✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मानाचा मुजरा

प
प्रचेतस यांनी
Tue, 03/22/2011 - 09:01  ·  लेख
लेख
आज फाल्गुन वद्य तृतीया. महाराजांची ३८१ वी जयंती. या अलौकिक व्यक्तिमत्वाला समस्त मिपाकरांतर्फे आमचा मानाचा मुजरा. पवित्र जन्मस्थळ जीवधन रतनगड सुधागड हडसर वासोट्याचा नागेश्वर राजमाचीवरून सिंहगड बुलंद, बळकट, बेलाग. पारतंत्र्यातून मुक्त झालेला पहिला भाग्यवान किल्ले तोरणा जावळीच्या रानातला मकरंदगड घनगड घनगडावरून दिसणारा तैलबैला बळकट रोहिडा लांबलचक पट्टा उर्फ विश्रामगड बेलाग माहुली पहिली राजधानी-राजगड यांसम हाच-दुर्गदुर्गेश्वर रायगड नतमस्तक
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
8512 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

मानाचा मुजरा...

प्रशु
Tue, 03/22/2011 - 10:32 नवीन
श्री शिव चरणी मानाचा मुजरा.. वल्ली खुपच छान छायाचित्रे. तुम्ही स्वतः काढली आहेत का?
  • Log in or register to post comments

होय

प्रचेतस
Tue, 03/22/2011 - 10:35 नवीन
सर्व छायाचित्रे माझीच आहेत. रतनगडाचे एक छायाचित्र फक्त मामेभावाने काढलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु

वल्ली!... वरील छायाचित्रे

मृगनयनी
Tue, 03/22/2011 - 10:41 नवीन
वल्ली!... वरील छायाचित्रे खूपच छान आहेत! :) क्षत्रियकुलावतंस गोब्राह्मणप्रतिपालक बहुजनोद्धारक प्रौढप्रतापपुरन्दर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सगळेच फोटो मस्त... आणि फोटो

हरिप्रिया_
Tue, 03/22/2011 - 10:47 नवीन
सगळेच फोटो मस्त... आणि फोटो पाहता पाहताच स्फुरण चढले... शिवरायांना मानाचा मुजरा आमच्याकडूनही..
  • Log in or register to post comments

वल्या सगळेच फोटू एकदम कडक

स्पा
Tue, 03/22/2011 - 10:56 नवीन
वल्या सगळेच फोटू एकदम कडक .... मस्तच आहेत यार... जियो महाराजांना दुसर्यांदा ह्याप्पी बड्डे !!!!
  • Log in or register to post comments

आमचापण त्रिवार मुजरा

प.पु.
Tue, 03/22/2011 - 10:56 नवीन
आमचापण त्रिवार मुजरा
  • Log in or register to post comments

सुरेख छायाचित्रे

मनीषा
Tue, 03/22/2011 - 10:57 नवीन
सुरेख छायाचित्रे ...! शिवछ्त्रपतिंना विनम्र अभिवादन !! या भूमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही | महाराष्ट्र धर्म राहीला कांही | तुम्हा कारणें ||
  • Log in or register to post comments

छायाचित्रे अप्रतिम...!!! हर

नन्दादीप
Tue, 03/22/2011 - 12:12 नवीन
छायाचित्रे अप्रतिम...!!! हर हर महादेव.....!!! कालच "संभाजी" वाचून पूर्ण केल, पुर्णपणे शिवकाळात वावरतोय अजून..... शिवाजी महराज की जय...!!!
  • Log in or register to post comments

पहीला

मॅक
Tue, 03/22/2011 - 14:33 नवीन
पहीला छत्रपतींना........... दुसरा तुमच्या फोटोग्रफीला...... तिसरा तुम्हाला ............ मानाचा मुजरा...
  • Log in or register to post comments

जोहार ! वल्ली धन्यवाद.

विनायक बेलापुरे
Tue, 03/22/2011 - 15:06 नवीन
जोहार ! वल्ली धन्यवाद.
  • Log in or register to post comments

ज ब र द स्त !

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/22/2011 - 15:15 नवीन
ज ब र द स्त !
  • Log in or register to post comments

कड्यावर उभा असलेल्या

Nile
Tue, 03/22/2011 - 15:27 नवीन
कड्यावर उभा असलेल्या मनुष्याचे सिल्युएट चित्र फार आवडले.
  • Log in or register to post comments

काय शिंची कटकट आहे

गणपा
Tue, 03/22/2011 - 15:28 नवीन
काय शिंची कटकट आहे.... एक तर स्वतः पायाला भिंगरी लावल्या गत दर्‍याखोर्‍यांत फिरतात. फिरतात तर फिरुदे पण वर इकडे येउन असे उत्तम फोटू टाकुन आमची जळवतात. विमुक्तासारखं किल्लेदार,जातीवंत भटका,योगेश२४,५० फक्त, वल्ली आदी लोकांना ही एखाद्या कोठडीत डांबुन ठेवाव वा नाना सोबत अज्ञात्वासासतरी धाडुन द्याव असा प्रस्ताव मांडत आहे.
  • Log in or register to post comments

अलौकिक

VINODBANKHELE
Tue, 03/22/2011 - 15:36 नवीन
अलौकिक व्यक्तिमत्वाचे अलौकिक स्मरण.......................
  • Log in or register to post comments

मस्तच

स्वच्छंदी_मनोज
Tue, 03/22/2011 - 16:08 नवीन
हायला... घनगडाला वरती जायला शिडी केव्हा बसवली? वल्लीसाहेब मस्तच छायाचित्रे.. खुप खुप आठवणी जाग्या केल्यात...तुम्हीही माझ्या आवडिच्या जातकुळिचे निघालात. यात पुरंदर, सिंधुदुर्गचे फोटो असायला हवे होते असे वाटुन गेले.... हरकत नाही. भाग दोन म्हणुन अजुन काही किल्ल्यांचे फोटो टाका.
  • Log in or register to post comments

घनगडाला

प्रचेतस
Tue, 03/22/2011 - 16:13 नवीन
घनगडाला साधारण ७/८ महिन्यापुर्वीच शिडी बसवलीये. पुरंदरला गेलो होतो तेव्हा डीजीकॅम नव्हता. सिंधुदुर्गाचे दर्शन घ्यायला जायचे आहे अजून. तो योग लवकरच येवो अशी प्रार्थना करतोय महाराजांपाशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज

झक्कास रे गड्या !!

जातीवंत भटका
गुरुवार, 03/24/2011 - 13:23 नवीन
मस्तच !! सगळे फोटो अप्रतिम !!! शिवरायांस आम्हा पामराचा मानाचा मुजरा .... श्रीशिवरायाचा जयकार सह्याद्रीवर घुमतो अजून तुझ्या शौर्याचा हुंकार ... श्वासाश्वासातून निघतो श्रीशिवरायाचा जयकार ... म्लेंच्छांनी घातले घाव घाव मातृभूमी वरी .. परदास्याच्या अंधःकारातून पेटला स्वातंत्र्याचा रवी ... घेऊनी रामदासी मंत्र गर्जला हा नृसिंह असा ... दुमदूमला आसमंत सारा थरथरल्या दाही दिशा ... मावळे मराठे मर्द झुंजले अर्पुनी प्राण ... रोवले छातीत मोघलांच्या तेजस्वी भगवे निशाण ... तासिले कडे अभेद्य घडविले दुर्ग बेलाग ... सळसळती मनगटे मराठी अन् समशेर ओकते आग ... हिंदवी स्वराज्याचा ज्यानी थाटला संसार साजरा ... त्या जाणत्या राजांस करितो मानाचा त्रिवार मुजरा ... --- वेडा कवी - अमोल (जातीवंत भटका ...)
  • Log in or register to post comments

शिवछत्रपतींना मानाचा मुजरा....

ज्ञानराम
गुरुवार, 03/24/2011 - 13:39 नवीन
शिवछत्रपतींना मानाचा मुजरा.... फोटो जबरदस्त आलेत.......
  • Log in or register to post comments

हा धागा कसाकाय सुटला होता कोण

वपाडाव
गुरुवार, 03/24/2011 - 14:40 नवीन
हा धागा कसाकाय सुटला होता कोण जाणे.... पण एकंच बोल्तो... अव्वल
  • Log in or register to post comments

एकदम झकास.....

प्रास
Sun, 03/27/2011 - 14:41 नवीन
मनापासून नमोनमः!
  • Log in or register to post comments

बुलंद बेलाग बळकट.वा.

अप्पा जोगळेकर
Sun, 03/27/2011 - 15:56 नवीन
बुलंद बेलाग बळकट.वा. फोटोसुद्धा अगदी तसेच.
  • Log in or register to post comments

शिवछत्रपतींना मानाचा

गणेशा
Mon, 03/28/2011 - 16:21 नवीन
शिवछत्रपतींना मानाचा मुजरा.... फोटो जबरदस्त
  • Log in or register to post comments

मुजरा!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/28/2011 - 19:21 नवीन
मुजरा!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा