Skip to main content

भारत वि. वेस्ट इंडीज म्याच, कोण जिंकणार ?

लेखक बाबुराव यांनी रविवार, 20/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 781
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

भारताची ब्याटींग संपली. दोनशे अडुसष्ट रन झाले. शेवटच्या दहा वोवरीत जसे रन पाहिजे होते तसे काय झाले नाय. आपले कागदावरचे वाघ कागदावर लय भारी वाटतेत हे आजून एकदा सिद्ध झाले. बॉलर आता काय करिश्मा दाखवतेत ते आपून पाहूच. तव्हर आपापला अंदाज टाकत राव्हा. सच्या म्याचमधी फेल गेल्यावर भारत जिंकतो का काय तेबी आज दिसन. बाबुराव :)

बाबुराव, बसा कि राव निवांत...... गाणं म्हणत.................. "मी बाबुराव बोलतोय".................... :wink: कशाला उगा सट्टा लावताय ......... म्याचवर..................??? :wink:

In reply to by सुधीर१३७

मत टाकाचा तर टाकाचा नाय तर नाय टाकाचा बाकी पंच्यादी कशाला कराच्या म्हंतो मी. कल्तं का काय क्रिकेटचं. बाबुराव :)

आधी "भारत द.अफ्रिका म्याच भारत हारणार ?" झाले, भारत हरला. आता "भारत वि. वेस्ट इंडीज म्याच, कोण जिंकणार ?" म्हंजी............................................................

In reply to by चिंतामणी

भारत जिकावा वाटतं भाऊ. पर सारं उलटंच होऊन राह्यलं. आता इंडीजचा प्लेर क्लेरकट रन आऊट होता. ग्राउंडवरच्या हांपरला दिसला नाय. :( रिव्ह्यु घेउन का होईना लेगबिफोरची विकेट पडली. नाव स्कोर इज थर्टीफोर लॉस ऑफ वन विकेट इन सिक्स ओवर. बाबुराव :)

काय फरक पडतो? जिंकले तर कांगारुंशी गाठ हरले तर श्रीलंकेशी. इकडे आड आणि तिकडे विहिर. पोहता न येणारा बुडणारच ना शेवटी. ;) (श्या खाल्ल्या शिवाय जिंकता येत नाय आपल्या लोकांले)

In reply to by गणपा

पण दगडापेक्षा वीट मऊ रे. बाबुराव, आज तुमचा प्रश्न 'कोण हरणार?' असा हवा होता. जिंकल्यास पाकड्यांकडून मार खाऊन चवताळलेल्या कांगारुंशी खेळावे लागेल. त्यामुळे दोन्ही संघांनी हरण्याचा प्रयत्न करावा हे उत्तम, दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने श्रीलंकेशी खेळणे निदान काही संधी देणारे असेल. 'हरण्याचे उद्दीष्ट' साध्य करणारी टीमच जिंकणार शेवटी.

In reply to by रमताराम

श्रीलंकेला श्रीलेंकेत जाउन हरवणे अवघडच पडले असते .. आणि श्रीलंका हा सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघापेक्षा चांगला संघ आहे .. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ला भारतात आपण सहज हरवु शकतो कंपेअर टु श्रीलंकेला श्रीलंकेत ते ही त्यांच्या मस्त बॉलिंग पुढे ... जे होते ते चांगल्या साठीच होते ... आणि विश्ववर्ल्ड कप एकच संघ घेवून जातो .. त्यामुळे कधी ना कधी अवघड संघांशी खेळायला लागणारच .. उलट २४ ला जिंकल्यावर वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपण विश्वकरंडकावरती पण नाव कोरु शकु .. आणि उद्या हरणार असु तर निदान श्रीलंका जिंकुन त्यांना तर पुढे जाउन ऑस्ट्रेलियाशी जिंकण्याची संधी देवू ... बाकी पाकिस्थान संघाची भरारी स्वप्नवत वाटते आहे ... वाटलेच नव्हते ते इतकी जोरदार मुसंडी मारतील .. बघुया भेटायला पाहिजे आपल्या संघासमोर एकदा तरी .. जाता जाता सच्या ने शोएब ला बदडवलेले पाहिचे आहे .. लय बकबक करुन राहिलीय ना ही एक्सप्रेस ..

In reply to by गणेशा

श्रीलंकेला श्रीलेंकेत जाउन हरवणे अवघडच पडले असते ..
जर लंकेची गाठभेट झाली असतीच उपउपांत्य सामन्यात तर तो सामना भारतातच झाला असता अस कुठेस वाचल. आणि तरी सुद्धा १९९६ च्या उपांत्य सामन्या सारखा घरच्या प्रेक्षकांच दडपण घेत आपल्या विरांनी तो ही सामना अवघड करुन ठेवला असता. अशी शक्यता नाकारता आली नसती. ;)