मीली ने पुरणपोळी ची पा़कृ दिली आहे तरी सण म्हणून मीसुद्धा पुरणपोळी ची पा़कृ देत आहे. घरोघरी सगळ्यांची आवडती पुरणपोळी :)
सावधान!! डाएट सांभाळणारी मंडळी कृपया गुळ किती, साखर किती, तुप किती असे म्हणू नये, सणावारा ला गोडाने सुरुवात करा, कॅलॅरीज मोजण्याने नव्हे ;)
साहित्यः
३ कप चणाडाळ
३ कप चिरलेला गुळ
२ टेस्पून साखर
१/२ जायफळ पूड करून
१ टीस्पून वेलचीपूड
अडीच कप मैदा+१/२ कप गव्हाचे पीठ
चिमूटभर मीठ
६ टेस्पून तेल
तांदळाची पीठी पोळ्या लाटण्यासाठी
पा़कृ:
चणाडाळ स्वच्छ धुवून बोटाचेपे शिजवणे.
शिजलेल्या डाळीतून पाणी गाळून घेणे.
ह्याला कट म्हण्तात.
एका पातेल्यात डाळ चांगली घोटून घेणे.
गुळ आणी साखर त्यात घालून एकत्र करणे .
पुरण आधी पातळ होईल सतत ढवळत राहीले के ते घट्ट होईल.
पुरण चांगले शिजले हे झारा/मोठा चमचा मधोमध उभा राहीला की समजते.
त्यात वेलची-जायफळपूड घालून नीट एकत्र करून पुरणयंत्रातुन वाटून घ्यावे.
हे झाले पुरण तयार.
मैदा+ गव्हाचे पीठ+मीठ+तेल घालून सैलसर भिजवावी. तेल-पाण्याने चांगले मळून घेणे.
२ तास कणीक भिजवल्यावर चांगली बत्त्याने कुटून घ्यावी व परत मळून घ्यावी.
मैद्यची पारी करून त्यात पुरण भरून , पारीचे तोंड नीट बंद करुन घेणे.
तांदळाची पीठी लावूना हलक्या हाताने पोळी लाटणे.
तवा मंद गॅसवर ठेवून पोळी घालावी .
सारखे उलटू नये, एकीकडून नीट भाजली / शेकली की दुसरीकडून भाजावी/ शेकावी.
गरमा-गरम साजुक तुपाबरोबर किंवा दूधाबरोबर खायला द्यावी.
कटाच्या आमटीबरोबर पण खाऊ शकता.
वाचने
11840
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.. तूप आणि पुरणाची पोळी
फोटू छान. मी पारीसाठीच्या
असेच...
In reply to फोटू छान. मी पारीसाठीच्या by रेवती
मीही पारी कणकेचीच करते
In reply to फोटू छान. मी पारीसाठीच्या by रेवती
कडक!! इथं शन्वारी कुणाकडे
आमच्याकडे ये
In reply to कडक!! इथं शन्वारी कुणाकडे by मेघवेडा
झक्कास :)
आइ शपथ क्काय झक्कास दिस्तेय
छान ग. पन मैदा घातलेली
माझ्या सासुबाई पण जवळजवळ याच
सासुबाईंना विचारून... खरेतर
In reply to माझ्या सासुबाई पण जवळजवळ याच by सविता
खरंतर पुरण जड बुडाच्या
In reply to सासुबाईंना विचारून... खरेतर by सविता
असे फोटु वैगरे डकवून आमच्यावर
मस्तच...........आमच्याकडे पण
ए सानिका कटाच्या आमटीची पण पाकृ दे ना ...
'खा खा पुरणपोळ्या खा , मजा
आम्ही अभिनंदन करण्यास तयार
In reply to 'खा खा पुरणपोळ्या खा , मजा by ५० फक्त
खुप छान अमोल केळकर
लै भारी.... उम्म्म्म्म्म्म्म
मस्त
मी आपली आणी मिलीची रेसेपी