माहित आहे फक्त.

मी आपला साधा सोज्वळ प्रतिसाद देत आहे.. असे आधीच जाहीर केल्याने अनेकांनी (पक्षी- सं.मं., विविध परदेशस्थ वगैरे) हुश्यश्यश्यश्यश्यश्यश्य केले असणार. ;)

९८ प्रतिसाद झाल्यामुळे हा धागा वाचनमात्र करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी मिसळपावची संपादकीय धोरणे पहावीत. -जेवती

धन्यवाद! धन्यवाद!! धन्यवाद!! सर्व प्रतिसादकांचे आभार! त्यांनी बारीऽऽक लक्ष ठेवून शेवटी माझ्या धाग्याला शतकापार नेले.:) धाग्याआधी दोन दिवस येताजाता दिसेल त्याला 'माझा धागा येतोय' असे अप्रत्यक्षपणे सांगून ठेवले होते. त्यातूनही जर कुठे गणित फसले तर भारतात आणि घरात काही छुपे प्रतिसादक तयार ठेवले होते. जाहिरातबाजी करताना आपण मागे पडता कामा नये. आपला सर्वसाधारण दिसणारा मालही खपवता आला पाहिजे. माझा प्लॅन चिंतामणरावांनी अनवधानाने का होइना पण ओळखला. आपल्या प्रोत्साहनामुळे लवकरच माझा लाळेर्‍यांचा बिझनेस भरभराटीला येइल अशी आशा वाटते.;)

In reply to by रेवती

रौप्य! सुवर्ण ! हिरक! माहिताहेत. १००री ला काय म्हणतात? आता तु तुला कोणी आज्जी म्हंटल म्हणुन तक्रार नाही ना करणार? ( असा १००रे गाठायचा अस्तो होय? मला वाटल आच्रत बच्रत लिहुन गाठता येतो)

In reply to by स्पंदना

२५ :- रजत महोत्सव ५० :- सुवर्ण महोत्सव ७५ :- हीरक महोत्सव १०० :- अमृत महोत्सव. अजूनही येणारे प्रतिसाद पाहून रेवतीआज्जी चांदीच्या वाटीतून अमृतांबा खाणार असं दिसतंय. सर्वात लोकप्रिय (आणि वेल मार्केटेड) पाककृतीचा पुरस्कार या धाग्याला देण्यात येत आहे. - अमृती

In reply to by नगरीनिरंजन

ओ दादा, गणित चुकलं की हो. ६० ला 'हीरक' नि ७५ ला 'अमृत' महोत्सव असतो. १०० ला शतकच म्हणतात. मधे ८०-८१ च्या आसपास कुठेतरी 'सहस्रचंद्रदर्शन' असते.

In reply to by रमताराम

तुमचं बराबर हाय दादा, पण आपण रेवतीआज्जीच्या वयाबद्दल नाय ना बोलत? मग हे पाहा. A Diamond Jubilee is a celebration held to mark a 60th anniversary in the case of a person (e.g. wedding anniversary, length of time a monarch has reigned as King or Queen, etc.) or a 75th anniversary in the case of an event.[1]

व्वा! मस्त दिसतोय साखरांबा! (प्रतिसाद दिलेला आहे याची नोंद घ्यावी.(स्साला पब्लिक इथं दणादण शतकं ठोकतंय आणि आमचं घोडं मात्र हाफ सेंच्युरीच्या आधीच बसतं. सोचनाऽऽ पडेंगाऽऽऽ ) )

In reply to by नगरीनिरंजन

झायरात तंत्र आत्मसात करा ननि!;) आपला कंपू नसला तरी कंपूतलेच असल्याप्रमाणे वावरता आले म्हणजे झाले!

In reply to by रेवती

आपला कंपू नसला तरी कंपूतलेच असल्याप्रमाणे वावरता आले म्हणजे झाले! ख्या ख्या ख्या खी खी खी... यशस्वी धाग्याचे सुत्र सांगितलेस गं मुली... ;) बाकी +१ आणि तू सहमत आणि मी सहमतचे राजकारण पण करता आले पाहिजे बरं... कसे ? ;)

अर्रेच्च्या संधी हुकली, शंभरावा प्रतिसाद लिहाय्ला ऑफीसात काम पण केलं नाही आज..

In reply to by बिपिन कार्यकर्ते

णिळ्या लायनीत विसर्ग द्यायचा राहिल्या गेला आहे का ? - शाहिन सिटीकर्ते

In reply to by टारझन

=)) _/\_ टारझन : विरजण

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पाकृ : झक्कास! फोटो : खल्लास! दंगा : मस्त! रेवती : महान!
हेच आणि असेच म्हणतो! - (आनंदी) इंट्या.

अरे बाबांनो/ बायांनो, बास, बास!! कशीबशी शंभरी गाठायची होती........माझ्याकडून जाहिरात जरा जास्तच झाली वाट्टं!;) इंट्या, टार्‍या, पैसाताई बास! हवीतर खरड करून नवी पाकृ सुचवा.:) दिपाली, अगं तुझा मॅणेजर मला शिव्या घालेल ना! आता यावर उपप्रतिसाद नकोयत.;)

In reply to by नगरीनिरंजन

पाकृ मुरवायसाठीच्या काही टिप्स? आमची पाकृ थंड व्ह्यायच्या आधीच संमं ने खाल्लेली दिसते :(.

आणि धाग्याने शतक झळकवले की. इतरजणांच्या धाग्यांना प्रतिसाद देऊन-देऊन जमा केलेले पुण्य कामी आले की.. ;) -सूर्यपुत्र.

एव्हढा उहापोह झाला पण कुणाला हा साखरांबा ब्रेड बरोबर कसा लागेल हा प्रश्न कसा काय नाही प्डला? ब्रेड बरोबर टॉर्टीला, नान, एट्सेट्रा एट्सेत्रा ची पण उद्बोधक चर्चा व्हावी,

शमव तुझी भूक रेवती. हा घे अजून एक प्रतिसादअजून एक प्रतिसाद, गुळांबा/साखरांबा/मुरांबा/छुंदा हे सगळे अतिशय आवडीचे