बृस्केत्ता टोस्ट (इटालियन अपेटायझर)
माझी ही पाक्रु 'सामना' च्या फुलोरा आवृत्तीत पण छापून आली होती. त्यावर 'उपक्रम' संकेतस्थळावर बरीच चर्चा झाली. चर्चे चा मुद्दा हा होता कि ब्रेड च्या एका स्लाईस मध्ये ६५-७५ कॅलोरी असतात तर मग ४ स्लाईस बृस्केत्ता टोस्ट मध्ये २०० कॅलोरीस असे मी कसं लिहू शकते. म्हणून मला इथे हा खुलासा करावासा वाटला. आपण अंतर्जालावर ज्या कॅलोरी काउन्ट वाचतो त्या सगळ्याच बरोबर किंवा आपल्या देशाला, राहणीमानाला अनुरूप अश्या नसतात. उ. दा. क्रीम, पनीर, केक, नान किंवा ब्रेड सारखे पदार्थ. ह्याचे कारण कि इंडिअन आणि पाश्चात्य पोर्शन साईझ मधला असलेला फरक आणि त्या पदार्थाचे ingredients आणि प्रोसेसिंग. आपल्या कडे मिळणारा होल व्हीट ब्रेड ची स्लाईस खूप बारीक असते. संकेत्स्थालान्वरच्या माहिती नुसार १ ब्रेड स्लाईस (२५ग) = ६५- ७५ कॅलोरी पण आपल्या देशात मिळणाऱ्या ब्रेड स्लाईस चे वजन १५-२० ग्रॅम (४०-४५ कॅल) असून ती जास्त बारीक पण कापलेली असते. तर म्हणून ४ बृस्केत्ता टोस्ट मधून सुमारे २०० कॅलोरी मिळतील असं माझ्या लेखात आहे. दुसरा म्हणजे ह्यात ओलिव्ह ओईल फक्त त्याच्या fragrance साठी घातले तर ते लो कॅल होते. जास्त घातलं तर साहजिकच कॅलोरी वाढतील. तर ह्या २०० कॅलोरी च्या हिशोबात ४ ब्रेड स्लाईस (१६० कॅल), १ छोटा चमचा ओलिव्ह ओईल (२० कॅल) आणि ४ टोमाटो (४० कॅल) ~ २२० कॅल असे मोजलेले आहे. (माझ्या कॅलोरी काउन्ट चा स्त्रोत : Nutritive value of Indian Foods, National Institute of Nutrition, Hyderabad हा असतो) असो.
त्यातून, मी कधीच जे खाल ते कॅलोरी चार्ट आणि कॅल्क्युलेटर वर वेरीफाय करूनच खा असं सांगत नाही आणि सांगणार हि नाही. कारण शेवटी सगळ्या कॅलोरिक value 'indicative' असतात. चला तर मग, बरंच लांबण लागला ह्या विषयाला. पाक्रु कडे वळूया. :)
बृस्केता टोस्ट एक पौष्टिक, साधा सोपा पण स्टायलिश पदार्थ आहे. आता जसा उन्हाळा वाढत जाणार तसं आपल्याला शेगडी पाशी कमीतकमी उभं रहावसं वाटणार. त्यातून परत वर्ल्ड कप च्या निमित्ताने मित्र मंडळी पण एकत्र होणार. तेव्हा हा पदार्थ उपयुक्त ठरेल. असं ह्यात काय विशेष आहे? टोमाटो, लसूण आणि ओलिव्ह ओईल. भरपूर टोमाटो असल्याने त्यातले अॅन्टी ऑक्सीडन्ट लाय्कोपीन, जीवनसत्व अ, ई आणि क, भरपूर फायबर आणि पोटॅशियम (ह्याने रक्त चाप संतुलित ठेवायला मदत होते) ह्या सगळ्याचे गुण आपल्याला मिळतात. शिवाय हा पदार्थ लो कॅल, लो सोडियम, लो फॅट पण आहे.
सामग्री:
४ स्लाईस मल्टिग्रेन किंवा होल व्हीट ब्रेड
४ टोमाटो, बारीक चिरलेले
४ पाकळ्या लसूण, किसून
१ चमचा ओलिव्ह ओईल (एका स्लाईस वर एक थेंब, कॅलोरी मोजत नसाल तर आवडी प्रमाणे घाला)
१ चमचा ऑरेगानो किंवा बेसिल (पिझ्झा बरोबर पाकीट मिळतं ते)
हवं असल्यास अगदी थोडं चीज (अगदी थोडं म्हणजे वासा पुरतं नख भर! जास्त घातलंत तर लगेच खूप कॅलोरी वाढतील :) )
मीठ आणि मिरीपूड चवीनुसार
कृती:
ओव्हन १८० डिग्री प्री हिट करून ठेवा. ह्या साठी टोस्ट मोड (वरच्या आणि खालच्या दोन्ही रॉड ला गरम करणारा मोड) चा वापर करा.
एका बेकिंग ट्रे मधे ब्रेड च्या स्लाईस पसरून ठेवा. प्रत्येक स्लाईस वर चिरलेला टोमाटो (भरपूर प्रमाणात) घाला. मग प्रत्येक स्लाईस वर किसलेला लसूण, ऑरेगानो, मीठ आणि मिरीपूड घाला. प्रत्येक स्लाईस वर १-२ थेंब ओलिव्ह ओईल घाला. हे ओईल फक्त स्वाद वाढवण्या साठी आहे. नसेल तर वगळलं तरी चालेल. सजावटी साठी, एक बारीक तुकडा चीज, स्लाईस वर ठेवा.
हा ट्रे ओव्हन मधे साधारण १० मी ठेवा. ब्रेड टोस्ट होवून कुरकुरीत झाला पाहिजे. टोमाटो साधारण वाफवल्या सारखे दिसतील.
घरी ओव्हन नसेल तरी हा पदार्थ करता येतो. बेकिंग ट्रे च्या ऐवाजी एका नॉन स्टिक पॅन मधे त्या ब्रेड च्या स्लाईस वर दिल्या प्रमाणे तयार करून घेणे. मग हे पॅन मंद आचेवर झाकून ठेवून, ब्रेड खमंग भाजला जाईपर्यंत ठेवा.
गरमागरम बृस्केत्ता टोस्ट पेश करा!

वाचने
10864
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
मस्त..........मस्त...........
टोस्ट वर पांढरा पदार्थ
झकास ! शक्य होईल तेव्हा तुझी
In reply to झकास ! शक्य होईल तेव्हा तुझी by परिकथेतील राजकुमार
चिली चीज टोस्ट
In reply to चिली चीज टोस्ट by खादाड अमिता
धन्यु धन्यु धन्यु खरच खूप
वाह छान...
दिसायला तर लई भारीये.....
अमिता छान. मि तिथले कुतिसाद
मस्त! आम्ही हीच पाकृ. बेल
In reply to मस्त! आम्ही हीच पाकृ. बेल by विंजिनेर
+१
मस्त!
लै भारी फोटू! पाकृ आवडते पण
In reply to लै भारी फोटू! पाकृ आवडते पण by रेवती
खरंच आहे हे. ऑलिव्ह ऑईल च
इटालियन पा़कृमध्ये ऑलिव्ह ऑईल
In reply to इटालियन पा़कृमध्ये ऑलिव्ह ऑईल by सानिकास्वप्निल
नका हो नका असे फोटो देत
तुम्हाला दोन चॉईसेस आहे. एक
In reply to तुम्हाला दोन चॉईसेस आहे. एक by नि३
+ १
रेवती +१