✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

उपाय सुचवाल ?

उ
उगा काहितरीच यांनी
Fri, 03/11/2011 - 16:26  ·  लेख
लेख
मी सरकारी निवासस्थानात राहतो. (क्वॉर्टर) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक बोका पाळला आहे. तो बोका कधिच बांधलेला नसतो. रात्री तो माझ्या गाडीच्या (Honda cb twister) कव्हर मध्ये जाउन झोपतो. त्यामुळे गाडीच्या सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहिच उपयोग नाही. त्या बोक्याला मारायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब) यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
राहणी
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
सल्ला
मदत

प्रतिक्रिया द्या
53880 वाचन

💬 प्रतिसाद (154)

प्रतिक्रिया

बोक्यांना मेनका गांधी +

परिकथेतील राजकुमार
Fri, 03/11/2011 - 18:20 नवीन
बोक्यांना मेनका गांधी + न्यायालय यांचे संरक्षण नाहीये.
त्यामुळेच आमच्या नानाचे मिपावर हालहाल होतात :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

काय करनार!

उगा काहितरीच
Fri, 03/11/2011 - 18:20 नवीन
कॉलेज भरपुर लांब आहे हो ! ऑटोत जायची लाज वाटते, बाकी कोणतेच वाहन उपलब्ध नाही ( बस , ट्रेन , जहाज,हॅलीकॉप्टर, विमान, हॉव्हरक्रॉफ्ट, जेटपॅक, सायकल, बेलगाडी, इ इ ) आणि हो आमच्याकडे बोका खात नाहीत (मिपावर पाकक्रुती टाका म्हनावं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

आणी

gogglya
Fri, 05/29/2015 - 12:41 नवीन
ती पाक्रु अन्डे घालून कशी करायची हे पण लिहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

एक काम करा... उद्या

परिकथेतील राजकुमार
Fri, 03/11/2011 - 18:25 नवीन
एक काम करा... उद्या संध्याकाळी भेटा. मी चार पाच मैतर गोळा करतो आमचे मिपावाले. त्यांना घोट घोट पाजा.. बोका आणि बोक्याचा मालक दोघांचा त्रास संपवतो. वेळ पडली तर तुमचा पण अवतार संपवतो ;)
  • Log in or register to post comments

पुपा लावा

इरसाल
Fri, 03/11/2011 - 18:50 नवीन
तिथे पुपा लावा ' बोक्यांना बसायला सक्त मनाई आहे. बसल्यास **वर चटके देण्यात येतील (हवा काढण्यात येईल या धर्तीवर).(चटके कसे द्यायचे त्यासाठी वेगळ्या धाग्याचे पैसे पडतील). बोका जर साक्षर असेल तर तुमचा प्रश्न तडीस जाईल.
  • Log in or register to post comments

बोका खाणारे खुपश्या जमाती आहेत.

वेताळ
Fri, 03/11/2011 - 18:50 नवीन
त्या बोका पकडुन न्या म्हणण्याचा अवकाश लगेच येवुन जाळे लावुन जातात. पारधी लोक देखिल बोके पकडुन नेतात.
  • Log in or register to post comments

वैदु लोक खातात बोके-मांजरी.

नगरीनिरंजन
Fri, 03/11/2011 - 21:59 नवीन
वैदु लोक खातात बोके-मांजरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

नरेशकुमारांचा आणखी एक आयडी???

मस्त कलंदर
Fri, 03/11/2011 - 19:35 नवीन
यावरून नरेशकुमारांचा 'बायकोला काय भेटवस्तू द्यावी' धागा आठवला. त्यांनी प्रत्येक सल्ल्याला भिरकावलं होतं तसेच हे 'उगाच काहीतरी' पण करत आहेत.. बाकी, अशा धाग्यांकरता मालकांनी खिशातले (पदरचे पैसे म्हटलं नाहीय) पैसे खर्चून खफची सोय केली आहे असं ऐकिवात आहे.. खरं खोटं नीलकांत जाणे.
  • Log in or register to post comments

ह्या आल्या लगेच मिपाच्या

गणपा
Fri, 03/11/2011 - 19:50 नवीन
ह्या आल्या लगेच मिपाच्या कैवारी.. तिकडे शिणियर लोकं म्हणतात की मिपावर पुर्वी सारखा धुडगुस होत नाही. आता तुम्ही स्वतः धुडगुस घालुन मिपाच जुन वातावरण परत आणत नाही. वर जो कोणी असा प्रतत्न करतोय तर त्याच्या तंगड्या खेचायला लागलात. ....कस होणार मिपाचं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

गैरसमज झाला आहे.

नरेशकुमार
Mon, 03/14/2011 - 09:23 नवीन
गैरसमज झाला आहे. माझी पोस्ट निट वाचली असती तर जी काही उत्तरे आली ती मला नको होति हे अगोदरच पोस्ट मधे सांगितले गेले होते. तरी सुद्धा ति लोकांनी तशिच उत्तरे दिलि. पुढे काही अवांतर प्रतिसादामुळे त्याला वेगळेच रुप आले. संपादकांना याबाबत विचारना केली होति. उत्तर आलेले नाही. पुन्हा एकदा सांगतो ति पोस्ट मी सिरियसली काढ्ली होति. काही जनांनि विचित्र प्रतिसाद देउन त्याला ग्रहन लावले. आनि ति पोस्ट उडाली. जाउदे. तो विशय नको. पन कोनी एकाच्या प्रामानीक भावनांना चेश्टेचे रुप का देतो देव जाने. नाही आवडत तर त्याकडे दुर्लक्श करावे. कोनि कोनाला बळजबरी करत नाही इथे प्रतिसाद द्यायला. पन उगा मन दुखावतील असे प्रतिसाद कोनी देउ नयेत. प्रत्येकाच्या भावनांचि कदर करता येत नसेल तर निदान दुखावु नयेत. तसे हि ( उपाय सुचवाल ? प्रेषक 'उगा काहितरीच') पोस्ट मला व्यकित्गत आवडली नाही, पन उगा त्याला नावे ठेवन्याचा मला अधिकार नाही. म्हनुन मि प्रतिसादही दिला नाही. अवांतर : मि बायकोला भेट वस्तु घेउन दिलि. एक बॉडी (बॅक, फूट ) मसाजर घेउन दिले. नोंद घ्यावी. पुढिल प्रतिसाद गमतिने घेने : (ते मी सुद्धा वापरतोच, पन नाव बायकोचे. कशी काय वाट्ली आयडीया ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

पुन्हा एकदा सांगतो ति पोस्ट

वपाडाव
Mon, 03/14/2011 - 10:49 नवीन
पुन्हा एकदा सांगतो ति पोस्ट मी सिरियसली काढ्ली होति.
पण मी म्हंतो, ही काय जागा अहे का सिरियस होण्याची?? असल्या गोष्टी व्य. नि. करुन विचारायच्या. असं फेपरात छापुन का विकायचं? त्यात पुन्हा भेळ-वडापावचे मसाले लागले की चविष्ट होणार. लोक बोटं / जिभल्या चाटत खाणार.... असो. मी त्यावेळी मिपावर सक्रिय नव्हतो. मजा आली असती वाचायला. आतातरी ह. घ्यायला शिका !!!! ------------------------------- (मिळालेल्या मौक्याचा फायदा उठवणारा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

अहो मि दुसर्‍यांचे हलकेच

नरेशकुमार
Mon, 03/14/2011 - 11:30 नवीन
अहो मि दुसर्‍यांचे हलकेच घेतले होते पन आमचे जड झाले होते. जाउद्या हो तो विशय. का लोकं गडे मुडदे उखडतात ठावुन नाय राव. सोडा राव. विशय क्लोज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

उपाय

योगी९००
Fri, 03/11/2011 - 19:42 नवीन
पुढील उपाय करून पहा उपाय एक : १) एक टोपली घ्या. २) नंतर एका बाजूने टोपली उचलून ती एका काडीच्या सपोर्टवर उलटी ठेवा. ३) अशा एका काडीच्या सपोर्टवर असलेल्या उलट्या टोपलीत एका बशीत दुध ठेवा. ४) काडीला दोरा बांधा आणि त्या दोर्‍याचे दुसरे टोक पकडून लांबवर लपून रहा. ५) बोका दुध प्यायला आत शिरला की त्या दोरीने काडी ओढून बोक्याला उलट्या टोपलीत पकडा. ६) नंतर आतमध्ये हात घालून बोक्याकडून थोडे बोचकरून आणि चावून घ्या. या बेसिस वर पोलिसाकडे तक्रार करा आणि शेजारी आणि बोक्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. उपाय दोन : १) बोका जेथे झोपतो तेथे रोज नवनवीन मांजरीचे चित्र लावा. २) काही दिवसांनी मग बोक्याला ओकं बोकं वाटायला लागेल. मग तुम्हीच मांजराचे कातडे पांघरा. २) बोक्याला वरील कातडे पांघरून भुलवा. (पुढची जबाबदारी तुमची...) उपाय तीन : १) टॉम आणि जेरी मधील जेरीला बोलवा. तो आपोआप बोक्याला बदडेल. २) टॉम आणि जेरी मधील बाकीची कॅराक्टर्स (सिंह, हत्ती, कुत्रा वगैरे...जे जेरीचे मित्र असतात) त्यांना बोलवा आणि त्यांचे बोक्याशी भांडण लावून द्या. ३) ट्विव्टी बर्ड ला बोलवा. उपाय चार : तुम्हीच एक बोका पाळा. त्याचे वरील बोकाळलेल्या बोक्याशी भांडण लावून द्या. तुमच्या बोक्याला वरील बोक्याची झोपायची जागा allocate करा आणि मजा पहा.
  • Log in or register to post comments

वास्तविकत: आपलेच नाव jerry

गुंड्या बावळा
Sat, 03/12/2011 - 09:34 नवीन
वास्तविकत: आपलेच नाव jerry हवे,.....,. तो JERYA तुमच्या कडेच शिकत असेल :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

समस्यापूर्तीचा प्रयत्न.

रामदास
Fri, 03/11/2011 - 20:16 नवीन
सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. याचा अर्थ बोका एकटा झोपत नाही.टाकीवर पुरेशी पकड (ग्रीप)न मिळाल्याने ओरखळे उठतात. काही दिवसानी ओरखळ्यांची नवलाई संपली की तो गपगुमान झोपून राहील. या बाबतीत दुय्यम स्वरुपाचे असे काही प्रश्न मनात येतात. तो झोपण्यापूर्वी वेगवेगळे आवाज काढतो का ? तसे असेल तर प्रकरण नविन आहे. आवाज नसेल तर भाटी जुनीच आहे असे समजा. सिटवर सकाळी केस मिळतात का ते बघा. कदाचीत भाटी येत नसेल पण बोका दाढी करत असेल .केस आढळले नाहीत तर तो बोका नसून भाटी आहे असे समजा .भाटी बोक्यापेक्षा वस्ताद असते आणि तिची नखे तिक्ष्ण असतात. नखांवरून भाटी आहे की बोका ते समजते. अंगपरीक्षा करावयाचा प्रयत्न करू नये.काहीवेळा गळ्यापर्यंत उडी मारून जुगुलर का काहीशा नावाची नस पकडते.जुगुलरचा आणि जुगण्याचा काही संबंध नाही.त्या नसा वेगळ्या . त्यांची नावे एखाद्या हुशार विद्यार्थ्याला विचारावी. पराचा अभ्यास बरा आहे असे म्हणतात बॉ. पूर्वी धम्याला पण मांजरी पाळण्याचा षौक होता म्हणे. पण त्याला नोकरी लागली .त्याखेरीज मिपावर एक कृष्णमार्जार प्रेमी नावाचा मुलग्या आहे. त्याला विचारा. तूर्तास त्या मार्जारावर लक्ष ठेवा . ते आत झोपले की वरून मच्छरदाणी घाला. नंतर सिटवर (गाडीच्या ) पाणी ओता. हे पाणी ओतण्यापूर्वी कोसला नावाची एक कादंबरी वाचा. त्यात मांजर हाकलण्या/पकडण्यासाठी एक आख्खा धडा आहे. ह्या धड्यामुळे ते लेखक अजूनही बोक्यासारखी मिशी ठेवतात. हां तर मी सांगत होतो ते पाणी ओतण्यासाठी .पाणी ओतले की कुत्र्याचा पण मूड जातो.पूर्वी असं काही आमच्या घराच्या समोर असं काही आलं की आमचा गडी पाणी ओतायचा ते आठवलं. हां तर मच्छरदाणी. काळ्या रंगाची नको. फार पूर्वी गिरणगावात एकाच रुम मध्ये दोन कुटुंब राहयची तेव्हा काळ्या मच्छरदाणीचा वापर केला जायचा. मांजराला संकोच नसतो. त्यामुळे पांढरी वापरली तरी चालेल. पाणे ओतल्यावर मार्जार बाहेर येईल .त्याची नखे मच्चारदाणीत अडकतील .मग मच्छरदाणीमें मांजर. त्यानंतर पुण्यात असाल तर लकडीपुलावर जा. लकडीपूल माहीती नसेल तर मिपावर एक लेख आला होता लकडीपूलाचा तो वाचा. तो वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की दुचाकी वाहनाला प्रवेश नाही. नो प्रॉब्लेम तुम्ही सरकारी नोकर आहात. तुम्हाला कोणीच प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला प्रश्न पडला तर तर ....मिपावर पुढचा धागा टाका.
  • Log in or register to post comments

ठॉ ठॉ ठॉ... रामदास काका फुल

गणपा
Fri, 03/11/2011 - 20:29 नवीन
ठॉ ठॉ ठॉ... रामदास काका फुल फार्मात.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

+१

मैत्र
Mon, 03/14/2011 - 14:51 नवीन
फुल्ल्ल्ल फॉर्मात.... मेलो.... लोक खरोखर पहायला लागले वेड्यासारखं हसताना पाहून.. अ श क्य ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

एक नंबर उपाय.

पैसा
Fri, 03/11/2011 - 20:34 नवीन
रामदास काका सांगतात तसं करा. नाहीतर आणखी एक गांधीवादी उपाय आहे. बोक्याशी मैत्री करून त्याला घरात बोलवा. त्याला भरपूर मासे खायला घाला आणि घरातल्या सोफ्यावर बसवा. मग तो एक तर सोफ्यावर झोपेल किंवा सोफ्याची वाट लावेल. पण गाडीची/कव्हराची वाट लावणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

वाचवा....

मस्त कलंदर
Fri, 03/11/2011 - 20:40 नवीन
नुसती हसतेय खो खो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मी पण !!!!!!!!!!!!

निवेदिता-ताई
Fri, 03/11/2011 - 22:14 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं..............

धमाल मुलगा
Fri, 03/11/2011 - 20:47 नवीन
मेलो मेलो मेलो....ठार मेलो! रामदासकाकांचा आयडी हॅक झालाय वाटतं. ;) पण ..अर्रर्र...नाही नाही...नीट लक्ष देऊन बारीक वाचलं तर पेश्शल पंचेस घावले! काका (ऑन द) रॉक्स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मेले, ठार मेले

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 03/11/2011 - 22:42 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

ज ह ब ह

मिसळलेला काव्यप्रेमी
Sat, 03/12/2011 - 00:19 नवीन
ज ह ब ह र्‍या........ फुटलो....... =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

टिचला बोक्याचा मायना!!!!

पिवळा डांबिस
Sat, 03/12/2011 - 03:18 नवीन
टिचला बोक्याचा मायना!!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मेलोऽऽऽ.............

धमाल मुलगा
Tue, 03/15/2011 - 19:24 नवीन
आता मात्र ठार मेलो ! =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

सगळ्यात बेष्ट प्रतिसाद

संदीप चित्रे
Sat, 03/12/2011 - 03:27 नवीन
जियो रामदास :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

उस्तादोंके उस्ताद!

सहज
Sat, 03/12/2011 - 09:51 नवीन
साहीत्यसूर्य!! दंडवत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

__/\__ रामदासकाका सकाळ

परिकथेतील राजकुमार
Sat, 03/12/2011 - 12:00 नवीन
__/\__ रामदासकाका सकाळ सार्थकी लागली आज. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

अगगागागा रामदास काकांनी एक

स्पा
Mon, 03/14/2011 - 14:55 नवीन
अगगागागा रामदास काकांनी एक प्रतिसादात बर्याच जणांचा गेम वाजवला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बर्याच जणांचा गेम वाजवला

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/14/2011 - 16:39 नवीन
बर्याच जणांचा गेम वाजवला
क्काय? रामदासकाका ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ठ्ठो ठो ...... कॉफी

प्रीत-मोहर
Sat, 03/12/2011 - 13:05 नवीन
ठ्ठो ठो ...... कॉफी नाकातोंडात गेली ना काका कॉम्पुटर पन प्यायला काफी =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मेलो...

श्रावण मोडक
Sat, 03/12/2011 - 19:59 नवीन
मेलो... सार्थक झालं इथं आल्याचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

खल्लास..

चिगो
गुरुवार, 08/30/2012 - 16:26 नवीन
मेलो.. ठार मेलो.. :-D केवळ रामदासकाकांच्या ह्या जबराट प्रतिसादासाठी हा धागा वर आणतोय.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

कंय लिवलय.... भन्नाट!

मोहनराव
गुरुवार, 08/30/2012 - 17:01 नवीन
कंय लिवलय.... भन्नाट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

धन्य!

sagarpdy
गुरुवार, 08/30/2012 - 17:05 नवीन
धन्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

धन्य!

sagarpdy
गुरुवार, 08/30/2012 - 17:06 नवीन
धन्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

हा प्रतिसाद वाचायचा राहून

सूड
गुरुवार, 08/30/2012 - 17:16 नवीन
हा प्रतिसाद वाचायचा राहून गेला होता, भन्नाट लिहीलंय. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मांजराला संकोच नसतो. त्यामुळे

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/30/2012 - 17:22 नवीन
Image removed. मांजराला संकोच नसतो. त्यामुळे पांढरी वापरली तरी चालेल >>> --^--^--^--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

ठ्ठो

gogglya
Fri, 05/29/2015 - 12:43 नवीन
+१११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

त्या बोक्याला मुरक्कू द्या

नि३
Fri, 03/11/2011 - 20:38 नवीन
त्या बोक्याला मुरक्कू द्या खायला... संदर्भ : http://www.misalpav.com/node/13560#comment-220153
  • Log in or register to post comments

ह्यॅ !! ५४ प्रतिसाद ! पण

स्पंदना
Fri, 03/11/2011 - 20:39 नवीन
ह्यॅ !! ५४ प्रतिसाद ! पण एकाही मि.पा.च्या पुताला (पुत्रचा अपभ्रंश) 'ग्यानबाची मेख 'नाही गावली. ओ उगाच काहितरी उगाच यांच्या नादी नका लागु. मी सांगते तुम्हाला नामी उपाय... हे बघा 'तो बोका' अन 'ती गाडी' म्हणुन तो रोज रात्री तीथे झोपायला येतो! तुम्ही कव्हर घाला अन कुलुप लावा, वळणाच पाणी वळणालाच जाणार. हे व्हायला नको? उपाय हवा? 'ती गाडी 'बदलुन 'गाडा ' घ्या. मग बघ्घा फिरकतो का बोका त्या गाड्या कडे!
  • Log in or register to post comments

गाडी उलटी पार्क्करून का बघत

विजुभाऊ
Fri, 03/11/2011 - 20:53 नवीन
गाडी उलटी पार्क्करून का बघत नाही? चाके वर असतील आणि सीट खाली असेल तर बोक्याला बसायला अवघड जाईल
  • Log in or register to post comments

त्याला

रामदास
Fri, 03/11/2011 - 21:02 नवीन
गाडी उलाल होणे असे म्हणतात. गाडी उलाल झाली की आधारासाठी साठी डिमरे (लाकडी ठोकळे ) लावायला लागतात.
  • Log in or register to post comments

अगदी सोपं आहे....

पिवळा डांबिस
Fri, 03/11/2011 - 21:39 नवीन
गाडीच्या सीटवर लांडग्याचे मूत्र शिंपडून ठेवा.... रात्री बोक्याला लांडग्याचा वास आला की परत तो तिथे फिरकणार देखील नाही!!!!! हाकानाका!!!
  • Log in or register to post comments

+१

टारझन
Fri, 03/11/2011 - 22:29 नवीन
गाडीच्या सीटवर लांडग्याचे मूत्र शिंपडून ठेवा....
माझा मित्र गोमंतक लांडगे हा फार मुत्रा आहे , तो मुत्रादान करायला तत्पर असतो , नंबर हवा असल्यास व्यनी करा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पण पिडा काका

वेताळ
Fri, 03/11/2011 - 22:45 नवीन
उगा काहीतरीच ला दुसर्‍या दिवशी त्याच गाडीवर बसल्यावर लांडग्याच्या मुत्राचा काही विपरीत परिणाम तर होणार नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

उगा काहीतरीच ला दुसर्‍या

पिवळा डांबिस
Sat, 03/12/2011 - 09:03 नवीन
उगा काहीतरीच ला दुसर्‍या दिवशी त्याच गाडीवर बसल्यावर लांडग्याच्या मुत्राचा काही विपरीत परिणाम तर होणार नाही ना? अजिबात नाही! उलट सुंदर पोरी गळ्यात पडतील! (असे आम्ही पूर्वी एका "वेअरवुल्फ" नांवाच्या इंग्रजी सिनेमात पाहिले आहे हो!!!) बोक्याचा त्रास नसलेल्या मिपावरील इतर बोळेकरूंनीही हा उपाय करून पहायला हरकत नाही!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

@ गाडीच्या सीटवर लांडग्याचे

निवेदिता-ताई
Fri, 03/11/2011 - 22:17 नवीन
@ गाडीच्या सीटवर लांडग्याचे मूत्र शिंपडून ठेवा.... आणी ते आणायला बोक्याला बरोबर घेउन जा????
  • Log in or register to post comments

आणी ते आणायला बोक्याला बरोबर

पिवळा डांबिस
Sat, 03/12/2011 - 03:11 नवीन
आणी ते आणायला बोक्याला बरोबर घेउन जा???? नको! त्यापेक्षा आपल्या विमुक्तला सांगा... नाहीतरी उगाच रानोमाळ भटकत असतो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई

अजून काही (खरे) उपाय

विकास
Fri, 03/11/2011 - 22:43 नवीन
(१) How to Make Homemade Cat Repellent (२) Image removed. Shake Away Cat Repellent is non-toxic granules that contain urine from coyotes, foxes or bobcats, animals that are predators of cats. (हे स्प्रे केल्यावर बोकाच काय तुमचे शेजारी पण पळून जातील!)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा