दुखात सुखाची धून असते ..!!
सगळेच संपून गेलेले असते
ती धडपड ...
जागरणे ....
धावपळ ...
धडधडणे ....!!
नि उरतो फक्त एक न मिटणारा आवंढा
आई गेली नि फक्त उरले निव्वळ अश्रू
न कळत ....न जुमानणारे ...!
सगळे बधीर ..!!
ते क्षण ….
ते वातावरण ....
सगळे सुन्न... अबोल ...
अश्रू फक्त सोबत ...कधीपण ...!
एका नंतर दुसर्याचे
घनघोर टाहो....
जशी एकाला जांभइ आली की दुसर्यालापण
नियंत्रणाच्या बाहेरचे हे सर्द क्षण ..
सगळे एकत्र
शांत अबोल ध्यान लावून
निर्वात पोकळीतले
मिट्ट अबोल क्षण ...!!
खिडकीवरची चिमणी उगाचच चिवचिवत
दुखाची जाणीव ओढून घेत असते
दहा फुटावरून उडणारा कावळा
त्याचा आवाज घसा बसल्या सारखा
दुरून डोंगराच्या पल्याडून येत असावा असे वाटत राहते
मन बधीर....!.... तन बधीर ..!!
नि मध्येच एखादी धून ....
सळकण सूर्याची कोवळी तिरीप .......
नदीमध्ये अस्थी विसर्जनाची वेळ
पाण्याच्या स्पर्शाने दुख विसर्जित होत असते
नकळत एखादी धून
मन फुलवू लागते .......!!
आईचे दुख नकळत हरवत असते
ह्या प्रौढ वयात ...!!
काव्य काव्य म्हणतात ते हेच
तुफान...
बर्याच दिवसानि लिहिलित
मस्त
खोल हुंदक्यांची जानीव होते