ओले परीस...

स्वानंद मारुलकर जे न देखे रवी...
डोळ्यामधील आसू परतून ना गळावे धुंदीत मी जगावे, धुंदीत मी मरावे आता न जाणवावी दुःखे उदासवाणी ’दारू’ परीस ओले जखमांवरी फिरावे तार्‍यांत वावरावे सहवास चांदण्यांचा डोळे उभ्या जगाचे माझ्याकडे असावे काळोख दाटलेला आहे दहा दिशांनी श्वासात ध्यास आहे तोची प्रकाश दावे आत्म्यात राम राहे, आत्म्यात कॄष्ण आहे हे राम-कॄष्ण आता बाहेरही दिसावे - स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com
वर्गीकरण
लेखनविषय:

4 टिप्पण्या 1,387 दृश्ये

Comments

राजेश घासकडवी नवीन

शेवटच्या दोन ओळी काहीशा वेगळ्या जातकुळीच्या वाटल्या. पण बाकीचं चांगलं जमलंय.

चित्रा नवीन

गेय कविता आवडली. (*येणार नाथ आता च्या चालीवर गुणगुणून पाहिली. छान जमते आहे!) दारू परीस ओले हे वेगळे वाटले. डोळे उभ्या जगाचे माझ्याकडे असावे हे जरा लक्ष वेधून घ्यायचे आहे असे वाटले. पण मग त्यावर शेवटचे कडवे वेगळे वाटते (कडवे म्हणून आवडले तरी ते या कवितेत का बसते हे समजून दिल्यास -रसग्रहण केल्यास- आवडेल).

कच्ची कैरी नवीन

दारु ओले परीस ?:( कवितेचा अभिप्राय नीट कळला नाही :( काय करणार कच्ची आहे ना मी ;)