मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झट्पट ब्रेड वडा ..(पाव वडा)

पियुशा · · पाककृती
झट्पट ब्रेड वडा ..(पाव वडा) ब्रेड वडा साहित्य :- ब्रेड, उकडलेले बटाटे ४-५ ,जीर ,मोहरी ,१ वाटी चिरलेला कांदा , १ टी स्पून लाल तिखट ,१ टी स्पून मॅगी मसाला ,मीठ ,ओवा , तिळ १ चमचा ,आणि भरपूर कोथिंबीर ,बेसन २ वाटी बस ........ कृती :- कढइत थोड तेल गरम करून त्यात जीर मोहरी तडतडवा,कांदा परतून घ्या ,लाल तिखट घाला ,चवीनुसार मीठ ,हळद घाला .आता या मिश्रणात उकडलेले बटाटे बारीक करून घाला,कोथिंबीर घाला छान मिक्स करा ,मिश्रण थोड गार होऊ द्या ,मग हाताने बटाटा थोडा कुस्कुरून घ्या एका बाउल मध्ये बेसन ,मीठ ओवा ,तिळ,कोथिंबीर ,थोड लाल तिखट ,मॅगी मसाला,यांचे मिश्रण करून घ्या (जास्ती पातळ नको ,आणि जास्ती घट्ट हि नको ,मध्यम ) ब्रेडच्या स्लाईस वर बटाटा मिश्रण पसरून दुसरी स्लाईस लावा मिश्रण बाहेर येऊ नये म्हणून बेडच्या कडा पाण्याचा हात लावून दाबून घ्या आता हे भरलेले स्लाईसेस बेसनात छान घोळवून तेलात डीप फ्राय करा ... सॉस बरोबर गरम गरम सर्व्ह करा ............................:)

वाचने 11428 वाचनखूण प्रतिक्रिया 17

In reply to by पिंगू

टारझन Fri, 03/18/2011 - 18:21
फोटू बघुन खायची वासनाच उडाली ... निदान ह्या जन्मात तरी ही रेशेपी खाईल की नाही शंकाच आहे. खाणार्‍याबद्दल सहाणुभुती , एवढंच म्हणेन. अतिषय सुमार फोटो. स्पष्ट प्रतिक्रीयेबद्दल राग मानु नये ( कारण मानला तरी फरक पडणार नाहीये :) ) -(स्पष्टवक्ता) शेहेंशा

In reply to by टारझन

पियुशा Sun, 03/20/2011 - 12:18
अतिषय सुमार फोटो. मोबाइल्वरुन काधलेत,समझा ! एक्दा सान्गितल ना आम्चा धागा इग्नोर करा कशाला आपला अमुल्य वेळ वाया घालतोस शिसारि बसेपर्यन्त !;)

In reply to by पियुशा

टारझन Sun, 03/20/2011 - 15:07
आम्ही लेखकाला इग्नोर करतो , लेखणाला नाही. तेंव्हा तुम्हाला इग्नोर केल्या आहे. पब्लिक फोरम वर धागे टाकुन वर इग्नोर करण्याच हक्क तुम्हाला नाही. :) - शाशाशा

In reply to by पर्नल नेने मराठे

टारझन Sun, 03/20/2011 - 15:55
ह्याला म्हणतात ब्रेड पकोडा , आणि हा आहे खरा फोटु ;) पुन्हा खावेसे वाटत आहेत ब्रेड पकोडे .. धन्यवाद चुचे :) चटणी खुप टेंप्टिंग आहे.

५० फक्त Sat, 03/19/2011 - 10:30
करायचं, फोटो काढायचे आणि इथं छापायचं, आयला त्या पेक्षा एक डाव बोलवा की समद्यांना खायाला. म्हणजे प्रत्यक्श सांगता येईल कसं झालंय ते . हा पदार्थ खायची सवय पार सोलापुरापासुनचिच, तिथं याला संगम वडा म्हणतात. आणि पुण्यात बिपिन कडं मिळणारं पाव पॅटिस याचाच चुलत भाव म्हणाना. असो, यानंतर्च्या पाक्रु बरोबर आमंत्रण नसेल तर प्रतिसादाची संख्या व पातळी खालावु शकते या शक्यतेचा विचार करावा. आणि हो जे झालंय ते भारीच असणार. पण एक शंका आहे, मॅगीचा मसाला यात घातल्यावर मॅगीत काय एव्हरेस्ट मटण मसाला घालणार काय ?

चिंतामणी Sat, 03/19/2011 - 11:00
यानंतर्च्या पाक्रु बरोबर आमंत्रण नसेल तर प्रतिसादाची संख्या व पातळी खालावु शकते या शक्यतेचा विचार करावा. + १ (नाव बदल. ५० फक्त वाचून कोण डेअरींग करणार आमंत्रण द्यायचे. बाकी ज्याची घरी सोय आहे त्यांना बोलावण्यापेक्षा 'परा'धिन माणसाला बोलवेल ती..;) )