राम राम मंडळी,
नाट्य व चित्रपट कलावंतांसंदर्भात हा काथ्याकूट आहे हे सर्वप्रथम नमूद करतो आणि या काथ्याकुटाचा प्रवास याच मंडळींसंदर्भात चालावा अशी विनंतीवजा अपेक्षा करतो!
तर मंडळी, काही काही नाट्य व चित्र कलावंत हे त्यांच्या त्यांच्या जागी गुणीच असतात. त्यांनी आपलं काहीच बिघडवलेलं नसतं. एक कलाकार म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल उचित आदरही असतो.
पण...
यापैकी काही कलावंत हे आपल्याला काह्ही म्हणजे काह्ही केल्या आवडतच नाहीत/नसतात. काय असेल ते असो पण त्यांना पडद्यावर पाहिलं की अगदी नक्को वाटतं! :)
हा कथ्याकूट हा याच मंडळींची नांवे लिहिण्याकरता मी सुरू करत आहे. आपण नेहमी आपल्या आवडीबद्दल/आवडणार्या कलावंतांबद्दल लिहीत असतो, या निमित्ताने एकदा आपल्या नावडीबद्दलही इथे लिहू या. बघुया तरी, कुणाला कोण आवडत नाही ते! :)
चला, तर माझ्यापासूनच सुरवात करतो. तूर्तास जी नांवं चटकन आठवत आहेत ती इथे लिहीत आहे. आपणही भाग घेऊन आपापल्या नावडी कळवा! :)
खालील मंडळी मला कधीच सहन होत नाहीत -
अनिलकपूरचे दोन्ही भाऊ,
संध्या,
प्रदिपकुमार,
आशिकीफेम राहूल रॉय,
जॉय मुखर्जी,
सचिन(अपवाद 'हा माझा मार्ग एकला, पण त्यानंतर कधीही आणि केव्व्हाच आवडला नाही!),
चित्रपटात काम करणारी शांतारामबापूंची अजून एक बायको (तिचं नाव आता आठवत नाही!),
इत्यादी इत्यादी इत्यादी...
बराय तर मंडळी, आता आपला निरोप घेतो. बरीचशी मंडळी मिपाचा दिवाळी अंक काढा म्हणून मागे लागली आहेत. त्या संदर्भात नीलकांत, डॉ बिरुटे, चतुरंग, मुक्तराव, प्रियाली, प्राजू, नीलकांत इत्यादी माझ्या काही मित्रमैत्रिणींशी विचारविनिमय करायचा आहे! :)
"वीस रुपये रोजी, रोजी दोन टाईम चाय अन् रोजी एक शिग्रेट" या बोलीवर काही संपादक मिळतात का तेही पाहिलं पाहिजे! :)
आपला,
(नावडता) तात्या.
वाचने
29407
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
संध्या, मिथ
कट्टी!
In reply to संध्या, मिथ by धमाल मुलगा
मलाही.. १.
In reply to कट्टी! by विसोबा खेचर
बच्चन फॅमिली
In reply to कट्टी! by विसोबा खेचर
मराठीतील न
अजून एक..
नावड
अर्रर्र.. छ
गुलशन
यादी मोठी आहे..
तात्या
हींदी शक्त
हं..
चित्रपटात काम करणारी
In reply to हं.. by स्वाती दिनेश
आता
तात्या,
"करीना
In reply to तात्या, by भाग्यश्री
ती अमृता
वहिनी वहिनी
मलाही असेच वाटते.
In reply to वहिनी वहिनी by आनंदयात्री
अगदी
In reply to मलाही असेच वाटते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजुन काही
अकला बुकल
In reply to अजुन काही by गीतांजली
अलका कुबल = जन्मजातच मुंडावळ्या
In reply to अकला बुकल by धमाल मुलगा
नुसती मुंडावळ्याच
In reply to अलका कुबल = जन्मजातच मुंडावळ्या by विजुभाऊ
माहेरची साडी
In reply to अलका कुबल = जन्मजातच मुंडावळ्या by विजुभाऊ
अकला बुकल
In reply to अजुन काही by गीतांजली
बरे आहे..
अरे हे राहीले की ....
प्रिया
हिम्मेश
हम्म्म
????????????
In reply to हम्म्म by प्रियंका
क च्या तमाम मालिका
न आवडणारे अभिनेते
ह. ह. पु. वा
In reply to न आवडणारे अभिनेते by नितीनमहाजन
राज बब्बर!
राज बब्बर!
In reply to राज बब्बर! by ब्रिटिश टिंग्या
१.अभिनेता
सलमान खान :
In reply to १.अभिनेता by भडकमकर मास्तर
न आवडणारे कलाकार
मला ही सर्व मंडळी अतिशय आवडतात
राखी
In reply to मला ही सर्व मंडळी अतिशय आवडतात by प्रियाली
:)
In reply to मला ही सर्व मंडळी अतिशय आवडतात by प्रियाली
शेजारच्याच्या घरातला तमाशा
In reply to :) by विसोबा खेचर
भारत
एक राहिलाच
चंद्रचूड सिंग
:)
In reply to चंद्रचूड सिंग by चावटमेला
चंद्रचुड...
In reply to चंद्रचूड सिंग by चावटमेला
ऐश्वर्या नार्वेकर - १ नंबर नाटकी
लांब लिस्ट आहे...
भरपुर आहेत
मिसळपाव
!!!!!!!!! :)
करेक्ट
In reply to !!!!!!!!! :) by वरद
वरद.. लैच्च
In reply to !!!!!!!!! :) by वरद
तिस्ता
जाहीरातित
दिवाळी अंक!
आवडीने
In reply to दिवाळी अंक! by पिवळा डांबिस
हो ना!!
नावड शिरोमणी
केतरिना
भरत नको येउस परत...
सलमान
यांना कसे विसरलात?