काटी/करली नावावरुनच ह्याचा बोध होतो की ही काटेरी मच्छी आहे. छोटी करली दिसायला सुंदर असते. शेपुट व पर सोनेरी असतात. भरपुर काटे असतात ह्यात. त्यामुळे लहान मुलांच्या हातात देउच नका. त्यांना मांस काढून द्या. काटे भरपुर असल्याने अगदी हळू चविचविने खाण्याचा आनंद मिळतो. ही करली खुपच चविष्ट असते म्हणूनतर काटे काढण्याचा त्रास सहन करुनही आवडीने लोक खातात. करलीचे कालवणही छान लागते. इतर कालवणांप्रमाणेच हिचे कालवण करतात.
करली/काटी जर छोटी असतील तर त्यांची डोके, शेपुट काढुन, पोटातील घाण काढून तिन पाण्यांतुन धुवुन घ्यावीत. जर काटी मोठी असेल तर एक पुष्कळ होते. हया लांब काटीचे तुकडे तिरके करायचे म्हणजे काटे व्यवस्थित काढता येतात. कारण ह्याचे काटे तिरके पसरलेले असतात.
ही आहे मोठी कर्ली
लागणारे साहित्य :
करली/काटी
७-८लसुण पाकळ्या
हिंग, हळद
मसाला १ ते २ चमचे.
मिठ
तेल.
पाककृती:
तुकड्यांना पहिला हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन घ्या.
मग गरम गरम तव्यावर तेल सोडून तुकड्या तव्यात टाका. गॅस मिडीयम ठेवा. ५ मिनीटांची पलटा ५ मिनीटांत गॅस बंद करा आणि तयार व्हा काटे काढून चविष्ट मांस खायला. हाय काय नी नाय काय ? १० मिनीटांचा खेळ.
वाचने
14941
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त ग जागु ताई
वा वा, जागुताई आल्या, जागुताई
लहान असताना अनंत वेळा घशात
केवळ नावावरुन्च हा धागा जागुचा आहे हे ओळखल
In reply to लहान असताना अनंत वेळा घशात by गणपा
वेताळ, विश्वनाथ
हो आम्ही त्यातलेच आहोत.
In reply to वेताळ, विश्वनाथ by जागु
गणपा पण कर्लिचे कालवणही खुप
आहाहा...
धन्यवाद जागु. बरोबर मीही
अपर्णा अजुन बरेच मासे आहेत
मस्त आहे
मस्त ! शाकाहारी असुनही आम्ही
मासे :)
लय भारी आणी चवीष्ट! काटीला
कर्लीची कटलेट्स
वाह!
छान फोटू आणि पाकृ.
काटे
छान आहे पाकृ... पण मी करेन की
कर्लीचं कालवण = सुख
खुप खुप धन्यवाद सगळ्यांचे.
वाम
वाम आम्ही खात नाही. पण आता
व्वा, सुंदर फोटो . करली ,माझा