✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

छायाचित्रकला-३

श
शरद यांनी
Wed, 03/09/2011 - 10:18  ·  लेख
लेख
आज DoF ची माहिती करून घेऊ. खालील आकृतीत ab ची प्रतिमा cd येथे पडली आहे. (कॅमेर्‍यातील फ़िल्म किंवा ccd) आपण पाहिले की ab शेजारील e आणि f या मधील वस्तूंच्या प्रतिमा जरी cd येथे थोड्या हललेल्या असतील तरी त्या आपणास शार्प वाटतात. (दृष्टीभ्रम.) या e-f अंतराला म्हणावयाचे DoF. नेहमी a-e हे अंतर a-f या अंतरापेक्षा जास्त असते. DoF जास्त पाहिजे असेल तर (१) फ़ोकल लेंथ कमी करा. १०० एमेम्ची लेन्स वापरावयाच्या ऐवजी ५० एमेम ची लेन्स वापरलीत तर DoF जास्त मिळेल. (२) ab-cd हे अंतर वाढवा. १० फूटा ऐवजी १५ फूटावर फ़ोकस केलेत तर DoF वाढेल (३) अपर्चर नंबर वाढवा. (अपर्चर आकार कमी करा.) f4च्या ऐवजी f8 ने फोटो काढलात तर DoF वाढेल. dof-5 Do F DoF कशाकरिता वाढवावयाचा ? फोटोतील सगळ्या वस्तू शार्प दिसाव्यात म्हणून. ठीक. एवढी माहिती मागेच पाहिली होती. गणिताची हौस असलेल्या लोकांनी आपले काम सोपे व्हावे म्हणून सारण्या केल्या. म्हणजे तुम्ही फ़ोकल लेंथ, अपर्चर व अंतर याचे कोणतेही कॉंम्बिनेशन तुम्ही केलेत तरीही DoF तुम्हाला सारिणीमध्ये मिळते. उदा. २० फूटावर फ़ोकस केले, अपर्चर ४ होते फ़ोकल लेंथ ५० एमेम होती तर DoF १५ ते ५० फूट. त्याच फ़ोकल लेंथने, त्याच अंतरावर ८ अपर्चरने फोटो काढला तर DoF होईल १२ ते ७० फूट. (उदा. फक्त सारिणी काय सांगते ते कळण्याकरता ) Hyperfocal distance ची सारिणी आहे. मागील वेळी आपण मित्र व ताजमहाल यांचा फोटो काढणार होतो. मित्र १० फूटावर व ताजमहाल ८० फूटावर (infinity) असेल आणि सारिणी सांगत असेल की HD १५ फूट आहे तर तेथे, मित्राच्या मागे ५ फूट, फ़ोकस करा. आता DoF असेल ७-ते १०० फूट. म्हणजे मित्र व ताजमहाल दोन्हीही शार्प दिसतील. ab येथे मित्र, g -c हायपरफोकल अंतर व मागे दूर अंतरावर ताजमहाल. दोन्ही शार्प. dof-2 आता तुम्हा आम्हाला याचा काही उपयोग आहे कां ? माझ्या मते नाही. आपण खिशात टेबल ठेऊन, अंतर मोजून, फोटो काढत नाही.( Proffessional Industrial Photograffers हे करतात.) आणि म्हणूनच मागे ह्या सारण्या दिल्या नव्हत्या. वरील १,२,३ लक्षात ठेवा, फोटो काढा. आणि हीच गोष्ट मी फोटो देण्याची. मी वापरलेले अपर्चर,अंतर व फ़ोकल लेंथ तुम्ही वापरणार नाही तर अशा फोटोंचा तुम्हाला काय उपयोग ? त्या ऐवजी एकच फोटो निरनिराळे बदल करून काढा व स्वत:च बघा. नंतर डिलिट करा. वाटले तर मिपावर प्रसिद्ध करा. सारिणींचा उपयोग करणे सोपे आहे; जर कुणाला अडचण वाटली तर विचारा. पुढचा भाग उद्या. शरद

Book traversal links for छायाचित्रकला-३

  • ‹ छायाचित्रकला-२
  • Up
  • छायाचित्रकला-४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2349 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

उपयुक्त माहिती

सहज
Wed, 03/09/2011 - 14:53 नवीन
उपयुक्त माहिती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/09/2011 - 15:24 नवीन
उपयुक्त माहिती. सराव करायला सुरूवात करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+१

प्रचेतस
Wed, 03/09/2011 - 15:12 नवीन
वाचनखूण साठवत आहेच.
  • Log in or register to post comments

सापडला हा भाग. वाचनखूण साठवली

यशोधरा
Mon, 03/21/2011 - 11:28 नवीन
सापडला हा भाग. वाचनखूण साठवली आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा